राष्ट्रीय

October 6, 2024 1:53 PM

views 63

DRDO च्या राजस्थानमधल्या पोखरण इथं ४ क्षेपणास्त्रांची यशस्वी चाचण्या

कमी अंतरावर लक्ष्य़भेद करण्यासाठीच्या ४ क्षेपणास्त्रांची चाचणी काल राजस्थानात पोखरण इथं यशस्वी झाली. गेल्या दोन दिवसांमध्ये ही चाचणी पार पडली. या चाचणीमधून या क्षेपणास्त्रांची विविध प्रकारे मारा करण्याची क्षमता सिद्ध झाल्याचं संरक्षण मंत्रालयाने म्हटलं आहे. ही क्षेपणास्त्रं डीआरडीओच्या प्रयोगशाळेत तय...

October 6, 2024 1:12 PM

views 47

हरियाणा विधानसभा निवडणुकीत सुमारे ६७ टक्के मतदान

हरियाणा विधानसभा निवडणुकीची मतमोजणी  मंगळवारी होणार आहे. हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी काल सुमारे ६७ टक्के मतदान झालं. विधानसभेच्या ९० जागांसाठी एकाचं टप्प्यातलं मतदान शांततेत झालं. या निवडणुकीत ८५ वर्षांवरच्या मतदार आणि दिव्यांग व्यक्तींसाठी घरपोच मतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. मतदान...

October 6, 2024 1:52 PM

views 25

एक देश एक निवडणुकीचा देशाला मोठा फायदा होईल – माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद

'एक देश एक निवडणूक' पद्धतीचा  भारताला खूप मोठा फायदा होईल असं प्रतिपादन माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केलं आहे.  ते काल नवी दिल्ली एक देश एक निवडणूक या विषयावर ३० व्या लाल बहादूर शास्त्री स्मृती व्याख्यानात बोलत होते. एक देश एक निवडणूक पद्धतीमुळे उत्तम प्रशासन, धोरणात्मक स्थिरता, सामाजिक एकोपा...

October 6, 2024 1:02 PM

views 24

मालदीवचे राष्ट्रपती डॉ. मोहम्मद मुइज्जू पाच दिवसांच्या भारत दौऱ्यावर

मालदीवचे राष्ट्रपती डॉ मोहम्मद मुइज्जू आजपासून  पाच दिवसांच्या भारत दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यात ते राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेणार आहेत. त्याचबरोबर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याशी द्विपक्षीय, प्रादेशिक आणि परस्पर हिताच्या आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवरदेखील ते चर्चा करणार आहेत. मुईज्जू ...

October 5, 2024 8:42 PM

views 10

नवी दिल्लीत देशातले आघाडीचे पुरातत्वशास्त्रज्ञ, संग्रहालय शास्त्रज्ञ आणि इतिहासकारांची बैठक

केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी आज नवी दिल्ली इथं देशातले आघाडीचे पुरातत्वशास्त्रज्ञ, संग्रहालय शास्त्रज्ञ आणि इतिहासकारांची बैठक घेतली. भारताच्या प्राचीन सागरी इतिहासाचं दस्तावेजीकरण आणि उत्सवीकरण करण्याबाबत या बैठकीत भर देण्यात आला. भारताचा सागरी इतिहास हा केवळ...

October 5, 2024 8:39 PM

views 51

आगामी शांघाय सहकार्य संघटना परिषदेत भारत पाकिस्तानसोबत असलेल्या संबंधांबाबत कोणतीही चर्चा करणार नसल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांचं प्रतिपादन

आगामी शांघाय सहकार्य संघटना परिषदेत भारत पाकिस्तानसोबत असलेल्या संबंधांबाबत कोणतीही चर्चा करणार नसल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्लीत माध्यमांशी संवाद साधताना बोलत होते. सार्कमध्ये गेल्या काही वर्षात बैठकांचं आयोजन न झाल्याने कोणतीही प्रगती साध्य झाली नाही अ...

October 5, 2024 7:38 PM

views 30

विकसित भारत आणि विकसित महाराष्ट्रासाठी एकत्रितरित्या काम करण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं आवाहन

  सर्वजण एकत्र राहून विकसित भारत आणि विकसित महाराष्ट्रासाठी काम करू, असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज वाशिममधल्या पोहरा देवी इथं केलं. राज्यातल्या डबल इंजिन ८सरकारनं नागरिकांच्या विकासासाठी अनेक निर्णय घेतले आहेत. नदी जोड प्रकल्पाचा शेतकऱ्यांना फायदा होईल, असं ते म्हणाले.   प्रधानमं...

October 5, 2024 3:01 PM

views 42

छत्तीसगढमधे सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत ठार झालेल्या नक्षलवाद्यांची संख्या ३१ वर

छत्तीसगढ मध्ये नारायणपूर जिल्ह्यात सुरक्षा दलांनी आणखी तीन नक्षलवाद्यांचे मृतदेह ताब्यात घेतले आहेत. त्यामुळे या चकमकीत ठार झालेल्या नक्षलवाद्यांची संख्या ३१ झाली आहे. नारायणपूर जिल्ह्यातल्या दक्षिण अबुझमाड भागात काल दुपारी माओवादी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर राज्य सुरक्षा दल आणि विशेष सुरक्षा दल य...

October 5, 2024 10:51 AM

views 72

जगाच्या विविध भागांमध्ये लवकरच सुरू होणार भारताचे पाच सेमीकंडक्टर प्लांट

जगाच्या विविध भागांमध्ये भारताचे पाच सेमीकंडक्टर प्लांट लवकरच सुरू होणार असून येत्या काही काळात भारतीय बनावटीच्या चिप्स जगाला उपलब्ध होतील असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल सांगितलं. दिल्लीत झालेल्या कौटिल्य आर्थिक परिषदेला ते काल संबोधित करत होते.   भारताचे स्थान मोबाईल आयातदार...

October 5, 2024 11:33 AM

views 67

प्रधानमंत्री आज वाशिम तसंच ठाणे दौऱ्यावर-विविध प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज वाशिम तसंच ठाणे जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात वाशिम इथं २३ हजार ३०० कोटी रुपयांच्या तर ठाणे इथं ३२ हजार ८०० कोटी रुपयांच्या विविध नागरी विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी प्रधानमंत्र्यांच्या च्या हस्ते होणार आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा १८ वा हप्ता या...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.