राष्ट्रीय

June 10, 2025 1:11 PM

views 37

प्रधानमंत्र्यांच्या नेतृत्वात भारतानं विकास आणि सुशासन अनुभवलं – केंद्रीय मंत्री डॉ. एल. मुरुगन

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या ११ वर्षांत भारताने लक्षणीय विकास आणि सुशासन अनुभवल्याचं प्रतिपादन माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन यांनी केलं आहे. ते आज रालोआ सरकारच्या ११ वर्षांच्या पूर्ततेनिमित्त पुद्दुचेरी इथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. जो देश भ्रष्टाचार ...

June 9, 2025 8:29 PM

views 38

गेल्या अकरा वर्षांत केंद्र सरकारनं लोककेंद्री आणि सर्वांगीण प्रगतीला प्राधान्य दिल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन

गेल्या ११ वर्षांत १४० कोटी भारतीयांच्या सामूहिक सहभागामुळे देशानं विविध क्षेत्रांमध्ये परिवर्तन घडवून आणलं आहे, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावर केलं आहे. गेल्या अकरा वर्षांत सरकारनं लोककेंद्री आणि सर्वांगीण प्रगतीला प्राधान्य दिल्याचं मोदी यांनी म्हटलं आहे.    गेल्य...

June 9, 2025 3:37 PM

views 27

अलमट्टी धरणाची उंची वाढवण्यासंदर्भात ४ लाभार्थी राज्यांची १८ जूनला बैठक

कर्नाटकातल्या अलमट्टी धरणाची उंची वाढवण्यासंदर्भात केंद्र सरकारने कर्नाटकसह महाराष्ट्र, आंध्रप्रदेश आणि तेलंगणा या ४ लाभार्थी राज्यांची १८ जून रोजी बैठक बोलावली आहे. केंद्रीय जलसंपदा मंत्री सी.आर. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होईल.    कृष्णा पाणी वाटप लवादाने २०१३ साली कर्नाटक सरकारच्या ...

June 9, 2025 3:14 PM

views 59

जम्मू काश्मीरसह देशाच्या उत्तर भागात उष्णतेच्या लाटेची शक्यता

जम्मू काश्मीरमध्ये सांबा आणि जम्मू इथं उष्णतेची लाट आली असून गेल्या तीन दिवसांपासून तापमान ४० अंश सेल्सिअसच्या वर आहे. सांबा इथं काल ४३ पूर्णांक ९ अंश सेल्सिअस तर जम्मू मध्ये ४२ पूर्णांक ७ अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आलं. येत्या पाच दिवसात जम्मू आणि परिसरात उष्णतेची लाट कायम राहील, असा अंदाज हवाम...

June 9, 2025 3:33 PM

views 45

दिवा-मुंब्रा स्थानकादरम्यान उपनगरी रेल्वेगाडीतून पडून ४ प्रवाशांचा मृत्यू, ९ जखमी

मध्य रेल्वेच्या दिवा आणि मुंब्रा स्थानकादरम्यान कसाऱ्याहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणाऱ्या उपनगरी रेल्वेगाडीतून पडून आज चार प्रवाशांचा मृत्यू झाला तर नऊ जण जखमी झाले. कसाऱ्याकडे जाणाऱ्या गाडीतून दारात लटकून जाणारे प्रवासी विरुद्ध दिशेने येणाऱ्या गाडीच्या दरवाजात लटकलेल्या प्रवाशांना धडकल्य...

June 9, 2025 2:56 PM

views 48

खासदार शशी थरूर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ अंतिम टप्प्यात

काँग्रेस खासदार शशी थरूर यांच्या नेतृत्वाखाली अमेरिकेला गेलेल्या शिष्टमंडळानं काल अंतिम टप्प्यात वॉशिंग्टनमध्ये अमेरिकेचे उपाध्यक्ष जे. डी. व्हान्स आणि उप परराष्ट्रमंत्री क्रिस्टोफर लँडौ यांच्यासह विविध राजकीय नेत्यांची भेट घेतली आणि सीमापार दहशतवादाबद्दल भारताच्या भूमिकेविषयी माहिती दिली. हे शिष्टम...

June 9, 2025 1:44 PM

views 33

मोदी सरकारने प्रत्यक्ष कामगिरी, जबाबदारी आणि प्रतिसादाला महत्त्व दिलं – केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारने देशाची राजकीय संस्कृती बदलली असून प्रत्यक्ष कामगिरी, जबाबदारी आणि प्रतिसाद याला महत्त्व दिलं असल्याचं भाजपा अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री जे पी नड्डा यांनी आज सांगितलं. मोदी सरकारला ११ वर्ष पूर्ण होत असल्यानिमित्त नवी दिल्लीत आयोजित पत्रकारपरिषदेत...

June 9, 2025 1:36 PM

views 51

१४० कोटी भारतीयांच्या सहभागामुळे देशाने विविध क्षेत्रांमध्ये परिवर्तन घडवून आणलं – प्रधानमंत्री

गेल्या ११ वर्षांत १४० कोटी भारतीयांच्या सामूहिक सहभागामुळे देशाने विविध क्षेत्रांमध्ये परिवर्तन घडवून आणलं आहे, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास हे तत्व अंगिकारून रालोआ सरकारने आर्थिक वाढीपासून ते साम...

June 9, 2025 2:29 PM

views 58

DRDOच्या वाहन संशोधन आणि विकास संस्थेकडून ९ संरक्षण प्रणालींचं तंत्रज्ञान १० भारतीय उद्योगांकडे हस्तांतरित

महाराष्ट्रातील अहिल्यानगर इथल्या संरक्षण संशोधन आणि विकास संघटना अर्थात डीआरडीओच्या वाहन संशोधन आणि विकास संस्थेनं नऊ संरक्षण प्रणालींचं तंत्रज्ञान 10 भारतीय उद्योगांना हस्तांतरित केलं आहे. या प्रणालींमध्ये रसायनिक, जैविक, किरणोत्सारी, अण्विक, रेकी वाहन, माउंटेड गन सिस्टीम, दहशतवादी-विरोधी वाहन आणि ...

June 8, 2025 8:13 PM

views 32

लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी उत्तराखंडमधल्या गढवाल परिसराला दिली भेट

लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी आज उत्तराखंडमधल्या गढवाल परिसराला भेट देऊन कार्मिक सज्जतेचा आढावा घेतला. सरहद्दीजवळ देशाच्या रक्षणासाठी तैनात सैनिकांशी त्यांनी संवाद साधला आणि त्यांच्या समर्पित सेवेचं कौतुक केलं. सतर्कता आणि सज्जता उच्च दर्जाची राखण्यावर त्यांनी भर दिला. ज्योतिर्मठ इथं आयबेक...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.