December 16, 2024 7:34 PM

views 32

ESIC आयुषमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या सहकार्यातून वैद्यकीय सेवा पुरवणार

गेल्या १० वर्षांत देशभरात ९७ नव्या इएसआय रूग्णालयांना मान्यता दिल्याची माहिती केंद्रीय श्रम आणि रोजगार राज्यमंत्री शोभा करंदलाजे यांनी आज लोकसभेत लेखी उत्तरात दिली. देशातल्या १६५ इएसआय रूग्णालयांमध्ये तसंच ५९० दवाखान्यांमध्ये विमा सुरक्षेखाली येणाऱ्या कर्मचाऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबांना कर्मचारी ...

December 16, 2024 7:16 PM

views 35

एसटीनं तिकीट दरात वाढ करण्याचा प्रस्ताव शासनाकडे सुपूर्द

एसटीनं तिकीट दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला असून, तसा प्रस्ताव शासनाला पाठवला आहे, असं एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांनी सांगितलं. उत्पन्न आणि खर्चात ताळमेळ राखण्यासाठी  हा निर्णय घेतल्याचं ते म्हणाले.   एसटीला नोव्हेंबरमध्ये ९४१ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाल...

December 16, 2024 6:44 PM

views 58

केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी जगदलपूर इथं शहीद सुरक्षा जवानांच्या कुटुंबियांशी संवाद साधला

केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी आज छत्तीसगडमधे बस्तरच्या विभागीय मुख्यालयात, जगदलपूर इथं शहीद सुरक्षा जवानांच्या कुटुंबियांशी संवाद साधला. या कुटुंबाच्या समस्या सोडवण्यासाठी तसंच त्यांना नुकसानभरपाई देण्यासाठी केंद्रीय गृहमंत्रालय, आदिवासी व्यवहार आणि ग्रामीण विकास मंत्रालय संयुक्तपणे एक विशेष योजना ...

December 16, 2024 6:30 PM

views 23

घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित चलन फुगवट्याच्या दरात मोठी घसरण

गेल्या महिन्यात, घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित चलन फुगवट्याचा दर घसरुन १ पूर्णांक ८९ शतांश टक्क्यावर आला. ऑक्टोबरमधे हा दर २ पूर्णांक ३६ शतांश टक्के होता. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं आज ही आकडेवारी जाहीर केली. त्यानुसार त्यानुसार खाद्यपदार्थाच्या बाबतीत हा दर ११ पूर्णांक ६९ टक्के दरावर...

December 16, 2024 6:26 PM

views 41

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांचा राज्य मंत्रिमंडळात समावेश नसल्याच्या निषेधार्थ नाशिकमध्ये आंदोलन

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांचा राज्य मंत्रिमंडळात समावेश नसल्याच्या निषेधार्थ आज नाशिकमध्ये आंदोलनं करण्यात आली. कार्यकर्त्यांनी, भुजबळ यांचा मतदार संघ असलेल्या येवला तालुक्यात विंचुर इथं रास्ता रस्ता रोको केला, तर नाशिकमध्ये राष्ट्रवादी भवनासमोर घोषणाबाजी केली. काल रात्री काही कार्यकर्...

December 16, 2024 6:22 PM

views 32

विरोधकांनी मांडलेल्या कोणत्याही विषयावर चर्चा करायला सरकार तयार-देवेंद्र फडनवीस

विरोधकांनी मांडलेल्या कोणत्याही विषयावर चर्चा करायला सरकार तयार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी आज स्पष्ट केलं. ते नागपुरात विधिमंडळाच्या पायऱ्यावर बातमीदारांशी बोलत होते. सरकार कुठलीही माहिती लपवून ठेवणार नाही, असं ते म्हणाले.    सुधीर मुनगंटीवार यांना मंत्रिमंडळात स्थान दिलं नसल्या...

December 16, 2024 3:44 PM

views 55

बुद्धिबळातला जगज्जेता गुकेशचं चेन्नई विमानतळावर जंगी स्वागत

बुद्धिबळातला जगज्जेता गुकेशचं आज चेन्नई विमानतळावर जंगी स्वागत करण्यात आलं. सगळ्यात लहान वयाचा विश्वविजेता ठरल्यानंतर तो आज पहिल्यांदाच त्याच्या घरी आला. त्याच्या चाहत्यांनी त्याचं जल्लोषात स्वागत केलं. यावेळी क्रीडा मंत्रालयाचे उच्चाधिकारी उपस्थित होते. आपलं लहानपणापासूनचं स्वप्न जागतिक अजिंक्यपद प...

December 16, 2024 3:40 PM

views 41

धुळ्यात मांजा विक्रेत्यांवर पर्यावरण कायद्यानुसार १२ गुन्हे दाखल

धुळे शहर आणि धुळे ग्रामीण या भागातल्या मांजा विक्रेत्यांवर पर्यावरण कायद्यानुसार वेगवेगळ्या पोलिस ठाण्यांत १२ गुन्हे दाखल झाले आहेत. प्लास्टिक किंवा इतर कृत्रिम वस्तूंपासून बनवलेल्या नायलॉन मांजाची निर्मिती, विक्री, साठवणूक आणि वापरास संपूर्ण धुळे जिल्हयात बंदी  आहे, त्यामुळे मकर संक्रातीच्या पार्श्...

December 16, 2024 3:37 PM

views 47

गायक आणि हार्मोनियम वादक पंडित संजय मराठे यांचं निधन

संगीतभूषण पंडित राम मराठे यांचे पुत्र, गायक आणि हार्मोनियम वादक पंडित संजय मराठे यांचं काल रात्री हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झालं. ते ६८ वर्षांचे होते. राम मराठे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आयोजित कार्यक्रमात त्यांनी प्रामुख्याने सहभाग घेतला होता.

December 16, 2024 3:35 PM

views 44

बॉर्डर गावस्कर चषक स्पर्धेतल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात भारताची पहिल्या डावात खराब सुरुवात

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ऑस्ट्रेलियात गॅबा इथं सुरु असलेल्या बॉर्डर-गावस्कर चषक कसोटी क्रिकेट मालिकेतल्या तिसऱ्या सामन्यात आज तिसऱ्या दिवशीचा खेळ संपला तेव्हा भारत ३९४ धावांनी पिछाडीवर होता. ऑस्ट्रेलियानं पहिल्या डावात केलेल्या ४४५ धावांना उत्तर देताना भारतानं चार गडी गमावत ५१ धावा केल्या आहेत....