December 15, 2024 9:00 AM

views 17

तारणमुक्त कृषी कर्जाच्या मर्यादेत रिझर्व्ह बँकेकडून 40 हजार रुपयांची वाढ

भारतीय रिझर्व्ह बँकेनं तारणमुक्त कृषी कर्जाच्या मर्यादेत चाळीस हजार रुपयांची वाढ केली आहे. नव्या वर्षापासून तारणमुक्त कृषी कर्जाची मर्यादा एक लाख साठ हजारांहून वाढून दोन लाख रुपये करण्याची घोषणा केली आहे. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयानं जारी केलेल्या निवेदनात, वाढती महागाई आणि शेती लागवडीचा वाढता...

December 14, 2024 8:15 PM

views 40

पंजाबमधल्या शेतकऱ्यांनी काढलेला ‘दिल्ली चलो’ मोर्चा आज पुन्हा एकदा स्थगित

शेतपिकाला हमीभाव देण्याचा कायदा आणि कर्जमाफी या प्रमुख मागण्यांसाठी पंजाबमधल्या शेतकऱ्यांनी काढलेला ‘दिल्ली चलो’ मोर्चा आज पुन्हा एकदा स्थगित करण्यात आला. मोर्चेकरी जमावाने शंभू तपासणी नाका ओलांडण्याचा प्रयत्न करीत असताना हरियाणा पोलिसांनी जमाव पांगवण्यासाठी अश्रुधूर आणि पाण्याच्या फवाऱ्यांचा वापर क...

December 14, 2024 8:11 PM

views 19

जॉर्जियाचे नवे अध्यक्ष म्हणून मिखाईल कवेलाशविली यांची बिनविरोध निवड

जॉर्जियाचे नवे अध्यक्ष म्हणून मिखाईल कवेलाशविली बिनविरोध निवडून आले आहेत. २२५ पैकी २२४ खासदारांनी त्यांना मतदान केलं. २९ डिसेंबर रोजी त्यांचा शपथविधी होईल. ऑक्टोबरमध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप झाल्याचा करत विरोधी पक्षांनी संसदेवर बहिष्कार टाकला आहे.

December 14, 2024 8:19 PM

views 51

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी विकसित भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी मांडले ११ संकल्प

सन २०४७पर्यंत भारताला विकसित राष्ट्र म्हणून उभं करण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सर्व देशवासीयांना ११ संकल्पांचं पालन करण्याचं आवाहन केलं आहे.  सर्वांनीकर्तव्याचं पालन करणं, सर्वांच्या सहभागातून सर्वांचा विकास साधणं, भ्रष्टाचाराला अजिबात थारा न देणं, देशाच्या कायद्याचं अभिमानानं पालन करणं,...

December 14, 2024 7:37 PM

views 29

नाशिक मध्ये आज ९ पूर्णांक २ दशांश सेल्सिअस तापमानाची नोंद

नाशिकचा पार आज दोन अंशांनी घसरल्यामुळे जिल्ह्यात पुन्हा एकदा थंडीने डोकं वर काढलं आहे. आज ९ पूर्णांक २ दशांश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. थंडीचा रब्बी पिकांना चांगलाच फायदा होत असल्यानं शेतकरी वर्ग आनंद व्यक्त करत आहे. नाशिकमध्ये आतापर्यंत ८ पूर्णांक ९ अंश सेल्सिअस इतके नीचांकी तापमान नोंदवण...

December 14, 2024 7:15 PM

views 10

राज्य मंत्रीमंडळाचा उद्या संध्याकाळी नागपुरात विस्तार

राज्यातल्या नवनिर्वाचित सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार उद्या रविवारी सायंकाळी चार वाजता नागपूर इथं राजभवनात होणार आहे. येत्या सोमवारपासून राज्य विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन नागपुरात होत आहे. त्याच्या पूर्वसंध्येला हा मंत्रिमंडळ विस्तार केला जाणार आहे.    होल्ड व्हाइस कास्ट मंत्रिमंडळ विस्तारात म...

December 14, 2024 8:23 PM

views 36

दक्षिण कोरियाचे अध्यक्ष यून सुक येओल यांच्याविरोधात संसदेत महाभियोग प्रस्ताव मंजूर

दक्षिण कोरियाचे अध्यक्ष यून सुक येओल यांच्याविरोधात संसदेत महाभियोग प्रस्ताव आज मंजूर झाला. हा प्रस्ताव २०४ विरुद्ध ८५ मतांनी संसदेत मंजूर झाला. यानंतर सर्वोच्च न्यायालय त्यांना पदच्युत करायचे किंवा पदावर ठेवायचे यावर हे निश्चित करेल. घटनात्मक न्यायालयाने राष्ट्राध्यक्ष यून सुक येओल यांना पदच्युत के...

December 14, 2024 6:58 PM

views 55

सरकार दिव्यांग व्यक्तींसाठी अनेक विशेष योजना राबवत आहे – केंद्रीय मंत्री रामदास आठवले

विशेष गरज असलेल्या व्यक्तींच्या कल्याणासाठी सरकार वचनबद्ध असून दिव्यांग व्यक्तींसाठी अनेक विशेष योजना राबवत असल्याचं केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. ते काल तेलंगणात सिकंदराबादमध्ये मानसिक दुर्बल सबलीकरण राष्ट्रीय संस्था इथं दिव्यांग व्यक्तींना शैक्षणिक सामग्रीचं वाट...

December 14, 2024 6:48 PM

views 44

भारतीय रिझर्व्ह बँकेची तारणाविना कृषी कर्जाची मर्यादा १ लाख ६० हजार रुपयांवरून २ लाख रुपये करण्याची घोषणा

भारतीय रिझर्व्ह बँकेनं तारणाविना कृषी कर्जाची मर्यादा १ लाख ६० हजार रुपयांवरून २ लाख रुपये करण्याची घोषणा केली आहे. येत्या १ जानेवारीपासून हा निर्णय लागू होईल. यामुळे शेतकऱ्यांना अतिरिक्त आर्थिक सहाय्य प्रदान होईल असं कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयानं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. कर्ज वितरण स...

December 14, 2024 6:45 PM

views 22

महामार्गावर ‘राजमार्ग साथी’ या नावानं नवीन गस्ती वाहनांना सुरुवात

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं रस्ते सुरक्षा आणि महामार्गावरची गस्ती आणखी वाढवण्याच्या उद्देशाने महामार्गावर ‘राजमार्ग साथी’ या नावानं नवीन गस्ती वाहनांना सुरुवात केली आहे. ही वाहनं आधुनिक तंत्रज्ञान आणि सुरक्षा उपकरणांनी सुसज्ज असून यामुळे वाहतूक कोंडी कमी व्हायला आणि प्रवास सुरक्षित व्हायल...