December 15, 2024 1:48 PM

views 13

प्रधानमंत्री दिल्लीमध्ये मुख्य सचिवांच्या चौथ्या संमेलनाला संबोधित करणार

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज दिल्लीमध्ये मुख्य सचिवांच्या चौथ्या संमेलनाला संबोधित करणार आहेत. तीन दिवस होणाऱ्या या संमेलनाला प्रधानमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी सुरुवात झाली. राज्यांच्या मदतीनं साधलेल्या विकासाचं मूल्यमापन करणं आणि कार्यान्वित करणं, हा या संमेलनामागचा उद्देश आहे. केंद्र आणि...

December 15, 2024 1:42 PM

views 52

महिलांच्या कनिष्ठ आशिया चषक हॉकी स्पर्धेत जपानच्या संघाला नमवून भारतीय संघाची अंतिम फेरीत धडक

ओमान इथं सुरू असलेल्या महिलांच्या कनिष्ठ आशिया चषक हॉकी स्पर्धेत, भारतीय संघानं अंतिम फेरीत धडक मारली आहे. काल जपानच्या संघाचा ३-१ असा पराभव करत संघानं अंतिम फेरी गाठली. भारताच्या दीपिकानं २ तर मुमताजनं १ गोल केला. उपांत्य फेरीचा दुसरा सामना चीन आणि दक्षिण कोरिया दरम्यान होणार असून, त्यातील विजेत्या...

December 15, 2024 1:40 PM

views 14

उत्तर, मध्य आणि पश्चिम महाराष्ट्रात येत्या २ ते ३ दिवसांत थंडीची लाट येणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज

उत्तर, मध्य आणि पश्चिम महाराष्ट्रात येत्या २ ते ३ दिवसांत थंडीची लाट येणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. आजही मध्य प्रदेशातील काही भागात जोरदार थंडीची लाट कायम राहू शकते असंही सांगितलं. पंजाब, हरियाणा, चंदीगढ, उत्तर प्रदेश, छत्तीसगढ, पश्चिम बंगाल आणि ओदिशाच्या काही भागांमध्ये पुढील २ द...

December 15, 2024 3:07 PM

views 58

रत्नागिरीत जयगडमधल्या वायुगळतीप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

रत्नागिरी जिल्ह्यातल्या जयगडमधल्या वायुगळतीच्या प्रकरणात जेएसडब्ल्यू पोर्ट लिमिटेड कंपनीच्या चौघांवर फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वायुगळतीचं कारण शोधण्यासाठी मुंबई किंवा पुण्यातून तज्ज्ञांना बोलावलं जाणार आहे. दरम्यान, आणखी ३३ मुलांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आलं असून, सात मुलांवर...

December 15, 2024 11:08 AM

views 32

श्रीलंकेचे राष्ट्रपती अनुरा कुमारा दिसानायके भारताच्या 3 दिवसांच्या दौऱ्यावर

श्रीलंकेचे राष्ट्रपती अनुरा कुमारा दिसानायके आज भारताच्या 3 दिवसांच्या दौऱ्यावर येणार आहेत. श्रीलंकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर त्यांचा हा पहिलाच भारत दौरा आहे. दिसानायके यांच्या भेटीमुळे दोन्ही देशांमधील परस्पर सहकार्य अधिक बळकट होण्यास मदत होणार आहे. या भेटीदरम्यान दिसानायके र...

December 15, 2024 9:35 AM

views 33

जालना-सिंदखेडराजा मार्गावर आयशर ट्रक आणि बसच्या अपघातात चार प्रवाशांचा मृत्यू

जालना-सिंदखेडराजा मार्गावर आयशर ट्रक आणि बसची समोरासमोर धडक होऊन चार प्रवाशांचा मृत्यू झाला, तर १८ ते २० प्रवासी जखमी झाले. नाशिक-नांदगाव डेपोची ही बस जालन्याहून सिंदखेडराजाकडे जात असताना, नाव्हा शिवारात ही दुर्घटना घडली. जखमींना उपचारासाठी जालना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

December 15, 2024 9:34 AM

views 12

अविष्कार २०२४ च्या विद्यापीठस्तरीय फेरीत पावणे दोनशे प्रकल्पांचं सादरीकरण

युवकांच्या कल्पनाशक्तीला वाव देणाऱ्या अविष्कार २०२४ या महोत्सवाची विभागीय फेरी काल डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात पार पडली. कोल्हापूर इथल्या डी वाय पाटील विद्यापीठाचे संशोधन-संचालक तथा अधिष्ठाता डॉक्टर सी. डी. लोखंडे यांच्या हस्ते या महोत्सवाचं उद्घाटन झालं. या आविष्कार महोत्सवासाठी छत्रप...

December 15, 2024 9:32 AM

views 46

आपल्या कार्यकाळातल्या घटना दुरुस्त्या समाजातल्या वंचिताच्या हितासाठी – पंतप्रधान

आपल्या कार्यकाळातल्या घटना दुरुस्त्या समाजातल्या वंचिताच्या हितासाठी केल्याचं प्रतिपादन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. राज्यघटना स्वीकृतीच्या अमृत महोत्सवानिमित्त लोकसभेत संविधानावर झालेल्या विशेष चर्चेच्या उत्तरात ते काल बोलत होते. काँग्रेसने संविधानाचा सातत्याने अवमान केला, तसंच राजकीय स्...

December 15, 2024 9:26 AM

views 71

सृजनशील समाजनिर्मितीसाठी वाचन संस्कृती जिवंत ठेवणं काळाची गरज – मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन

समाजाला सृजनशील आणि विचारवंत ठेवण्यासाठी वाचन संस्कृती जिवंत ठेवणं ही काळाची गरज असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल पुणे पुस्तक महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना केलं. राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या वतीनं पुण्यातल्या फर्गसन महाविद्यालयाच्या मैदानावर पुणे पुस्तक महोत्सवाचं आयोजन ...

December 15, 2024 9:05 AM

views 42

भारत लोकशाहीची जननी तर देशाचं संविधान एकतेचा आधार असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन

देशानं राज्यघटना स्वीकार केल्यापासूनचा प्रवास असाधारण असल्याचं प्रतिपादन काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत घटना स्वीकार केल्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित दोन दिवसीय चर्चेला उत्तर देताना केलं. आपल्या देशाची प्राचीन लोकशाही विश्वाला दीर्घकाळ प्रेरणा देत राहील. भारत केवळ मोठे लोकशाही रा...