राष्ट्रीय

November 11, 2025 7:14 PM

views 90

छत्तीसगढ-महाराष्ट्र सीमेवरच्या बस्तर जंगलात झालेल्या चकमकीत ६ नक्षलवादी ठार

छत्तीसगढ-महाराष्ट्र सीमेवरच्या बस्तर, बिजापूर आणि गडचिरोली जिल्ह्यात असलेल्या जंगलात आज सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांची चकमक झाली. या चकमकीत सहा नक्षलवादी ठार झाल्याची माहिती सुरक्षा दलानं दिली. जिल्हा राखीव सुरक्षा रक्षक, कोब्रा कमांडो आणि स्थानिक पोलिसांनी संयुक्तरित्या ही कारवाई केली.

November 11, 2025 7:09 PM

views 211

सहाव्या राष्ट्रीय जल पुरस्कारांमधे महाराष्ट्राला सर्वोत्तम राज्याचा पुरस्कार

सहाव्या राष्ट्रीय जल पुरस्कार केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांनी आज जाहीर केले. जलसंवर्धन आणि  व्यवस्थापनात सर्वोत्तम राज्याचा पुरस्कार महाराष्ट्राला जाहीर झाला आहे. गुजरात आणि हरियाणाला अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर आहेत. सर्वोत्तम नागरी स्थानिक स्वराज संस्था या श्रेणीत नवी मुंबई म...

November 11, 2025 1:24 PM

views 86

दिल्लीत स्फोट घडवून आणणाऱ्या दोषींवर कठोर कारवाईचा प्रधानमंत्र्यांचा इशारा

दिल्लीत लाल किल्ला परिसरात स्फोट घडवून आणणाऱ्या दोषींवर अत्यंत कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज सांगितलं. भूतान इथं एका कार्यक्रमात ते बोलत होते. काल रात्रीपासून स्फोटाचा तपास करणाऱ्या यंत्रणांकडून सातत्यानं माहिती घेत असून या स्फोटामागच्या खऱ्या सुत्रधाराला तपा...

November 11, 2025 3:17 PM

views 61

दिल्लीत झालेल्या स्फोटानंतर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी उच्चस्तरीय बैठक

लाल किल्ला इथल्या स्फोटानंतर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक झाली. शहा यांच्या निवासस्थानी झालेल्या या बैठकीला केंद्रीय गृह सचिव,  गुप्तचर विभागाचे प्रमुख, दिल्ली पोलिस आयुक्त, राष्ट्रीय तपास संस्थेचे महासंचालक उपस्थित होते. जम्मू आणि का...

November 11, 2025 1:28 PM

views 64

भारत – भूतान यांच्यातले संबंध भविष्यातही वृद्धिंगत होतील – प्रधानमंत्री मोदी

प्रधानमंत्री मोदी दोन दिवसांच्या दौऱ्यासाठी आज सकाळी भूतानमध्ये दाखल झाले. भूतानचे प्रधानमंत्री त्शेरिंग तोबगे यांनी मोदी यांचं विमानतळावर स्वागत केलं. अनेक शतकांपासून भारत आणि भूतान मधले सांस्कृतिक, राजकीय संबंध अतिशय चांगले असून भविष्यातही ते वृद्धिंगत होतील, असा विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ...

November 11, 2025 3:14 PM

views 174

Bihar Elections : दुसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यासाठी मतदानाला सुरुवात

बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यातल्या मतदानाला आज सकाळी सुरुवात झाली. दुपारी १ वाजेपर्यंत ४७ पूर्णांक ६२ टक्के इतकं मतदान झालं होतं.    बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याच्या मतदानासाठी १२२ मतदारसंघात ४५ हजार मतदान केंद्र उभारण्यात आली आहेत. या टप्प्यात १ हजार ३...

November 11, 2025 1:11 PM

views 61

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी भूतानमध्ये दाखल

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या दौऱ्यासाठी आज सकाळी भूतानमध्ये दाखल झाले. भूतानचे प्रधानमंत्री त्शेरिंग तोबगे यांनी यांनी मोदी यांचं विमानतळावर स्वागत केलं. भूतानचे राजे जिग्मे खेसर नामग्याल वांगचूक यांच्या ७० वाढदिवसानिमित्त होणाऱ्या कार्यक्रमात प्रधानमंत्री मोदी प्रमुख पाहुणे म्हणून सहभाग...

November 11, 2025 1:35 PM

views 66

७ राज्यांमधल्या ८ विधानसभा मतदारसंघांत आज पोटनिवडणुक

७ राज्यांमधल्या ८ विधानसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीसाठी आज मतदान सुरू आहे. जम्मू काश्मीरमधे बडगाम आणि नागरोटा, राजस्थानमधे अंता, झारखंडमध्ये घाटशिला, तेलंगणात ज्युबिली हिल्स, पंजाबमध्ये तरनतारन, मिझोराममध्ये डम्पा आणि ओदिशात नुआपाडा या मतदारसंघांसाठी आज मतदान होत आहे. मतमोजणी १४ नोव्हेंबर रोजी म्ह...

November 10, 2025 8:37 PM

views 40

दिल्लीत मेट्रो स्थानकाबाहेर कार स्फोटात ८ ठार, १५ जखमी

नवी दिल्लीत लाल किल्ला परिसरात आज संध्याकाळी सातच्या सुमाराला एका कारमध्ये स्फोट झाला. या स्फोटात ८ जण ठार तर १५ जण जखमी झाल्याचं वृत्त्त आहे. जखमींपैकी तीन जणांची प्रकृती गंभीर आहे. जखमींना लोकनायक रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या स्फोटामुळे आजूबाजूच्या गाड्यांचंही नुकसान झालं आहे. ही गाडी लाल क...

November 10, 2025 6:41 PM

views 29

देशात बेरोजगारीचं प्रमाण ५ पूर्णांक दोन दशांश टक्क्यावर

चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत देशात बेरोजगारीचं प्रमाण कमी झालं आहे. बेरोजगारीचा दर २ दशांश अंकांनी घसरुन ५ पूर्णांक दोन दशांशांवर आला आहे. एप्रिल ते जून या तिमाहीत हा दर ५ पूर्णांक ४ दशांश टक्के होता. केंद्रीय सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने प्रसिद्ध केलेली आकडेवारी सांगते, क...