व्यवसाय

January 2, 2025 7:23 PM

views 35

देशातल्या शेअर बाजारात जोरदार तेजी

नव्या वर्षाच्या दुसऱ्या दिवशी देशातल्या शेअर बाजारात आज दमदार तेजी झाली. सकाळी किरकोळ तेजीने सुरू झालेले बाजार नंतर सातत्यानं वाढत गेले. व्यवहारांच्या दरम्यान सेन्सेक्सनं ८० हजारांची पातळीही ओलांडली होती. दिवसअखेर सेन्सेक्स १ हजार ४३६ अंकांची वाढ नोंदवून ७९ हजार ९४४ अंकांवर बंद झाला. सत्रादरम्यान २४...

January 1, 2025 6:56 PM

views 111

डिसेंबर महिन्यात जीएसटी संकलन १ लाख ७६ हजार कोटी रुपयांवर

जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवाकर संकलन, डिसेंबर महिन्यात गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत ७ पूर्णांक ३ दशांश टक्क्यांची वृद्धी नोंदवून १ लाख  ७६ हजार कोटी रुपयांवर पोहोचलं आहे. डिसेंबर २०२३  मध्ये एकूण जीएसटी संकलन १ लाख ६४ हजार कोटी इतकं होतं.  डिसेंबर २०२४ मध्ये केंद्रीय जीएसटी संकलन ३२ हजार ...

December 31, 2024 7:41 PM

views 50

मुंबईतल्या सांगली सहकारी बँकेवर लादलेले निर्बंध २७ डिसेंबरपासून मागे

रिझर्व्ह बँकेनं मुंबईतल्या सांगली सहकारी बँकेवर लादलेले निर्बंध २७ डिसेंबरपासून मागे घेतले आहेत. जुलै २०२२ मध्ये रिझर्व्ह बँकेनं हे निर्बंध लादले होते. बँकेची आर्थिक परिस्थिती सुधारल्यानं हे निर्बंध हटवल्याचं रिझर्व्ह बँकेनं आज प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलं आहे. 

December 31, 2024 1:26 PM

views 54

बँक ग्राहकांना प्राप्तकर्त्याचं नाव आणि खात्याच्या तपशीलांची पडताळणी करता येणार

चुकीच्या  बँक खात्यात निधी हस्तांतरण होऊ नये यासाठी लाभार्थीच्या खात्याचं नाव पडताळण्याची सुविधा आता उपलब्ध होणार आहे. रिझर्व्ह बँकेनं यासंदर्भात निवेदन जारी केलं आहे. आर टी जी एस आणि एन ई एफ टी प्रणाली तर्फे पैसे हस्तांतर करण्यापूर्वी या सुविधेचा वापर करता येईल.   इंटरनेट बँकिंग तसंच  मोबाइल ब...

December 30, 2024 1:46 PM

views 53

डिसेंबरमध्ये भारतीय भांडवली बाजारात २२,००० कोटींहून अधिक रुपयांची परदेशी गुंतवणूक

विदेशी गुंतवणूकदारांनी डिसेंबरमध्ये आतापर्यंत भारतीय भांडवली बाजारात २२,००० कोटींहून अधिक रुपयांची गुंतवणूक केली आहे. डिपॉझिटरीजच्या आकडेवारीनुसार, विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारात १६ हजार ६७५ कोटी रुपये आणि पत पुरवठा बाजारामध्ये ५ हजार ३५२ कोटी रुपये गुंतवले, त्यामुळं भारतीय भा...

December 19, 2024 8:28 PM

views 89

अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने केलेल्या व्याज दरकपातीमुळे शेअर बाजारात घसरण

अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने केलेल्या दरकपातीचा परिणाम आज भारतीय शेअर बाजारांवर दिसून आला. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज ९६४ अंकांची घसरण झाली आणि तो ७९ हजार २१८ अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही २४७ अंकांची घसरण नोंदवत २३ हजार ९५१ अंकांवर बंद झाला. फेडरल रिझर्व्हने व्याजद...

December 17, 2024 6:58 PM

views 88

शेअर बाजारात आज मोठी घसरण

आंतरराष्ट्रीय व्यापारातली मंदी आणि वाढती व्यापारी तूट यांच्या परिणामामुळे आज भारतीय शेअर बाजारांमध्ये तीव्र घसरण दिसून आली. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समधे आज दिवसअखेर अंकांची १ हजार ६४  अंकांची घसरण झाली, आणि तो ८० हजार ६८४ अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही ३३२ अंकांची घसरण नोंद...

December 17, 2024 2:57 PM

views 45

स्मार्टफोन्सच्या निर्यातीत भारत जगातला तिसरा निर्यातदार देश

स्मार्टफोन्सच्या निर्यातीत  २०१९  साली  जगात २३ व्या क्रमांकांवर असलेला भारत आता स्मार्टफोन्सचा जगातला तिसरा निर्यातदार देश बनला आहे. नोव्हेंबर मध्ये देशातल्या स्मार्टफोन निर्यातीनं एकाच महिन्यात २० हजार कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि  माहिती तंत्रज्ञान मंत्री  अश्विनी ...

December 13, 2024 7:43 PM

views 60

देशातल्या शेअर बाजारात दिवसअखेर मोठी तेजी

देशातल्या शेअर बाजारात आज मोठे चढ - उतार दिसून आले. सकाळच्या सत्रात सुमारे बाराशे अंकांनी घसरुन सेन्सेक्स ८० हजारांच्या खाली जाणार अशी शक्यता निर्माण झाली होती. पण नंतर बाजारात तेजी सुरू झाली आणि दिवसअखेर सेन्सेक्स ८४३ अंकांनी वधारुन ८२ हजार १३३ अंकांवर बंद झाला. निफ्टी २२० अंकांची तेजी नोंदवून २४ ह...

December 12, 2024 8:12 PM

views 29

देशाच्या किरकोळ किमतीवर आधारित चलनफुगवट्याचा दर ५.४८ टक्के

देशाच्या किरकोळ किमतीवर आधारित चलनफुगवट्याचा दर गेल्या महिन्यात घसरुन ५ पूर्णांक ४८ शतांश टक्क्यावर आला आहे. ऑक्टोबर महिन्यात हा दर ६ पूर्णांक २ दशांश टक्के इतका होता. सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, शहरी भागात हा दर ४ पूर्णांक ८३ दशांश टक्के, तर ग्रामीण भ...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.