December 17, 2024 9:46 AM

views 56

राजस्थान सरकार स्थापनेच्या वर्षपुर्तीनिमित्त प्रधानमंत्र्यांच्या हस्ते ४६,००० कोटी रुपयांच्या विकासकामांची भेट

राजस्थान राज्य सरकार स्थापनेला एक वर्ष झाल्याच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज जयपूरमधील एका कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. ४६ हजार ३०० कोटी रुपये खर्चाच्या उर्जा, रस्ते, रेल्वे आणि पाणी या क्षेत्रातील २४ प्रकल्प पायाभरणी आणि उद्घटन त्यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी ते एका जाहीर सभे...

December 17, 2024 8:58 AM

views 30

रत्नागिरीत वायुगळतीमुळे बाधित विद्यार्थ्यी पुन्हा रुग्णालयात दाखल

रत्नागिरी जिल्ह्यातल्या जयगडमधल्या वायुगळतीमुळे बाधित झालेल्या विद्यार्थ्यांपैकी 19 विद्यार्थ्यांना काल पुन्हा खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दोन दिवसांनंतर त्यांना शासकीय रुग्णालयातून घरी सोडण्यात आलं होतं; मात्र काल त्यांना परत त्रास जाणवू लागल्याने पुन्हा उपचारांसाठी आणण्यात आलं आहे.

December 17, 2024 8:44 AM

views 44

जीवनात यशस्वी होण्यासाठी स्वयंशिस्त हा यशाचा मूलमंत्र – राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन

जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर स्वयंशिस्त हा यशाचा मूलमंत्र असल्याचा सल्ला राज्यपाल आणि कुलपती सी.पी. राधाकृष्णन यांनी काल नागपुरात विद्यार्थ्यांना दिला. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या ११२व्या दीक्षान्त समारंभात राज्यपाल बोलत होते. या समारंभात एक लाखाहून अधिक विद्यार्थ्यांना पदवी, पद...

December 17, 2024 8:36 AM

views 20

पार्ले टिळक विद्यालय असोसिएशनच्या साठये महाविद्यालयात प्राचीन काळातील दुर्मिळ आणि मौल्यवान वस्तूंचं प्रदर्शन

पार्ले टिळक विद्यालय असोसिएशनचे साठये महाविद्यालय (स्वायत्त), प्राचीन भारतीय संस्कृती व पुरातत्त्व विभाग, बौद्धविद्या विभाग, प्राणिशास्त्र विभाग, पुरातत्त्व विभाग, मुंबई विद्यापीठ, पर्यटन मंत्रालय, भारत सरकार, लब्धी विक्रम जनसेवा ट्रस्ट, अहमदाबाद, इन टू द पास्ट हेरिटेज, मराठी देशा फाऊंडेशन, पुरासंस्...

December 16, 2024 8:26 PM

views 20

प्रदूषणाला कारणीभूत ठरणारे ३ हजार ५१९ उद्योग शोधल्याची पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांची माहिती

देशातली विविध राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळं आणि प्रदूषण नियंत्रण समित्यांनी प्रदूषणाला कारणीभूत ठरणारे ३ हजार ५१९ उद्योग शोधल्याची माहिती पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी आज लोकसभेत दिली. नियमांचं उल्लंघन करणाऱ्या संस्थांवर कारवाई केल्यानंतर प्रचंड प्रदूषण करणाऱ्या ६६९ उद्योग बंद झाले आहेत. मात्र,...

December 16, 2024 8:11 PM

views 52

ईशान्येतल्या राज्यांमधे केंद्रसरकार या राज्यांच्या भागीदारीत काम करत आहे-ज्योतिरादित्य शिंदे

ईशान्येतल्या राज्यांमधे केंद्रसरकार या राज्यांच्या भागीदारीत काम करत आहे, असं ईशान्य क्षेत्र विकासमंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत या राज्यांच्या गुंतवणूकदार परिषदेत बोलत होते. या राज्यांमधे क्षमता, विशेषता, आणि मलेशिया, सिंगापूर, जपान, कंबोडिया इत्यादी अग्नेय आशियातल्या देश...

December 16, 2024 8:07 PM

views 28

बॉर्डर गावस्कर चषक स्पर्धेतल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात भारताची पहिल्या डावात खराब सुरुवात

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ऑस्ट्रेलियात गॅबा इथं सुरु असलेल्या बॉर्डर-गावस्कर चषक कसोटी क्रिकेट मालिकेतल्या तिसऱ्या सामन्यात आज तिसऱ्या दिवशीचा खेळ संपला तेव्हा भारत ३९४ धावांनी पिछाडीवर होता. ऑस्ट्रेलियानं पहिल्या डावात केलेल्या ४४५ धावांना उत्तर देताना भारतानं चार गडी गमावत ५१ धावा केल्या आहेत....

December 16, 2024 8:03 PM

views 51

नवी दिल्लीत प्रदुषणाची पातळी वाढल्यानं तिसऱ्या पातळीवरचे निर्बंध लागू

नवी दिल्लीत प्रदुषणाची पातळी वाढल्यानं हवाई दर्जा गुणवत्ता व्यवस्थापन आयोगानं तिसऱ्या पातळीवरचे निर्बंध लागू केले आहेत. केंद्रीय प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या श्रेणीनुसार नवी दिल्लीतल्या प्रदुषणाची पातळी अतिशय खराब श्रेणीत गेली आहे. काही ठिकाणी हवेचा गुणवत्ता निर्देशांक ४०० च्या पलीकडे गेला आहे.

December 16, 2024 7:54 PM

views 38

पीएमश्री योजनेअंतर्गत ६२० जवाहर नवोदय विद्यालये विकसित करणार – धर्मेंद्र प्रधान

पीएम श्री योजनेअंतर्गत ६२० जवाहर नवोदय विद्यालये विकसित करणार आहे, अशी माहिती केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने आज दिली. या अंतर्गत सध्या शाळांमध्ये उपलब्ध असलेल्या पायाभूत सुविधा आणि इतर सुविधा अधिक बळकट करण्यावर भर दिला जाईल. गेल्या पाच वर्षांत जवाहर नवोदय विद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांच्या प्रवेशसंख्येत...

December 16, 2024 7:33 PM

views 30

केंद्र सरकारनं ८७ हजार ७६२ कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या लोकसभेत मांडल्या

केंद्र सरकारनं आज ८७ हजार ७६२ कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या लोकसभेत मांडल्या. त्यातल्या ४४ हजार कोटी रुपयांहून अधिक रकमेच्या मागण्या कर्जाचा परतावा, व्याज वगैरेसाठी आहे.    चर्चेला सुरुवात करताना काँग्रेस नेते के. सी. वेणुगोपाल यांनी गेल्या काही वर्षात माहिती तंत्रज्ञान, दळणवळण, रिटेल, ग्राहको...