December 30, 2024 1:40 PM

views 44

हँडबॉल राष्ट्रीय चँपियन स्पर्धेत वरिष्ठ पुरुषांच्या सामन्यात केरळनं विजेतेपद पटकावलं

वरिष्ठ स्तरावरच्या पुरुषांच्या हँडबॉल राष्ट्रीय चँपियन स्पर्धेत केरळनं चंडीगढचा ३४ - ३१ नं पराभव करत विजेतेपद पटकावले.  हा सामना काल केरळच्या चांगनासेरी मध्ये खेळवला गेला. केरळचा संघ पहिल्यांदाच  या स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचला होता. उपांत्य फेरीच्या सामन्यात  सैन्यदलाचा पराभव करत केरळचा संघ अंति...

December 30, 2024 1:31 PM

views 32

दक्षिण कोरियातला विमान अपघात पक्ष्यामुळे झाल्याची माहिती

दक्षिण कोरियातला विमान अपघात पक्ष्यामुळे झाल्याची माहिती मिळत आहे. अपघाताच्या काही मिनिटांपूर्वी विमानाला पक्ष्याची धडक बसू शकते, असा इशारा विमान नियंत्रकांनी दिला होता, अशी माहिती तपास अधिकाऱ्यांनी दिली आहे. अपघातातून वाचलेल्या कर्मचाऱ्यांपैकी एकानेही पक्ष्याची धडक बसल्याचा उल्लेख केला होता. मात्र,...

December 30, 2024 2:54 PM

views 37

देशातल्या परकीय चलन साठ्यात ७०० अब्ज अमेरिकन डॉलर्सची वाढ

देशातल्या परकीय चलन साठ्यात ७०० अब्ज अमेरिकन डॉलर्सची वाढ झाली आहे. त्यामुळे भारत जगात चौथ्या स्थानी पोहचला आहे. २०१४ ते २०२४ या दशकात एकूण थेट परकीय गुंतवणूक अंदाजे सातशे नऊ अब्ज डॉलर्स पेक्षा जास्त आहे. जागतिक स्पर्धात्मकता निर्देशांकात भारत २०१४ साली ७१व्या स्थानी होता, २०१८ साली भारत ३९ व्या स्थ...

December 30, 2024 1:34 PM

views 13

परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस. जयशंकर आजपासून तीन दिवस कतारच्या दौऱ्यावर

परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस. जयशंकर आजपासून तीन दिवस कतारच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यादरम्यान ते कतारचे प्रधानमंत्री आणि परराष्ट्र मंत्री शेख मोहम्मद बिन अब्दुलरहमान बिन जस्सीम अल थानी यांची भेट घेतील. दोन्ही देशांदरम्यानच्या राजकीय, सांस्कृतिक, व्यापार, गुंतवणूक, ऊर्जा, सुरक्षा, तसंच नागर...

December 30, 2024 7:00 PM

views 29

व्यापार आणि उद्योग क्षेत्रातल्या प्रतिनिधींसोबत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची अर्थसंकल्पपूर्व बैठक

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली आज दिल्लीत अर्थसंकल्पपूर्व बैठक झाली. या बैठकीत व्यापार आणि उद्योग प्रतिनीधी तसंच आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रातले तज्ञ सहभागी झाले होते. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली आज या बैठकीला वित्त, गुंतवणूक आणि सार्वजनिक माल...

December 30, 2024 2:54 PM

views 40

अंतराळात झेपावलेले उपग्रह कक्षेतच एकमेकांना जोडण्याच्या प्रयोगासाठी इसरो सज्ज

भारतीय अंतराळ संशोधन संस्था - इस्रो आज रात्री श्रीहरिकोटा इथून दोन उपग्रह प्रक्षेपित करणार आहे. इस्त्रोचा अग्निबाण, 476 किलोमीटरच्या वर्तुळाकार कक्षेत एस डी एक्स 01 आणि एस डी एक्स 02 या दोन उपग्रहांना स्थापित करेल. त्यानंतर अंतराळातच हे उपग्रह जोडण्याचा प्रयोग करण्यात येणार आहे.  ही कामगिरी करणारा भ...

December 30, 2024 1:46 PM

views 32

डिसेंबरमध्ये भारतीय भांडवली बाजारात २२,००० कोटींहून अधिक रुपयांची परदेशी गुंतवणूक

विदेशी गुंतवणूकदारांनी डिसेंबरमध्ये आतापर्यंत भारतीय भांडवली बाजारात २२,००० कोटींहून अधिक रुपयांची गुंतवणूक केली आहे. डिपॉझिटरीजच्या आकडेवारीनुसार, विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारात १६ हजार ६७५ कोटी रुपये आणि पत पुरवठा बाजारामध्ये ५ हजार ३५२ कोटी रुपये गुंतवले, त्यामुळं भारतीय भा...

December 30, 2024 10:47 AM

views 15

पंजाब पोलिसांकडून आयएसआय समर्थित नार्को दहशतवादी पद्धतीचा छडा, ५ जणांना अटक

पंजाब पोलिसांनी आयएसआय समर्थित नार्को दहशतवादी पद्धतीचा छडा लावत, त्याच्या म्होरक्यासह पाच जणांना अटक केली आहे. बटाला आणि गुरुदासपूर इथल्या दोन पोलिस आस्थापनांवर हँडग्रेनेड फेकण्यातही या पाच जणांचा सहभाग होता. तसंच बब्बर खालसा इंटरनॅशनल आणि अन्य दोन परदेशी हस्तक ही टोळी चालवत होते, अशी माहिती पुनाबच...

December 30, 2024 8:07 PM

views 21

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जिमी कार्टर यांचं निधन

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जिमी कार्टर यांचं काल रात्री जॉर्जियातल्या प्लेन्स इथल्या निवासस्थानी निधन झालं. ते १०० वर्षांचे होते. कार्टर हे १९७७ ते १९८१ या कालावधीत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते. त्यांना २००२ मध्ये शांततेसाठीचा नोबेल पुरस्कार मिळाला होता. ते आतापर्यंतचे सर्वात वयोवृद्ध राष्ट्रपती...

December 30, 2024 10:07 AM

views 43

अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्पपूर्व व्यापार आणि उद्योग नेत्यांशी चर्चा करणार

अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज अर्थसंकल्पपूर्व व्यापार आणि उद्योग नेत्यांशी चर्चा करणार आहेत. बैठकीदरम्यान, भारत आता उच्च वाढीला समर्थन देण्यासाठी GDP चा सर्वात मोठा घटक असलेल्या क्रयशक्तिला चालना देण्यासाठी उपाय योजण्याची अपेक्षा आहे.