निवडणुका

October 23, 2024 7:29 PM

views 72

काँग्रेसच्या आमदार सुलभा खोडके यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

अमरावती विधानसभा मतदारसंघाच्या काँग्रेसच्या आमदार सुलभा खोडके, येवला मतदारसंघाचे माजी आमदार कल्याणराव पाटील यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांचं पक्षात स्वागत केलं. त्यानंतर सुलभा खोडके यांना अमरावती विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली.

October 23, 2024 7:21 PM

views 71

भाजपा नेते लक्ष्मण ढोबळे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश

माजी मंत्री, भाजपा नेते  लक्ष्मण ढोबळे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. पक्षाच्या कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे यांनी त्यांचं पक्षात स्वागत केलं. ढोबळे पक्षात आल्याने त्यांच्या अनुभवाचा फायदा पक्षबांधणीसाठी होईल, असं सुळे यावेळी म्हणाल्या. तर आपण अजित पवार यांच्याशी मतभेद...

October 23, 2024 7:34 PM

views 52

विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरायला सुरुवात

राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध पक्षाचे उमेदवार अर्ज भरत आहेत.    मुंबईत मागाठाणे आणि जोगेश्वरी पूर्व अशा दोनच मतदारसंघातून आज उमेदवारी अर्ज दाखल झाले.    परभणी विधानसभा निवडणुकीसाठी आज दुसऱ्या दिवशी ४ विधानसभा मतदार संघात ९ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. &nbsp...

October 23, 2024 7:15 PM

views 73

विधानसभा निवडणुकीत संभाजी ब्रिगेड स्वबळावर लढणार

राज्यात संभाजी ब्रिगेड स्वबळावर निवडणूक लढणार असून पन्नासपेक्षा अधिक उमेदवार देणार असल्याची माहिती ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे आणि मुख्य प्रवक्ते डॉक्टर गंगाधर बनबरे यांनी आज पुण्यात पत्रकार परिषदेत दिली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं संभाजी ब्रिगेडला त्यांच्या कोट्यातून किमान ४ ते ५ ज...

October 23, 2024 8:25 PM

views 72

महाविकास आघाडीतले तिन्ही पक्ष प्रत्येकी ८५ जागा लढवणार

महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचं जागावाटप झालं आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हे तिन्ही प्रमुख पक्ष प्रत्येकी ८५ जागा लढवतील, अशी माहिती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी आज वार्ताहर परिष...

October 23, 2024 6:59 PM

views 811

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची पहिली यादी जाहीर

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं आज ६५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. त्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघात केदार दिघे यांना रिंगणात उतरवलं आहे. ठाण्यातून राजन विचारे, दिंडोशीतून सुनील प्रभू, अंधेरी पूर्वमधून ऋतुजा लटके, तर वरळीतून आदित्य ठाकरे निवडणुकीच्या...

October 23, 2024 3:28 PM

views 49

लातूर जिल्हा प्रशासनातर्फे आचारसंहितेची कठोर अंमलबजावणी

लातूर जिल्हा प्रशासनातर्फे आचारसंहितेची कठोर अंमलबजावणी सुरू आहे. या अंतर्गत लातूर पोलिसांनी औसा तालुक्यात एकावर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल केला असून १५ जणांवर अवैध शस्त्रास्त्र बाळगल्याप्रकरणी गुन्हे दाखल केले आहेत. फेक स्पीच; तसंच समाज माध्यमावर आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणीही पाच गुन्हे दाखल ...

October 23, 2024 3:09 PM

views 58

महाराष्ट्र आणि झारखंडमधील विधानसभा निवडणुकीसाठीची अधिसूचना जारी

महाराष्ट्र आणि झारखंडमधील विधानसभा निवडणुकीसाठीची अधिसूचना काल जारी करण्यात आली; त्याचबरोबर उमेदवारी अर्ज भरायलाही सुरुवात झाली आहे. येत्या 29 ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येतील. 30 ऑक्टोबरला अर्जांची छाननी होईल आणि चार नोव्हेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येतील. विधानसभा निवडणुकीसाठी 20...

October 22, 2024 7:11 PM

views 53

नाशिकमध्ये देवळा नगरपंचायतीत भाजपच्या १५ नगरसेवकांचा राजीनामा

भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष केदा आहेर यांना चांदवड-देवळा विधानसभा मतदारसंघात भाजपनं तिकीट नाकारल्यानं देवळा नगरपंचायतीच्या १५ नगरसेवकांनी भाजपच्या प्राथमिक सदस्यपदाचा राजीनामा दिला. मागच्या  आठवड्यात डॉक्टर राहुल आहेर यांनी निवडणुकीतून माघार घेतल्याचं  जाहीर केलं  होतं.  परंतु, भाजपनं पहिल्या यादीत डॉ....

October 22, 2024 7:04 PM

views 75

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अजित यशवंतराव यांची पक्षाला सोडचिठ्ठी

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अजित यशवंतराव यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला आहे. मुंबईत मातोश्री निवासस्थानी माजी मुुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांना शिवबंधन बांधलं.  

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.