December 30, 2024 8:18 PM

views 46

हवेची गुणवत्ता घसरून प्रदुषणात वाढ – मुंबई महानगरपालिका

हिवाळ्यातलं उतरलेलं तापमान, कमी झालेला वाऱ्याचा वेग यामुळे नैसर्गिक वायुवीजन कमी होऊन, हवेची गुणवत्ता घसरल्याचं तसंच प्रदुषणातही वाढ झाल्याचं बृहन्मुंबई महानगर पालिकेनं म्हटलं आहे. यासोबतच ऐन थंडीच्या काळातल्या ढगाळ हवामान, वाहनांचं उत्सर्जन आणि बांधकामांच्या ठिकाणी निर्माण होणारी धूळ यामुळेही वायू ...

December 30, 2024 7:08 PM

views 57

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीला पणन मंत्र्यांची दिली भेट

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जागेवर जर अतिक्रमण झाले असेल तर ते अतिक्रमण तात्काळ निर्मूलन करण्यात येईल असं राज्याचे पणन मंत्री जयकुमार रावल यांनी आज नवी मुंबईत म्हटलं आहे. वाशी इथल्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीला भेट देत विविध प्रकल्पांची पाहणी त्यांनी आज केली. त्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते...

December 30, 2024 7:04 PM

views 24

शेतीशी निगडीत काळाबाजार करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा कृषिमंत्र्यांच्या इशारा

शेतीशी निगडीत वस्तू, अवजारं यांचा काळाबाजार करणारे दुकानदार आणि अधिकारी यांच्यावर कठोर कारवाई करण्याचा इशारा राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी आज दिला. खतांचा काळाबाजार होत असल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांकडून होत होत्या. त्या अनुषंगाने विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेतल्यानंतर कोकाटे बोलत ह...

December 30, 2024 8:18 PM

views 27

बॉर्डर-गावस्कर चषक क्रिकेट : चौथ्या सामन्यात भारताचा १८४ धावांनी पराभव

बॉर्डर-गावस्कर चषक क्रिकेट स्पर्धेच्या चौथ्या सामन्यात आज ऑस्ट्रेलियानं भारताचा १८४ धावांनी पराभव केला. ५ सामन्यांच्या या मालिकेत ऑस्ट्रेलिया २ - १नं आघाडीवर आहे.  दुसऱ्या डावात विजयासाठी ३४० धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाचा डाव केवळ १५५ धावात आटोपला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियन ...

December 30, 2024 4:40 PM

views 31

लातूर जिल्ह्यात वेळा अमावस्येचा सण मोठ्या उत्साहात साजरा

लातूर जिल्ह्यात वेळा अमावस्येचा सण आज मोठ्या उत्साहात  साजरा झाला. या वर्षी पाऊस चांगला झाल्यामुळं आजची अमावस्या शेतकऱ्यांसह सर्वच जणांनी मोठ्या हर्षोल्हासात साजरी केली. या प्रसंगी पिकांची, शेतातल्या धान्याची पूजा करून, विशिष्ट खाद्यपदार्थ बनवून मित्र-परिवारासोबत वनभोजनाचा आनंद आज लातूर जिल्ह्यातल्य...

December 30, 2024 7:22 PM

views 45

आज सोमवती अमावस्या

जेजुरी गडावर आज सोमवती अमावस्या यात्रा मोठ्या उत्साहात  साजरी करण्यात आली. दुपारी एक वाजता देवाच्या उत्सवमूर्तींचा पालखी सोहळा कऱ्हा स्नानासाठी काढण्यात आला. यावेळी देव संस्थानच्या वतीने बंदुकीच्या फैरी झाडून सलामी देण्यात आली. भाविकांनी 'येळकोट येळकोट जय मल्हार', 'सदांनंदाचा येळकोट' असा जयघोष करत भ...

December 30, 2024 3:56 PM

views 34

राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यात वनराई बंधारे बांधण्याचं उद्दिष्ट निश्चित

राज्यात खरीप हंगामात झालेल्या चांगल्या पावसामुळे धरणांमध्ये मुबलक पाणी साठा आहे. राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यात वनराई बंधारे बांधण्याचं उद्दिष्ट कृषी विभागाने निश्चित केलं असून, त्याच्या अंमलबजावणीला सुरुवातही झाली आहे. राज्यात २०२४-२५ या वर्षात ५० हजार वनराई बंधारे बांधण्याचं उद्दिष्ट कृषी विभागानं...

December 30, 2024 2:51 PM

views 43

संतोष चषक फुटबॉल स्पर्धेत पश्चिम बंगालची अंतिम फेरीत धडक

हैद्राबाद इथं सुरु असलेल्या संतोष चषक फुटबॉल स्पर्धेत काल पश्चिम बंगालनं मागील उपविजेत्या सैन्यदल संघाचा ४-२ असा पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली आहे. हैद्राबादच्या जीएमसी बालयोगी स्टेडियमवर काल रात्री हा सामना खेळवला गेला. उपांत्य फेरीच्या दुसऱ्या सामन्यात केरळनं मणिपूरचा ५ विरुद्ध १ गोलनं पराभव करत...

December 30, 2024 2:46 PM

views 46

पालघरमध्ये एमआयडीसीमध्ये अग्नितांडव, ३ कंपन्या जळून खाक

पालघर जिल्ह्यात बोईसर-तारापूर एमआयडीसीमध्ये यू. के. अरोमेटिक्स अँड केमिकल या कंपनीत काल लागलेल्या आगीत ३ कंपन्या जळून खाक झाल्या. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. अग्निशमन दलाने शर्थीच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवलं.

December 30, 2024 2:43 PM

views 26

पुढील काही दिवस देशातल्या काही भागात पाऊस आणि हिमवृष्टीचा अंदाज

भारतीय हवामान विभागानं पश्चिम वाऱ्यांच्या प्रभावामुळं १ ते ४ जानेवारीपर्यंत हिमालयाच्या पश्चिम भागात पाऊस आणि हिमवृष्टीचा अंदाज वर्तवला आहे. यावर्षी डिसेंबरमध्ये हिमाचल प्रदेशात चांगला पाऊस आणि बर्फवृष्टी झाली. बर्फवृष्टीमुळे शेतकरी आणि फळबागायतदार आनंदले असून पर्यटक हिमवर्षावाचा मनमुराद आनंद घेत आह...