राष्ट्रीय

October 5, 2024 8:32 PM

views 58

हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी संध्याकाळी पाच वाजेपर्यंत ६१ टक्के मतदान

हरयाणा विधानसभेच्या सर्व ९० जागांच्या निवडणुकीसाठी आज शांततेत आणि सुरळीत मतदान झालं. या निवडणुकीसाठी रिंगणात असलेल्या एक हजार ३१ उमेदवारांचे भवितव्य आज मतपेटीत बंद झालं.   या निवडणुकीसाठी संध्याकाळी पाच वाजेपर्यंत अंदाजे सरासरी  ६१ टक्के मतदानाची नोंद झाली असल्याचं तिथल्या निवडणूक प्रशासनानं कळ...

October 4, 2024 8:10 PM

views 40

१५ आणि १६ ऑक्टोबरला शांघाय सहकार्य संघटनेची शिखरपरिषद

  शांघाय सहकार्य संघटनेची शिखरपरिषद येत्या १५ आणि १६ ऑक्टोबरला पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद इथं होणार असून भारताचं प्रतिनिधी मंडळ परराष्ट्रव्यवहार मंत्री डॉ. एस जयशंकर यांच्या नेतृत्वाखाली त्यात सहभागी होणार आहे. परराष्ट्रव्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी आज नवी दिल्लीत वार्ताहरपरिष...

October 4, 2024 7:53 PM

views 21

मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समधे ८०९ अंकांची घसरण

  गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजारात सुरू असलेली घसरण आजही कायम राहिली. दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ८०९ अंकांनी घसरुन ८१ हजार ६८८ अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही २३६ अंकांची घसरण नोंदवून २५ हजार १५ अंकांवर बंद झाला.

October 4, 2024 5:41 PM

views 25

तिरुपती प्रसाद भेसळ प्रकरणी चौकशी करण्यासाठी विशेष पथक नेमण्याचे आदेश

तिरुपती मंदिरातल्या प्रसादात भेसळयुक्त तूप वापरल्या प्रकरणी आरोपांची चौकशी करण्यासाठी स्वतंत्रपणे विशेष तपास पथक नेमण्याचे आदेश आज सर्वोच्च न्यायालयाने दिले. या पथकात दोन सीबीआय अधिकारी आणि आंध्र प्रदेश पोलीस खात्याचे दोन अधिकारी तसंच FSSAI च्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याचा समावेश असेल.

October 4, 2024 2:36 PM

views 29

स्वातंत्र्यप्राप्तीच्या शतकमहोत्सवापर्यंत भारत नवकल्पना, तंत्रज्ञान आणि संस्कृतींच्या देवाणघेवाणीचं केंद्र बनलेला असेल असं केंद्रीय अर्थमंत्र्यांचं प्रतिपादन

भारतीय स्वातंत्र्याला २०४७ मध्ये शंभर वर्षं पूर्ण होत असताना विकसित झालेला भारत हा नवकल्पना, तंत्रज्ञान आणि संस्कृतींच्या देवाणघेवाणीचं केंद्र बनलेला असेल असं प्रतिपादन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज नवी दिल्ली इथं केलं. कौटिल्य इकोनॉमिक कॉनक्लेव्हच्या तिसऱ्या आवृत्तीत त्या बोलत होत्य...

October 4, 2024 12:38 PM

views 51

परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस. जयशंकर यांचा आज श्रीलंका दौरा

परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस. जयशंकर आज श्रीलंकेच्या अधिकृत दौऱ्यावर जात आहेत. त्यांच्या या दौऱ्यात ते श्रीलंकेच्या नेतृत्वाची भेट घेणार आहेत. भारताच्या शेजारधर्म प्रथम या धोरणानुसार तसंच सागर दृष्टिकोनाला अनुसरून दोन्ही देशांचे पूर्वीपासूनचे संबंध अधिक बळकट करण्याच्या सामायिक बांधिलकीवर या दौऱ्य...

October 4, 2024 12:13 PM

views 51

कृषी क्षेत्रासाठी 1 लाख कोटी रुपयांची तरतूद अससेल्या दोन योजनांना केंद्रिय मंत्रीमंडळाची मंजुरी

शाश्वत कृषी क्षेत्रासाठी पंतप्रधान राष्ट्रीय कृषी विकास योजना आणि अन्नसुरक्षेसाठी स्वयंपूर्ण होण्याच्या उद्देशाने कृषि उन्नती योजना अशा दोन योजनांना केंद्रिय मंत्रीमंडळाने काल मंजुरी दिली. या दोनही योजनांसाठी एकंदर 1 लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याची माहिती केंद्रिय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी...

October 4, 2024 11:30 AM

views 43

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज संध्याकाळी नवी दिल्लीत कौटिल्य आर्थिक परिषदेला करणार संबोधित

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज संध्याकाळी नवी दिल्लीत कौटिल्य आर्थिक परिषदेला संबोधित करणार आहेत. आजपासून ६ ऑक्टोबरपर्यंत चालणाऱ्या या परिषदेची ही तिसरी आवृत्ती आहे. हरित कार्यपध्दतीला अर्थसहाय्य, जैव-आर्थिक क्षेत्राला प्रोत्साहन देणं आणि विकासावर होणारे परिणाम, पर्यावरणपूरक बदल टिकवून ठेवण्यासाठी धोर...

October 4, 2024 2:25 PM

views 51

हरयाणा विधानसभा निवडणुकीसाठीची पूर्वतयारी पूर्ण

हरयाणा विधानसभा निवडणुकीसाठीची पूर्वतयारी पूर्ण झाली आहे. हरयाणात ९० मतदारसंघांसाठी उद्या एकाच टप्प्यात निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी १ हजार ३१ उमेदवार रिंगणात आहेत. उद्या सकाळी सात ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदानाची वेळ असेल. राज्यातले २ कोटी ३ लाख ५४ हजारहून अधिक मतदार उमेदवारांचं भविष्य ठरवती...

October 3, 2024 8:28 PM

views 65

प्रधानमंत्र्यांना देश विदेशात भेट स्वरूपात मिळालेल्या वस्तूंच्या  इ-लिलावाची तारीख ३१ ऑक्टोबर

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना देश विदेशात भेट स्वरूपात मिळालेल्या वस्तूंच्या  इ- लिलावाची तारीख आता ३१ ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. पूर्वी हा लिलाव १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत होणार होता. या लिलावातून मिळणारा निधी नमामि गंगे प्रकल्पासाठी वापरला जाणार असल्यामुळे नागरिकांनी मोठया संख्ये...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.