January 22, 2026 1:33 PM

views 48

गेल्या दशकभरात भारत एक जागतिक आर्थिक शक्ती म्हणून उदयाला आला आहे- मंत्री के. राममोहन नायडू

गेल्या दशकभरात भारत एक जागतिक आर्थिक शक्ती म्हणून उदयाला आला आहे, असं नागरी विमान वाहतूक मंत्री के. राममोहन नायडू यांनी सांगितलं. ते दावोस इथं जागतिक आर्थिक मंचाच्या बैठकीत आयोजित सत्रात काल बोलत होते. भारत आता उदयोन्मुख अर्थव्यवस्था राहिला नसून जागतिक अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा भाग बनला आहे, असं नाय...

January 22, 2026 11:50 AM

views 59

भारत त्याच्या अणुऊर्जा कार्यक्रमात एका महत्त्वपूर्ण टप्प्यावर आहे केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह

भारत, अणुउर्जा कार्यक्रमाच्या निर्णायक टप्प्यावर पोहोचला असून, त्यासाठी सर्वोच्च सुरक्षा निकष कायम ठेवत ऊर्जा सुरक्षा बळकट करण्याच्या उद्देशाने सुधारणा केल्या जात असल्याचे विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह यांनी काल स्पष्ट केलं. दिल्लीत माध्यम प्रतिनिधींच्या गोलमेज परिषदेत संवाद साध...

January 22, 2026 11:41 AM

views 137

नीती आयोगाने सिमेंट, ॲल्युमिनियम आणि एमएसएमई क्षेत्रांमधील हरित संक्रमणावरील अहवाल प्रकाशित केला.

नीति आयोगाने काल दिल्लीत सिमेंट, अल्युमिनियम आणि सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग आदी क्षेत्रांसाठी कार्बन डायऑक्साईडच्या उत्सर्जनामधील घट यांविषयीच्या आराखड्याचा अहवाल प्रकाशित केला. या दरम्यान नीति आयोगाचे उपाध्यक्ष सुमन बेरी यांनी सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्र तसेच भारताच्या विकासातील शाश्वत...

January 22, 2026 10:19 AM

views 160

न्यूझीलंडविरुद्ध वीस षटकांच्या पहिल्या सामन्यात भारताचा ४८ धावांनी विजय

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात काल पाच सामन्यांच्या मालिकेतील नागपूर इथं झालेला पहिला २० षटकांचा सामना भारतानं ४८ धावांनी जिंकला. प्रथम फलंदाजी करताना भारतानं अभिषेक शर्माच्या ३५ चेंडूतील तडाखेबंद ८४ आणि रिंकू सिंगच्या २० चेंडूतील ४४ धावांचा जोरावर पाहुण्यांसमोर 240 धावांचं आव्हान दिलं होतं. न्युझीलँडच...

January 22, 2026 10:04 AM

views 207

महाराष्ट्रातील सर्व मोठे सौर ऊर्जा प्रकल्प या वर्षाअखेरपर्यंत पूर्णत्वास जातील-मुख्यमंत्र्यांची दावोस बैठकीत घोषणा

महाराष्ट्रातील सर्व मोठे सौर ऊर्जा प्रकल्प या वर्षाअखेरपर्यंत पूर्णत्वास जातील अशी घोषणा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल केली. शेतकऱ्यांना स्थिर सौर ऊर्जा पुरवठा करण्याच्या दृष्टीने या प्रकल्पांचे आरेखन करण्यात आल्याचे फडणवीस म्हणाले. दावोसमध्ये 19 ते 23 जानेवारी दरम्यान सुरू असल...

January 22, 2026 10:01 AM

views 48

लघु उद्योग विकास बँक म्हणजेच सिडबीला, उद्योगवाढीसाठी पाच हजार कोटी रुपयांच्या समभाग साहाय्य देण्यास मंजुरी

दिल्लीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत काल, लघु उद्योग विकास बँक म्हणजेच सिडबीला, उद्योगवाढीसाठी पाच हजार कोटी रुपयांच्या समभाग साहाय्य देण्यास मंजुरी दिली आहे. या साहाय्यामुळे देशातल्या साडेपंचवीस लाखांहून अधिक सूक्ष्म, लघु आणि मध्य उद्योगांना फायदा होणा...

January 22, 2026 1:36 PM

views 139

ग्रीनलँडवर नियंत्रणासाठी बळाचा वापर करणार नाही- राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प

ग्रीनलँडवर नियंत्रणासाठी बळाचा वापर करणार नसल्याचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे मात्र आर्क्टिक बेटाची मालकी वॉशिंग्टनकडे द्यावी या मागणीचा त्यांनी पुनरूच्चार केला आहे. दावोसमध्ये आर्थिक मंचाच्या परिषदेला संबोधित करताना ग्रीनलँडच्या अधिग्रहणासंदर्भात चर्चा करण्यासाठी तातडी...

January 21, 2026 7:26 PM

views 88

एआय पायाभूत सुविधांमधे ७० अब्ज अमेरिकन डॉलरची गुंतवणूक होणार-अश्विनी वैष्णव

इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज दावोस इथं आयबीएमचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरविंद कृष्णा आणि मेटाचे मुख्य जागतिक व्यवहार अधिकारी जोएल कप्लन यांची भेट घेतली. जग भारताकडे जागतिक नवोन्मेषाचे चालक म्हणून पाहत आहे, असं वैष्णव म्हणाले. एआय पायाभूत सुविधांमधे ७० अब्ज अमे...

January 21, 2026 7:18 PM

views 85

मार्शल लॉ चुकीचा असून ही देशाविरोधात बंडखोरी असल्याचा दक्षिण आफ्रिकेच्या न्यायालयाचा निर्णय

२०२४ मधे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष यून सुक येवोल यांनी लादलेला मार्शल लॉ चुकीचा असून ही देशाविरोधात बंडखोरी असल्याचा निर्णय आज दक्षिण आफ्रिकेच्या न्यायालयाने दिला. दक्षिण कोरियाचे माजी प्रधानमंत्री हान डुक सू यांनी यून यांना त्या काळात मदत केल्याचा ठपका ठेवत त्यांना २३ वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुन...

January 21, 2026 1:39 PM

views 69

छत्तीसगडच्या गरियाबंद जिल्ह्यात नऊ नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण

छत्तीसगडच्या गरियाबंद जिल्ह्यात नऊ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलं. यातल्या एका महिलेनं जिल्ह्यातल्या इतर नक्षलवाद्यांना शरण येण्याचं आवाहन केलं आहे. जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक वेदव्रत सिरमौर यांनीही या परिसरातल्या नक्षलवाद्यांना आत्मसमर्पण करण्याचं आवाहन केलं आहे.  समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील व्हा ...