आंतरराष्ट्रीय

October 12, 2025 2:24 PM

views 73

मादागास्करमध्ये राष्ट्राध्यक्ष अँड्री राजोएलिना यांच्या राजवटीला विरोध दर्शवण्यासाठी राजधानी अँतानानारिव्होमध्ये निदर्शनं सुरू

मादागास्करमध्ये राष्ट्राध्यक्ष अँड्री राजोएलिना यांच्या राजवटीला विरोध दर्शवण्यासाठी लष्कराच्या काही गटांनी राजधानी अँतानानारिव्होमध्ये निदर्शनं सुरू केली आहेत. वीज आणि पाण्याच्या टंचाईमुळे संतप्त होऊन, मादागास्कर मधल्या तरुणाईनं सरकार विरोधी आंदोलन छेडलं असून, काल त्याचा उद्रेक झाला, आणि हजारो निदर...

October 12, 2025 2:21 PM

views 63

पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमेवर तीव्र संघर्ष सुरु

तालिबाननं पाकिस्तानी लष्करी चौक्यांवर काल रात्री केलेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमेवर तीव्र संघर्ष सुरु झाला आहे. पाकिस्ताननं अफगाणिस्तानची राजधानी काबूलसह अन्य ठिकाणी केलेल्या हवाई हल्ल्यांना तालिबानी लष्करानं प्रत्युत्तर दिलं असून, बहरामपूर जिल्ह्यातल्या डुरंड रेषेजवळ अफगाण सैन्यानं क...

October 12, 2025 2:10 PM

views 41

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नागालँडमध्ये एकात्मिक अ‍ॅक्वा पार्कची दूरस्थ पद्धतीने पायाभरणी केली.

प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेअंतर्गत नागालँडमधील मोकोकचुंग जिल्ह्यात त्झुडिकोड इथं एकात्मिक मत्स्य उद्यान-ॲक्वा पार्कची पायाभरणी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल दूरस्थ पद्धतीनं केली. नागालँडमधील हे पहिले मत्स्य उद्यान ठरणार असून ते मत्स्य व्यवसायाशी संबंधित विविध विकास उपक्रमांचं केंद्र असेल. ...

October 12, 2025 1:41 PM

views 66

ऑस्कर विजेती अभिनेत्री डायन कीटन यांचे निधन

ऑस्कर विजेती अभिनेत्री डायन कीटन यांचं काल कॅलिफोर्नियामध्ये निधन झालं. त्या ७९ वर्षांच्या होत्या. १९७७ सालच्या ‘अ‍ॅनी हॉल’ या चित्रपटातली ऑस्कर पुरस्कार विजेती भूमिका आणि ‘द गॉडफादर’ या चित्रपटातली त्यांची भूमिका प्रेक्षकांच्या स्मरणात राहिली. कीटन यांनी ६०पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केलं होतं....

October 12, 2025 12:52 PM

views 62

कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री अनिता आनंद १७ ऑक्टोबरपर्यत भारत, सिंगापूर आणि चीन दौऱ्यावर

कॅनडाच्या हिंद प्रशांत धोरणाचा भाग म्हणून कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री अनिता आनंद आजपासून १७ ऑक्टोबरपर्यत भारत, सिंगापूर आणि चीन दौऱ्यावर येत आहेत. भारत दौऱ्यामध्ये त्या परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर आणि वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांची भेट घेतील. तसंच कॅनडा आणि भारत दोन्ही देशांमध्ये ...

October 12, 2025 10:25 AM

views 76

अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री मौलवी अमीर खान मुत्ताकी आज आग्रा येथील ताजमहालला भेट देणार

अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री मौलवी अमीर खान मुत्ताकी आज आग्रा येथील ताजमहालला भेट देणार आहेत. ते आठवडाभराच्या राजनैतिक दौऱ्यावर भारतभेटीसाठी आलेले आहेत. दिल्लीमध्ये वाणिज्य संघटनेने आयोजित केलेल्या उद्योग आणि व्यवसाय प्रतिनिधींच्या बैठकीतही ते सहभागी होतील. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल या...

October 12, 2025 9:57 AM

views 71

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे भारतातील राजदूत सर्जिए गोर यांची दिल्लीत भेट

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल अमेरिकेचे भारतातील राजदूत सर्जिए गोर यांची भेट घेतली. गोर यांच्या कार्यकाळात भारत-अमेरिका यांच्यातील व्यापक जागतिक धोरणात्मक भागीदारी अधिक भक्कम होईल असा विश्वास प्रधानमत्र्यांनी समाज माध्यमांवरील संदेशात व्यक्त केला आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर आणि गो...

October 10, 2025 1:35 PM

views 77

पाकिस्तान – अफगाणिस्तानमध्ये तणाव

काबुलमध्ये काल झालेल्या स्फोटांनंतर पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधला तणाव वाढला आहे. या स्फोटांमुळे पूर्व काबुलमध्ये सरकारी कार्यालयं तसंच निवासी भागात घबराट पसरली. पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा असिफ यांच्या सभेनंतर काही तासांत ही घटना घडली. या स्फोटांची जबाबदारी अद्याप कुणीही घेतलेली नाही.

October 10, 2025 9:47 AM

views 133

गाझा शांतता कराराला मान्यता दिल्याबद्दल प्रधानमंत्री मोदींकडून अमेरिका-इस्रायलचं कौतुक

गाझा शांतता कराराला मान्यता दिल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप आणि इस्रायलचे प्रधानमंत्री बेंजामिन नेतान्याहू यांचं अभिनंदन केलं आहे. ओलिसांची सुटका, इस्रायली सैन्याची माघार घेण्याचा आणि गाझाला मानवतावादी मदत साहित्याचा पुरवठा करण्याचा मार्ग मोकळा झाल्...

October 9, 2025 8:42 PM

views 38

भारतातून मोठी गुंतवणूक मिळेल अशी ब्रिटनचे प्रधानमंत्री कीर स्टार्मर यांना आशा

भारत आणि ब्रिटन हे नैसर्गिक भागीदार असून लोकशाही, स्वातंत्र्य आणि कायद्याचं राज्य या मूल्यांवरचा विश्वास हा या भागीदारीचा पाया असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. मुंबईत आज राजभवनात ब्रिटनचे प्रधानमंत्री कीर स्टार्मर यांच्याशी प्रतिनिधी मंडळस्तरावर चर्चा झाल्यानंतर ते संयुक्तपणे पत्...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.