January 22, 2026 3:14 PM

views 75

मुंबई विद्यापीठाच्या संशोधक विद्यार्थ्यांची दोन सुवर्ण आणि दोन कांस्य पदकांची कमाई

भारतीय विद्यापीठ संघाच्या वतीने आयोजित केलेल्या पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठीय संशोधन महोत्सवात मुंबई विद्यापीठाच्या संशोधक विद्यार्थ्यांनी दोन सुवर्ण आणि दोन कांस्य पदकांची कमाई केली आहे. गुजरातमधल्या सरदार पटेल विद्यापीठात काल ही स्पर्धा झाली. यात मूलभूत शास्त्र आणि सामाजिक शास्त्र गटात दोन सुवर्ण...

January 22, 2026 3:11 PM

views 110

बीड जिल्ह्यात खरीप हंगाम तूर उत्पादक शेतकऱ्यांसाठी शासकीय हमीभाव केंद्रावर नोंदणी प्रक्रियेला सुरूवात

बीड जिल्ह्यात खरीप हंगाम २०२५-२६ मधील तूर उत्पादक शेतकऱ्यांसाठी शासकीय हमीभाव केंद्रावर नोंदणी प्रक्रियेला सुरूवात झाली आहे. २० फेब्रुवारी पर्यंत नोंदणी करता येणार आहे. केंद्र सरकारने यावर्षी तुरीसाठी ८हजार रुपये प्रति क्विंटल असा आधार भाव जाहीर केला आहे. खुल्या बाजारातील चढ-उतारांपासून संरक्षण मिळव...

January 22, 2026 3:07 PM

views 125

रणजी क्रिकेट स्पर्धेचा दुसरा टप्पा हैद्राबादच्या राजीव गांधी मैदानात सुरु

रणजी क्रिकेट स्पर्धेचा दुसरा टप्पा आज हैद्राबादच्या राजीव गांधी मैदानात आज सुरु झाला. मुंबई विरुद्ध हैद्राबाद असा हा सामना असून, हैद्राबादनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना उपाहारापर्यंत मुंबईच्या २ बाद ७९ धावा झाल्या आहेत. मुशीर खान ९ तर कर्णधार सिद्धेश...

January 22, 2026 3:03 PM

views 65

राष्ट्रपती भवनाच्या परिसरातलं ऐतिहासिक अमृत उद्यान येत्या ३ फेब्रुवारीपासून जनतेला पाहण्यासाठी खुलं

राष्ट्रपती भवनाच्या परिसरातलं ऐतिहासिक अमृत उद्यान येत्या ३ फेब्रुवारीपासून सर्वसामान्य जनतेला पाहण्यासाठी खुलं करण्यात येणार आहे. ३१ मार्चपर्यंत हे उद्यान सकाळी १० ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत खुलं राहिल. हे उद्यान ४ मार्च रोजी होणाऱ्या होळीनिमित्त बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती आमच्या प्रतिनिधीन...

January 22, 2026 3:40 PM

views 127

तिसरी मुंबई आणि रायगड जिल्हा परिसरातल्या विविध प्रकल्पांसाठी महाराष्ट्र सरकारचे सामंजस्य करार

महाराष्ट्र सरकारच्या वतीनं मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने रायगड जिल्ह्यातल्या पेण तालुक्यात विकास केंद्र उभारण्यासाठी काल दावोस इथं विविध जागतिक कंपन्यांसमवेत सामंजस्य करार केले. तिसरी मुंबई म्हणून संकल्पित असलेला हा प्रकल्प, तंत्रज्ञान, अर्थतंत्र आणि डेटा सेंटरसाठी अत्याधुनिक केंद्र म्हणून ...

January 22, 2026 2:45 PM

views 110

ख्यातनाम ढोलकीवादक राजाभाऊ जामसंडेकर यांचं मुंबईत निधन

जागतिक कीर्तीचे ख्यातनाम ढोलकीवादक राजाभाऊ जामसंडेकर यांचं आज पहाटे मुंबईत निधन झालं. ते ७४ वर्षांचे होते. उस्ताद झाकिर हुसेन, पंडित भवानी शंकर यांसारख्या कलाकारांसोबत जुगलबंदी वादन करणाऱ्या राजाभाऊंनी हिंदी-मराठी सिनेसृष्टीतल्या अनेक संगीतकारांसोबतही काम केलं. लोकशाहीर विठ्ठल उमप यांच्या लोकसंगीताच...

January 22, 2026 1:53 PM

views 67

मध्यप्रदेश आणि राजस्थानात आज जेरदार पाऊस

देशाच्या उत्तर भागात पश्चिमेकडच्या वाऱ्यांच्या प्रभावामुळे उत्तरेकडच्या थंड वाऱ्यांना काहीसा पायबंद बसला आहे. हिमाचल प्रदेशात हवामान कोरडं असून मोसमातल्या पहिल्या हिमवृष्टीची प्रतीक्षा पर्यटक करीत आहेत. पश्चिमेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे जम्मू काश्मीर आणि लडाखमधे कडाक्याची थंडी आहे. तापमापकातला पारा ल...

January 22, 2026 1:48 PM

views 138

पी व्ही सिंधू आणि लक्ष्य सेन यांचा इंडोनेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश

पी व्ही सिंधू आणि लक्ष्य सेन या दोघांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करत इंडोनेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. लक्ष्य सेननं पुरुष एकेरी गटात हाँगकाँग चीनच्या जेसन गुनावान याला २१-१०, २१-११ असं नमवलं तर महिला एकेरीमध्ये दोन वेळच्या ऑलिम्पिक पदकविजेत्या सिंधूनं ड...

January 22, 2026 1:44 PM

views 56

झारखंडमधल्या पश्चिम सिंगभूम जिल्ह्यामधल्या जंगलात आज सुरक्षा दल आणि नक्षलींमधे चकमक

झारखंडमधल्या पश्चिम सिंगभूम जिल्ह्यामधल्या जंगलात आज सकाळी सुरक्षा दल आणि नक्षलींमधे चकमक झाली. सुरक्षा दलाकडून या परिसरात शोधमोहीम सुरू असताना या चकमकीला सुरुवात झाली. यात काही नक्षली मारले गेल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यानंतर बाकीचे नक्षली जंगलात आणि डोंगराळ भागात पळून जाण्यात यशस्वी झाले. सुरक्...

January 22, 2026 1:39 PM

views 74

तमिळनाडू विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी विरोधी पक्ष नेते पळणीसामी यांची भेट घेतली

तमिळनाडू विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपचे वरिष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी आज चेन्नईमध्ये अण्णा द्रमुक पक्षाचे महासचिव आणि विरोधी पक्ष नेते पळणीसामी यांची भेट घेतली. राष्ट्रीय लोकशाही आघाडीतल्या मित्र पक्षांशी आगामी निवडणुकीच्या रणनीतीबाबत चर्चा करण्यासाठी गोयल चेन्नई दौऱ्...