आंतरराष्ट्रीय

July 20, 2024 8:03 PM

views 60

चीन : मुसळधार पावसामुळे पूल नदीत कोसळून ११ जणांचा मृत्यू

चीनच्या उत्तरेकडे मुसळधार पावसामुळे महामार्गावरील पूल नदीत कोसळून झालेल्या दुर्घटनेत ११ जणांचा मृत्यू झाला. शान्क्सी प्रांतात काल रात्री हा अपघात घडला. बचावकार्य सुरू आहे. महामार्गावरची सुमारे २० वाहनं आणि ३० जण या दुर्घटनेनंतर बेपत्ता आहेत.

July 20, 2024 3:58 PM

views 46

वेस्ट बँक आणि पूर्व जेरुसलेममधली इस्राएलची उपस्थिती बेकायदेशीर – संयुक्त राष्ट्राचे आंतरराष्ट्रीय न्यायालय

वेस्ट बँक आणि पूर्व जेरुसलेममधली इस्राएलची उपस्थिती बेकायदेशीर असल्याचं संयुक्त राष्ट्राच्या आंतरराष्ट्रीय न्यायालयाने स्पष्ट केलं आहे. गाझा आणि वेस्टबँकमधला भूप्रदेश हस्तगत करण्याच्या इस्रायलच्या धोरणालाही न्यायालयाने चुकीचं ठरवलं असून या प्रदेशातली कार्यवाही तातडीनं थांबवण्याचा सल्ला दिला आहे. न्य...

July 20, 2024 3:54 PM

views 67

भूतानमध्ये तिसरी भारत-भूतान विकास सहकार्य चर्चा

परराष्ट्र व्यवहार सचिव विक्रम मिस्त्री आणि भूतानचे परराष्ट्र व्यवहार सचिव आउम पेमा छोद्जोन यांच्या सहअध्यक्षतेखाली तिसरी भारत-भूतान विकास सहकार्य चर्चा आज भूतानमध्ये झाली. या बैठकीत १३ व्या पंचवार्षिक योजना कालावधी अंतर्गत विकास भागीदारीची विविध क्षेत्रे, त्यातलं सहकार्य आणि कार्यान्वयनाचे मार्ग, या...

July 20, 2024 3:15 PM

views 45

बांगलादेशात हिंसक आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशभरात संचारबंदी लागू

बांगलादेशात गेल्या काही दिवसांपासून पसरलेल्या हिंसक आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशभरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तसंच लष्कर तैनात करण्यात आलं आहे. बांगलादेशातल्या सरकारी नोकऱ्यांमधल्या आरक्षणाच्या धोरणात सुधारणा करण्याच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी काही दिवसांपूर्वी आंदोलन पुकारलं होतं...

July 20, 2024 2:45 PM

views 48

हैतीच्या उत्तर किनाऱ्याजवळ जहाजाला लागलेल्या आगीत ४० स्थलांतरितांचा मृत्यू

हैतीच्या उत्तर किनाऱ्याजवळ एका जहाजाला लागलेल्या आगीत किमान ४० स्थलांतरितांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. या प्रवासात किमान ८० जण प्रवास करत होते. हैतीहून दीडशे मैलावर असलेल्या टर्क्स अँड कॅकॉस बेटाच्या दिशेनं हे जहाज निघालं होतं. हैतीच्या तटरक्षक दलानं ४१ स्थलांतरितांची सुटका केली असून...

July 20, 2024 9:19 AM

views 59

मायक्रोसॉफ्ट कंपनीचं सॉफ्टवेअर बंद पडल्यानं तांत्रिक अडचणी

मायक्रोसॉफ्टच्या सर्व्हरमध्ये झालेल्या बिघाडामुळे मायक्रोसॉफ्टची सॉफ्टवेअर प्रणाली काल ठप्प झाली होती, ती आता पूर्वपदावर येत आहे. यामुळे जगभरात अनेक देशांमध्ये बँकिंग, विमान वाहतूक आणि अन्य सेवा विस्कळीत झाल्या होत्या. भारतातही मुंबई विमानतळावरच्या सेवेला याचा सर्वाधिक फटका सहन करावा लागला. विविध वि...

July 19, 2024 2:52 PM

views 50

युरोपियन संसदेने जर्मनीच्या उर्सुला वोन डेर लेयेन यांची युरोपियन आयोगाच्या अध्यक्षपदी पुन्हा निवड

युरोपियन संसदेनं जर्मनीच्या उर्सुला वोन डेर लेयेन यांची पुढच्या पाच वर्षांसाठी युरोपियन आयोगाच्या अध्यक्षपदी पुन्हा निवड केली. उर्सुला वोन डेर लेयेन यांना युरोपियन संघाच्या ७२० सदस्यांपैकी ४०१ सदस्यांची मतं मिळाली. निवड झाल्याननंतर उर्सुला यांनी आगामी पाच वर्षातल्या योजनांची माहिती युरोपियन संसदेत द...

July 18, 2024 8:35 PM

views 49

बांगलादेशात कोटा सुधारणा आंदोलनाला हिंसक वळण

बांगला देशात कोटा सुधारणा आंदोलनाला आज हिंसक वळण लागलं आणि यात चार जणांचा मृत्यू तर शेकडो लोक जखमी झाले. या आंदोलकांनी आपल्या मागण्यांसाठी आज देशव्यापी बंद ची घोषणा केली होती आणि ढाक्यातले मुख्य महामार्ग, रेल्वे मार्ग, मेट्रो मार्गांची वाहतूक रोखली होती. बांगलादेशचे कायदा सुव्यवस्था आणि संसदीय कार्य...

July 18, 2024 3:40 PM

views 49

मॉरिशसमध्ये भारताच्या पहिल्या परदेशस्थ जनऔषधी केंद्राचे परराष्ट्र व्यवहार मंत्री जयशंकर यांनी केले उद्घाटन

भारताच्या पहिल्या परदेशस्थ जनऔषधी केंद्राचं उद्घाटन परराष्ट्र व्यवहार मंत्री जयशंकर यांनी काल मॉरिशस इथं केलं. यावेळी मॉरिशसचे प्रधानमंत्री प्रविंद कुमार जगनॉथ उपस्थित होते. भारत आणि मॉरिशस यांच्या दरम्यानच्या आरोग्य भागीदारी उपक्रमा अंतर्गत भारतात उत्पादन झालेल्या आणि स्वस्त औषधांचा पुरवठा मॉरिशस म...

July 18, 2024 3:27 PM

views 58

कोरोना बाधित जो बायडन यांनी अध्यपदाच्या निवडणुकीतून माघार घेण्याच्या मागणीला जोर

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांना कोविड-1९ चा संसर्ग झाल्यानंतर,अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून त्यांनी माघार घ्यावी यासाठीचा दबाव वाढत आहे. डेमोक्रॅटिक पक्षाचे प्रभावशाली नेते, तसंच कॅलिफोर्नियाचे प्रतिनिधी ॲडम शिफ यांनी,अध्यक्ष बायडन यांना अध्यक्षपदाच्या शर्यतीतून माघार घेण्याचं जाहीर आवाहन केलं ...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.