निवडणुका

October 21, 2024 7:20 PM

views 88

विधानसभा निवडणुकीसाठी परिवर्तन महाशक्तीची १० उमेदवारांची यादी जाहीर

परिवर्तन महाशक्तीने आगामी विधानसभा निवडणुकीसाठी १० उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यापैकी ८ जागा प्रहार जनशक्ती पक्षाला आणि दोन जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला देण्यात आल्या आहेत. प्रहार जनशक्ती पक्षाकडून बच्चू कडू यांना अचलपूरमधून तर अनिल चौधरी यांना रावेरमधून उमेदवारी देण्यात आली आहे. चांदवड विधा...

October 21, 2024 7:14 PM

views 44

विधानसभा निवडणुकांसाठी मनसेची पहिली यादी जाहीर

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं विधानसभा निवडणुकांसाठी आपली पहिली यादी जाहीर केली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी कल्याण ग्रामीण मतदारसंघातून राजू पाटील आणि ठाण्यातून अविनाश जाधव यांच्या उमेदवारी देण्यात आल्याची घोषणा केली आहे. डोंबिवलीत राजू पाटील यांच्या निवडणूक मध्यवर्ती प्रचा...

October 21, 2024 4:08 PM

views 31

झारखंड विधानसभा निवडणुकीसाठी ११ हजार सैनिक तैनात

झारखंड विधानसभा निवडणुकीसाठी निमलष्करी दलाच्या ११९ कंपन्या म्हणजे एकूण ११ हजार सैनिक तैनात करण्यात येणार आहेत. एका जिल्ह्यात तीन ते पाच कंपन्या तैनात करण्यात येणार आहेत. झारखंडमध्ये दोन टप्प्यात निवडणुका होणार असून पहिला टप्पा १३ नोव्हेंबरला तर दुसरा टप्पा २० नोव्हेंबरला होणार आहे. निवडणुकीचा निकाल ...

October 21, 2024 2:56 PM

views 64

महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये विधानसभेसाठी जागावाटपाबाबत चर्चांना वेग

महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध राजकीय पक्षांच्या बैठका होत आहेत. राष्ट्रीय लोकशाही आघाडी आणि इंडिया आघाडीमधे घटक पक्षांच्या जागावाटपाबाबत चर्चा सुरु आहेत.

October 21, 2024 10:00 AM

views 51

विधानसभा निवडणुकीसाठी मनोज जरांगे यांची संमिश्र भूमिका

मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीसाठी संमिश्र भूमिका जाहीर केली आहे. काल आंतरवाली सराटी इथं झालेल्या मराठा समाजाच्या बैठकीत त्यांनी ही भूमिका विशद केली. ज्या मतदारसंघात निवडून येण्याची शक्यता आहे, तिथं उमेदवार उभे करावेत, अनुसूचित जाती जमातीसाठी राखीव मतदार संघात ...

October 21, 2024 8:35 AM

views 82

विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाची ९९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीनं 99 उमेदवारांची आपली पहिली यादी आज जाहीर केली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दक्षिण पश्चिम नागपूरमधून उमेदवारी देण्यात आली आहे. कामठी मतदारसंघामधून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, जामनेरमधून मंत्री गिरीश महाजन, तर बल्लारपूरमधून मंत्री सु...

October 20, 2024 6:56 PM

views 39

विधानसभा मतदारसंघासाठी संयंत्रांची पहिल्या टप्प्यातली सरमिसळ प्रक्रिया पूर्ण

आगामी विधानसभा निवडणुकीत संपूर्ण पारदर्शकता राखण्यासाठी केली जाणारी मतदान संयंत्रांची सरमिसळ प्रक्रिया आज मुंबई आणि बीड शहरात पार पडली. मुंबई शहर जिल्हा आणि मुंबई उपनगर जिल्ह्यातल्या  ३६ विधानसभा मतदारसंघासाठी संयंत्रांची पहिल्या टप्प्यातली सरमिसळ प्रक्रिया पूर्ण झाली. जिल्हा निवडणूक अधिकारी तसंच बृ...

October 20, 2024 3:48 PM

views 36

आचारसंहिता लागू झाल्यापासून सी व्हिजिल ऍपवर ५७६ तक्रारी

राज्यात आचारसंहिता लागू झाल्यापासून सी व्हिजिल या ऍपवर आतापर्यंत ५७६ तक्रारी आल्या असून त्यातल्या ५६३ तक्रारी निकाली काढण्यात आल्याची माहिती अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉक्टर किरण कुलकर्णी यांनी दिली. आचारसंहिता लागू झाल्यानंतर शासकीय, सार्वजनिक, खासगी जागेतल्या विनापरवानगी लावलेल्या जवळपास सात ...

October 20, 2024 3:44 PM

views 23

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची बैठक मुंबईत सुरू

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची बैठक मुंबईत सुरू आहे. या बैठकीत जागावाटपाबाबत चर्चा होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची मुंबईत भेट घेतली. ही भेट महाविकास आघाडीच्...

October 20, 2024 3:31 PM

views 41

वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार प्रियंका खेडकर यांचा प्रचाराला सुरुवात

बीड जिल्ह्यातल्या गेवराई विधानसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार प्रियंका खेडकर यांनी आज चकलांबा गावातून प्रचाराला सुरुवात केली. महायुती आणि महाविकास आघाडीकडून उमेदवार जाहीर होण्यापूर्वीच वंचित बहुजन आघाडीनं गेवराईत आपला उमेदवार जाहीर केला आहे.   गेवराई विधानसभा मतदारसंघात पंडित आणि प...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.