आंतरराष्ट्रीय

October 29, 2025 1:33 PM

views 90

इस्रायलनं गाझावर केलेल्या हल्ल्यात ३३ पॅलेस्टिनी नागरिक ठार

इस्रायलनं गाझावर आज केलेल्या हल्ल्यात किमान ३३ पॅलेस्टिनी नागरिक ठार झाले.  हमासनं गाझात इस्राएली सैनिकांवर हल्ला केल्यावर आणि मरण पावलेल्या ओलिसांचे मृतदेह परत देण्याचं नाकारल्यावर हे पाऊल उचलल्याचं इस्राएलचे संरक्षण मंत्री इस्राएल कात्झ यांनी सांगितलं. हमासनं हे आरोप फटाळून लावले आहेत. इस्राएलचे प...

October 28, 2025 8:13 PM

views 45

जपानचे माजी प्रधानमंत्री शिंजो अबे यांच्या हत्येप्रकरणी आरोपीची कबुली

जपानचे माजी प्रधानमंत्री शिंजो अबे यांच्या हत्येप्रकरणी आरोपी तेत्सुया यामागामी यानं आज न्यायालयात गुन्ह्याची कबुली दिली. ८ जुलै २०२२ रोजी जपानमध्ये नारा इथं निवडणूक प्रचारसभेदरम्यान यामागामीनं शिंजो अबे यांच्यावर गोळ्या झाडल्या होत्या. या हल्ल्यानं संपूर्ण देश हादरून गेला होता आणि युनिफिकेशन चर्चकड...

October 28, 2025 2:29 PM

views 56

सेशेल्सचा दौरा पूर्ण करून उपराष्ट्रपती मायदेशी परतले

सेशेल्सचा दौरा पूर्ण करून उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन आज मायदेशी परतले. सेशेल्सचे नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ. पॅट्रिक हर्मिनी यांच्या शपथविधी समारंभात सहभागी होण्यासाठी ते सेशेल्स इथे गेले होते. या भेटी दरम्यान राधाकृष्णन यांनी हर्मिनी तसंच उपाध्यक्ष सबॅस्टियन पिल्लई यांची भेट घेतली. या भेटीत त्यांन...

October 28, 2025 9:35 AM

views 197

डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाच्या अणुऊर्जेवर चालणाऱ्या क्षेपणास्त्र चाचणीवर टीका

रशिया आणि अमेरिकेतील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी अणुऊर्जेवर चालणाऱ्या क्रूझ क्षेपणास्त्र चाचणीची केलेली घोषणा योग्य नसल्याचं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी म्हटलं आहे.  रशियाने त्यांच्या अणुऊर्जेवर चालणाऱ्या बुरेव्हेस्टनिक क्रूझ क्षेपणास्त्राची यशस्वी...

October 27, 2025 7:49 PM

views 56

जगानं दहशतवादाप्रती शून्य सहिष्णुता धोरण अवलंबवायला हवं-एस जयशंकर

जागतिक स्थैर्य आणि शांततेला सर्वात जास्त धोका दहशतवादापासून आहे, त्यामुळे जगानं दहशतवादाप्रती शून्य सहिष्णुता धोरण अवलंबवायला हवं असं परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी म्हटलं आहे.  मलेशियातील क्वालालंपूर इथं २०  व्या पूर्व आशिया शिखर परिषदेला ते आज संबोधित करत होते. दहशतवादाशी अजिबात तडजोड के...

October 27, 2025 7:29 PM

views 68

अर्जेंटिनात ला लिब्रेटाड एवेंजा पक्षानं निर्णायक बहूमत मिळवलं

अर्जेंटिनात झालेल्या मध्यावधी निवडणुकीत राष्ट्राध्यक्ष जेविअर मिलेई यांच्या नेतृत्वाखालील ला लिब्रेटाड एवेंजा पक्षानं निर्णायक बहूमत मिळवलं आहे. त्यांच्या पक्षाला ४१ टक्के मत मिळाली असून त्यांनी कायदेमंडळातल्या २४ पैकी १३ तर खालच्या सभागृहातील १२७ पैकी ६४ जागा जिंकल्या आहेत. अर्जेंटिनाच्या नागरिकांन...

October 26, 2025 8:32 PM

views 45

२१वं शतक हे भारताचं आणि आसियानचं शतक-प्रधानमंत्री

२१वं शतक हे भारताचं आणि आसियानचं शतक आहे, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं. आसियान-भारत शिखर परिषदेला त्यांनी दूरस्थ पद्धतीनं संबोधित केलं. भारत आणि आसियान, हे संयुक्तरीत्या जगाच्या जवळपास एक चतुर्थांश लोकसंख्येचं प्रतिनिधित्व करतात, असं त्यांनी सांगितलं. या दोघांमधले संबंध फक्त...

October 26, 2025 7:36 PM

views 33

पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये संयुक्त देखरेख यंत्रणा उभारण्यावर चर्चेची दुसरी फेरी पार

पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये आज इस्तंबूलमध्ये सीमापार दहशतवादी कारवायांना आळा घालण्यासाठी संयुक्त देखरेख यंत्रणा उभारण्यावर चर्चेची दुसरी फेरी पार पडली. मात्र, दहशतवाद, ही आपली प्रमुख समस्या असून, त्यावर तोडगा निघाला नाही, तर युद्ध हा एकमेव पर्याय असल्याचा इशारा पाकिस्ताननं दिला आहे.    पाकिस...

October 26, 2025 1:46 PM

views 29

कॅनडाकडून आयात होणाऱ्या मालावर अतिरिक्त १० टक्के कर लादायचा अमेरिकेचा निर्णय

अमेरिका आणि कॅनडा यांच्यातल्या वाढत्या तणवाच्या पार्श्वभूमीवर कॅनडाकडून आयात होणाऱ्या मालावर १० टक्के अतिरिक्त कर लादायचा निर्णय अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काल घेतला. या मालावर आधीपासून लागू असलेल्या करा व्यतिरिक्त हा कर वसूल केला जाईल, असंही ट्रम्प यांनी स्पष्ट केलं. अमेरिका लादत...

October 26, 2025 12:55 PM

views 114

आयर्लंडच्या दहाव्या राष्ट्राध्यक्ष म्हणून कॅथरीन कॉनोली यांची निवड

आयर्लंडच्या दहाव्या राष्ट्राध्यक्ष म्हणून कॅथरीन कॉनोली यांची निवड झाली आहे. त्यांनी आपले प्रतिस्पर्धी हीदर हम्फ्रे यांच्या विरोधात प्रचंड मतांनी विजय मिळवला.  एक अनुभवी राजकारणी असलेल्या कॉनोली, या २०१६ साला पासून संसदेत ‘गॅलवे वेस्ट’ मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत आहेत. आयर्लंड संसदेच्या उपसभापती म्...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.