प्रादेशिक बातम्या

July 2, 2025 3:05 PM

views 47

मुंबईसह संपूर्ण कोकण किनारपट्टीवर आज आणि उद्या मुसळधार पावसाचा हवामान विभागाचा इशारा

राज्यात मौसमी पावसानं पुन्हा जोर धरला असून मुंबईसह संपूर्ण कोकण किनारपट्टीवर आज आणि उद्या मुसळधार पाऊस पडेल असा इशारा हवामान विभागानं दिला आहे. दक्षिण भारतातला कमी दाबाचा पट्टा मध्य भारताकडे सरकत असल्यानं कोकण किनारपट्टीवर सोसाट्याचे वारे वाहण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे या भागात सतर्...

July 2, 2025 2:07 PM

views 49

उत्तराखंडमध्ये मुसळधार पाऊस आणि भूस्खलनामुळे अडकलेल्या महाराष्ट्रातल्या पर्यटकांना राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मदत

उत्तराखंडमध्ये मुसळधार पाऊस आणि भूस्खलनामुळे अडकलेल्या महाराष्ट्रातल्या पर्यटकांना मदत करण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढाकार घेतला आहे. भूस्खलनात परतीचा मार्ग वाहून गेल्यामुळे २८ जूनपासून उत्तराखंडमधील यमुनोत्री धामजवळ जानकी छट्टी गावात महाराष्ट्रातले सुमारे दीडशे पर्यटक अडकले ...

July 2, 2025 1:48 PM

views 45

महाराष्ट्रात वीज कोसळून मृत्यू झालेल्या शेतकरी आणि शेतमजुरांच्या कुटुंबांना अर्थसहाय्य वाढवून देण्याबद्दल मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्याचं आपत्ती व्यवस्थापन मंत्र्यांचं आश्वासन

वीज कोसळून मृत्यू झालेले शेतकरी शेतमजूर यांच्या कुटुंबांना १० लाख रुपयांची मदत करावी अशी मागणी काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी आज विधानसभेत केली. आपत्ती व्यवस्थापनाच्या कक्षेत वीज कोसळून मृत्यू याचा समावेश नव्हता, आता तो करण्यात आला आहे, असं आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी ...

July 2, 2025 8:57 AM

views 40

आर्थिक लाभाच्या फसव्या योजनांच्या बाबतीत नागरिकांनी दक्षता घेण्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आवाहन

राज्यात अधिक व्याजदराचं आमिष दाखवून नागरिकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या योजनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिस विभागामार्फत विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. नागरिकांनीही अशा प्रकारच्या योजनांना बळी न पडता योग्य ती दक्षता घ्यावी, असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानसभेत केलं. भिमराव तापकीर...

July 2, 2025 8:55 AM

views 14

पीकविम्यासंदर्भात दोषी विमा कंपन्यांवर कठोर कारवाई केली जाईल – कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांची ग्वाही

पीकविम्यासंदर्भात दोषी ठरलेल्या विमा कंपन्यांवर कठोर कारवाई केली जाईल आणि अशा कंपन्या शासनाच्या काळ्या यादीत टाकल्या जातील, असं कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी विधानपरिषदेत सांगितलं. राज्यात मार्च-एप्रिल आणि मे महिन्यात पावसामुळे नुकसान झालं असून याबाबतचे पंचनामे पूर्ण होताच शासनाच्या धोरणानुसार मद...

July 2, 2025 8:44 AM

views 58

राज्य शासनाच्या वाळू धोरणाअंतर्गत घरकुलांसाठी स्थानिक वाळू घाटांमधून पाच ब्रास वाळू मोफत

राज्य शासनाच्या वाळू धोरणाअंतर्गत घरकुलांसाठी स्थानिक वाळू घाटांमधून पाच ब्रास वाळू मोफत उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तहसीलदारांमार्फत ही वाळू लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवली जाणार आहे, अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानपरिषदेत दिली. स्थानिक ग्रामपंचायती, नगरपंचायती आण...

July 2, 2025 8:42 AM

views 19

येत्या काळात अपारंपरिक ऊर्जा स्रोतांचं महत्त्व आणि आवश्यकता वाढणार

येत्या काळात अपारंपरिक ऊर्जा स्रोतांचं महत्त्व आणि आवश्यकता वाढणार आहे. या पार्श्वभूमीवर उदंचन जलविद्युत प्रकल्प म्हणजेच पंपस्टोरेज हा प्रकल्प अपारंपरिक ऊर्जा स्रोतात भर घालेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मुंबईत व्यक्त केला. उदंचन जलविद्युत प्रकल्पांसाठी जलसंपदा विभाग आणि तात्य...

July 2, 2025 8:40 AM

views 192

भारतीय जनता पार्टीचे नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून रवींद्र चव्हाण यांची बिनविरोध निवड

भारतीय जनता पार्टीचे नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून रवींद्र चव्हाण यांची बिनविरोध निवड झाली. मुंबईतल्या वरळी इथं काल झालेल्या राज्य परिषदेच्या अधिवेशनात केंद्रीय मंत्री किरण रिजीजू यांनी चव्हाण यांना निवडीचं प्रमाणपत्र प्रदान केलं. चव्हाण यांनी मावळते प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून पदाची सूत...

July 1, 2025 8:42 PM

views 33

केंद्र सरकारकडून रोजगार निर्मितीला चालना देणाऱ्या सवलत योजनेची घोषणा

केंद्रीय मंत्रिमंडळानं आज रोजगाराशी संलग्न सवलत योजनेला मंजुरी दिली. या अंतर्गत पहिल्यांदाच नोकरी करणाऱ्यांना १५ हजार रुपयांपर्यंतची रक्कम मिळेल. १ कोटी ९२ लाख युवकांना याचा लाभ मिळेल, अशी आशा माहिती प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी याविषयी माहिती देताना व्यक्त केली.  त्यांना कामावर ठेवणाऱ्या कंप...

July 1, 2025 3:59 PM

views 63

मुंबई विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयातील प्रवेश प्रक्रियेसाठी १० जुलै २०२५ पर्यंत मुदतवाढ

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीच्या अनुषंगानं मुंबई विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयं, स्वायत्त महाविद्यालयं आणि मान्यताप्राप्त शिक्षण संस्थामध्ये २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात राबवण्यात येणाऱ्या प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेसाठी १० जुलै २०२५ पर्यंत मुदतवाढ दिली आहे. याआधी ...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.