राष्ट्रीय

September 12, 2024 1:25 PM

views 38

संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भरतेच्या दिशेनं भारताची वाटचाल वेगानं होत असल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचं प्रतिपादन

  संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भरतेच्या दिशेनं भारताची वाटचाल वेगानं होत असल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी म्हटलं आहे. भारतीय हवाई दलातर्फे राजस्थानात जोधपूर इथं आयोजित तरंग शक्ती विमान सरावाची पाहणी केल्यानंतर आज ते बोलत होते. या सरावाच्या निमित्तानं हवाई दलानं आयोजित केलेल्या भारतीय संरक...

September 12, 2024 1:15 PM

views 40

केरळ तिरुअनंतपुरम इथं पाच राज्यांच्या अर्थमंत्र्यांची आज बैठक

केरळ राज्यसरकारने पाच राज्यांच्या अर्थमंत्र्यांची बैठक आज राजधानी तिरुवअनंतपुरम इथं आयोजित केली आहे. केरळ खेरीज तमिळनाडू, कर्नाटक, तेलंगण आणि पंजाब या राज्यांचे अर्थमंत्री त्यात सहभागी होणार आहेत. केंद्र – राज्य संबंधांचा आर्थिक पैलू आणि १६ व्या वित्त आयोगात राज्यांना न्याय्य वाटा मिळवण्याच्या दृष्ट...

September 12, 2024 1:48 PM

views 55

जम्मू – काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यात दारूगोळा आणि स्फोटकांचा मोठा साठा जप्त

जम्मू - काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यात सुरक्षा दलांनी दारूगोळा आणि स्फोटकांचा मोठा साठा जप्त केला आहे. यासंदर्भात मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे लष्कर आणि जम्मू काश्मीर पोलीस यांनी केरन विभागात संयुक्तपणे ही कारवाई केली. त्यात  ए के-47 आणि  आर.पी.जी च्या फैरी तसंच  ई ए डी आणि हातबॉम्ब यांचा मोठा स...

September 12, 2024 1:07 PM

views 61

महाराष्ट्रासह मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशात ४ दिवसांत जोरदार पाऊसाचा अंदाज

महाराष्ट्रासह मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशात काही ठिकाणी आगामी चार दिवसांत जोरदार पाऊस होईल, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागानं व्यक्त केला आहे. तसंच बिहार, ओडिशा, झारखंड, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरा इथे उद्या जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मध्य भारत, कोकण, गोवा आणि गुजरातमध्ये बहुत...

September 12, 2024 11:47 AM

views 45

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी नागरी विमान वाहतुकीवरील दुसऱ्या आशिया-प्रशांत मंत्रीस्तरीय परिषदेला करणार संबोधित

नागरी उड्डाणाशी संबधित आयोजित दुसऱ्या आशिया प्रशांत मंत्रिस्तरीय परिषदेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, आज सहभागी होत आहेत. नागरी उड्डयन मंत्री राममोहन नायडू यांच्या हस्ते काल या संमेलनाचं उद्घाटन झालं. नवी दिल्ली इथं सुरू असलेल्या या संमेलनात प्रधानमंत्री संबोधित करतील. दरम्यान, राममोहन नायडू यांनी २०...

September 12, 2024 10:22 AM

views 35

नागालँडच्या तीन जिल्ह्यांमध्ये अंतर्गत निवास परवाना लागू करायला राज्य सरकारची मंजुरी

नागालँडमध्ये तीन जिल्ह्यांमध्ये अंतर्गत निवास परवाना म्हणजे आयएलपी लागू करायला राज्य सरकारनं मंजुरी दिली आहे. चुमोकेडिमा, निउलँड आणि दिमापूर या जिल्ह्यांमध्ये आयएलपी लागू करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री नेफिऊ रिओ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे नागालँडचे रहिवासी ...

September 12, 2024 8:57 AM

views 65

आयुष्मान भारत जनआरोग्य योजनेची व्याप्ती वाढवण्याचा केंद्रीय मंत्रिमंळाचा निर्णय

  आयुष्मान भारत जनआरोग्य योजनेची व्याप्ती वाढवण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत आता ७० वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना पाच लाख रुपयांपर्यंत मोफत उपचाराचा लाभ मिळणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळानं काल झालेल्या बैठकीत या निर्णयाला मान्यता दिली असल्याचं, केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव या...

September 11, 2024 8:12 PM

views 83

पॅरालिम्पिकमधल्या शीतल देवी आणि राकेश कुमार या क्रीडापटूंची दिव्यांग मतदारांचे राष्ट्रीय प्रणेते म्हणून निवड

भारतीय निवडणूक आयोगानं पॅरालिम्पिकमधल्या नेमबाजी स्पर्धेत  विजेते ठरलेल्या शीतल देवी आणि राकेश कुमार या क्रीडापटूंची दिव्यांग मतदारांचे राष्ट्रीय प्रणेते म्हणून निवड केली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी नवी दिल्ली इथं झालेल्या एका कार्यक्रमात या दोन्ही क्रीडापटूंचा सत्कार करत त्यांची मतद...

September 11, 2024 7:53 PM

views 21

राष्ट्रीय जनता दल झारखंड विधानसभा निवडणुकीसाठी इंडिया महायुतीत सामील होणार

झारखंडमधल्या  विधानसभेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रीय जनता दलानं इंडिया महायुतीत सामील व्हायचं ठरवलं आहे.  आरजेडीच्या नेत्यांच्या  रांची इथं आज झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. काँग्रेस आणि  झारखंड मुक्ती मोर्चाच्या नेत्यांशी चर्चा करून आरजेडी आपल्या उमेदवारांची नावं निश्चित करणार आहे. आरजेडीच्या ...

September 11, 2024 8:26 PM

views 43

तेलंगणा जिल्ह्यात झालेल्या नुकसानीची केंद्रीय समिती पाहणी करणार

तेलंगणा राज्यात अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेल्या नुकसानीचा अंदाज घेण्यासाठी सहा सदस्यीय केंद्रीय समिती लवकरच पाहणी करणार आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाचे सहसचिव कर्नल कीर्ती प्रताप सिंग हे या समितीचं नेतृत्व करतील. समितीनं आज सकाळी हैदराबाद इथल्या सचिवालयातल्या जेष्ठ सरकारी अधिकाऱ्यांशी आणि तेलंगणा राज्...