आंतरराष्ट्रीय

August 24, 2025 3:13 PM

views 35

युक्रेननं गेल्या आठवड्यात केलेल्या हल्ल्यांमध्ये २२ जण ठार

गेल्या २४ तासांत युक्रेनचे चार हवाई बॉम्ब आणि १६० ड्रोन्स पाडल्याची माहिती रशियानं दिली आहे. युक्रेननं गेल्या एका आठवड्यात केलेल्या बॉम्ब आणि ड्रोन हल्ल्यांमध्ये २२ जण ठार झाल्याची आणि १०५ इतर जखमी झाल्याचंही रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयानं निवेदनाद्वारे सांगितलं आहे.

August 24, 2025 1:21 PM

views 43

फिजीचे प्रधानमंत्री आजपासून भारताच्या तीन दिवसांच्या दौऱ्यावर

फिजीचे प्रधानमंत्री सिटीवेनी लिगामामाडा राबुका आजपासून भारताच्या तीन दिवसांच्या दौऱ्यावर आले आहेत. केंद्रीय शिक्षण राज्य मंत्री सुकांता मजुमदार यांनी आज सकाळी विमानतळावर त्यांचं  स्वागत केलं. फिजीच्या प्रधानमंत्र्यांची पत्नी तसंच त्यांचे आरोग्य मंत्री रातू अटोनियो लालाबालावू आणि इतर अधिकाऱ्यांचं शिष...

August 23, 2025 1:05 PM

views 65

न्यूयॉर्क स्टेट थ्रूवे इथं एका प्रवासी बसचा अपघात होऊन 5 जणांचा मृत्यू

न्यूयॉर्कच्या पश्चिम भागातल्या न्यूयॉर्क स्टेट थ्रूवे इथं एका प्रवासी बसचा अपघात होऊन पाच जणांचा मृत्यू झाला आहे. नायगारा फॉल्सकडून न्यूयॉर्ककडे जाताना चालकाचं नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाला.   बसमध्ये ५२ प्रवासी होते, काहींना बसमधून बाहेर काढण्यात यश आलं आहे तर काही जण अद्यापही बसमध्ये अडकल्...

August 23, 2025 12:47 PM

views 42

ट्रम्प यांचे माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांच्या घरी आणि कार्यालयांवर FBIचे छापे

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांच्या घरी आणि कार्यालयांवर FBIनं छापे टाकले आहेत. त्यांच्यावर गुप्त माहितीचा दुरुपयोग केल्याचा आरोप आहे.   २०१९ मध्ये ट्रम्प यांची साथ सोडल्यानंतर बोल्टन हे ट्रम्प यांचे टीकाकार झाले आहेत. याप्रकरणी बोल्ट...

August 23, 2025 12:43 PM

views 44

सर्जिओ गोर यांची अमेरिकेचे भारतातले नवे राजदूत म्हणून नियुक्ती

 अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सर्जिओ गोर यांची अमेरिकेचे भारतातले नवे राजदूत म्हणून नियुक्ती केली आहे. दक्षिण आणि मध्य आशियासाठी विशेष दूत म्हणूनही ते काम करतील. अमेरिकेला पुन्हा महान करण्याचं आपलं ध्येय साध्य करण्यासाठी गोर यांच्यासारख्या व्यक्तीची गरज होती, असं ट्रम्प यांनी म्हटलं आहे.

August 22, 2025 1:31 PM

views 90

कोलंबियात झालेल्या २ हल्ल्यात किमान १८ लोकांचा मृत्यू

कोलंबियात झालेल्या २ हल्ल्यात किमान १८ लोकांचा मृत्यू झाला तर ४० हून अधिक जण जखमी झाले आहेत. कोलंबियन एरोस्पेस फोर्सच्या तळाजवळ एका स्फोटकांनी भरलेल्या वाहनाचा स्फोट होऊन ही दुर्घटना घडली. कोलंबियाचे अध्यक्ष गस्टाव पेत्रोने यांनी या हिंसाचाराचा निषेध केला आहे. यात कोलंबियाच्या क्रांतिकारी सशस्त्र दल...

August 21, 2025 1:24 PM

views 89

गाझा शहरावर ताबा घेण्यासाठी लष्करी कारवाई सुरु केल्याची इस्रायलची घोषणा

गाझा शहरावर ताबा घेण्यासाठी आपण पहिल्या टप्प्यातली लष्करी कारवाई सुरु केल्याचं इस्रायलच्या लष्करानं एका निवेदनाद्वारे घोषित केलं आहे. इस्रायलचे संरक्षण मंत्री इस्रायल काट्झ यांनी काल या निर्णयाला मंजुरी दिली असून, या आठवड्याच्या अखेरीला इस्रायलच्या सुरक्षा मंत्रिमंडळाकडून त्याचा आढावा घेतला जाईल, अस...

August 21, 2025 3:53 PM

views 45

भारत आणि रशियामध्ये परस्पर सहकार्याच्या अनेक संधी उपलब्ध – मंत्री एस. जयशंकर

भारत आणि रशिया विविध क्षेत्रात एकत्र कार्य करत असून त्यामुळे परस्पर सहकार्याच्या अनेक संधी उपलब्ध झाल्या आहेत, असं परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांनी म्हटलं आहे. ते आज मॉस्कोत भारत रशिया व्यावसायिक फोरममध्ये बोलत होते. उद्योजकांनी आता अधिकाधिक व्यवसाय करावा त्याचप्रमाणे गुंतवणूक आणि सहकार्य क...

August 21, 2025 12:52 PM

views 25

पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत

पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात गेले काही दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे सिंधू नदीच्या पाणी पातळीत लक्षणीय वाढ झाली असून सखल भागातल्या गावांमधले हजारो नागरिक विस्थापित झाले आहेत. पुराच्या पाण्यामुळे या भागातलं पशुधनही बाधित झालं आहे.    सरगोधा, फैसलाबाद, आणि इतर शहरांमध्ये तसंच लाहोर, गुजरांव...

August 21, 2025 12:35 PM

views 52

फिजीचे प्रधानमंत्री तीन दिवसांच्या भारत दौऱ्यावर

फिजीचे प्रधानमंत्री सितीवेनी लिगामामदा राबुका रविवारी तीन दिवसांच्या भारत दौऱ्यावर येत आहेत. ते सोमवारी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करतील असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं म्हटलं आहे. राबुका राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचीही भेट घेणार आहेत. दोन्ही देशातील संबंध अधिक बळकट करण्यासाठी राब...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.