January 1, 2026 8:08 PM

views 62

देशातली पहिली ‘वंदे भारत स्लीपर ट्रेन’ लवकरच सुरु होणार असल्याची रेल्वेमंत्र्यांची माहिती

देशातली पहिली ‘वंदे भारत स्लीपर ट्रेन’ लवकरच सुरु होणार असून, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या काही दिवसांमध्ये या गाडीला हिरवा झेंडा दाखवतील, असं रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी घोषित केलं आहे. ते आज नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेला संबोधित करत होते. पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन गोहाटी आणि कोलकाता ...

January 1, 2026 7:56 PM

views 40

जीएसटी संकलनात ६.१ दशांश टक्क्यांची वाढ

डिसेंबर २०२५ मध्ये जीएसटी, अर्थात वस्तू आणि सेवा कराचं एकंदर संकलन सुमारे एक लाख ७५ हजार कोटी रुपयांवर पोहोचलं आहे. गेल्या वर्षीच्या या कालावधीच्या तुलनेत ही वाढ ६ पूर्णांक १ दशांश टक्के आहे.   डिसेंबर २०२४ मध्ये जीएसटी संकलन १ लाख ६४ हजार कोटी रुपये इतकं होतं.  डिसेंबर २०२५ मध्ये केंद्रीय जीएस...

January 1, 2026 7:49 PM

views 62

काँग्रेसचं उद्दिष्ट मुंबईला भ्रष्टाचारमुक्त करून पारदर्शक आणि जबाबदार प्रशासन देण्याचं आहे- वर्षा गायकवाड

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी काँग्रेसचं उद्दिष्ट मुंबईला भ्रष्टाचारमुक्त करून पारदर्शक आणि जबाबदार प्रशासन देण्याचं आहे, असं मुंबई काँग्रेस अध्यक्ष वर्षा गायकवाड म्हणाल्या. त्या आज मुंबईत माध्यमांशी बोलत होत्या.   सत्ताधारी महायुतीने गेली अनेक वर्षं मुंबई महापालिकेच्या प्रशासनात राहून मुंबई...

January 1, 2026 7:41 PM

views 46

भाजपमधल्या नाराज कार्यकर्त्यांशी चर्चा करून अपक्ष अर्ज मागे घेतले जातील- चंद्रशेखर बावनकुळे

महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपमधल्या नाराज पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी चर्चा करून अपक्ष अर्ज मागे घेतले जातील, अशी ग्वाही महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. नागपूर इथे ते माध्यमांशी बोलत होते. काही कारणांमुळे नाराज झालेले कार्यकर्ते पक्षासाठीच काम करतील अशी अपेक्षाही त्यांन...

January 1, 2026 7:08 PM

views 94

राज्यातल्या २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी अर्ज मागे घ्यायची प्रक्रिया सुरू

राज्यातल्या महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्जांची छाननी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आज अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया सुरू झाली. तसंच काही ठिकाणचे अर्ज बाद झाल्याने काही उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.    नाशिकमधे भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने काही ठिकाणी दोन उमेदवारांना एबी फॉ...

January 1, 2026 4:47 PM

views 58

कल्याणमधे अल्पवयीन मुलाच्या अपहरणा प्रकरणी चौघांना अटक

कल्याणमधे एका अल्पवयीन मुलाची फसवणूक करून त्याचं खंडणीसाठी अपहरण करणाऱ्या चौघांना पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींनी समाज माध्यमावर एका तरुणीच्या नावाचं बनावट खातं तयार करून या मुलाशी मैत्री केली.   प्रेमसंबंधांचा आभास निर्माण करून त्याचा विश्वास संपादन केला आणि त्याला कल्याणमध्ये नांदिवली भागात ...

January 1, 2026 3:36 PM

views 76

राज्यभरात नववर्षाचं उत्साहात स्वागत

नववर्षाचं स्वागत देशभरासह राज्यात आनंदात आणि उत्साहात झालं.  राजधानी दिल्लीसह देशाच्या इतर भागातही नववर्षाचं स्वागत करण्यासाठी नागरिक एकत्र आले  होते.     मुंबईत गेटवे ऑफ इंडिया, मरीन ड्राइव्ह,  गिरगाव, दादर, जुहू चौपाटी, आणि इतर सार्वजनिक ठिकाणी नागरिकांनी एकत्र येऊन मोठ्या जल्लोषात नववर्षाचं ...

January 1, 2026 3:33 PM

views 320

मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी २ हजार ३४९ उमेदवारी अर्ज वैध

महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्जांची काल छाननी झाली. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी २ हजार ५१६ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. राज्य निवडणूक आयोगाने केलेल्या छाननीत त्यातले १६७ अर्ज अवैध ठरले. नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी एकूण ९४६ अर...

January 1, 2026 2:49 PM

views 47

CSMIA विमानतळावर ३ कोटी ८९ लाख रुपये किमतीच्या सोन्याची तस्करी उघडकीस

DRI, अर्थात महसूल गुप्तचर संचालनालयानं काल मुंबई छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर केलेल्या कारवाईत ३ कोटी ८९ लाख रुपये किमतीच्या सोन्याची तस्करी उघडकीला आणली. यावेळी DRI च्या पथकानं बहरीन इथून आलेल्या एका प्रवाशाकडून मेणाच्या स्वरूपात सोन्याची भुकटी भरलेल्या १२ कॅप्सूल जप्त केल्या. या ...

January 1, 2026 2:33 PM

views 49

बिहारमध्ये बेगुसराय जिल्ह्यात झालेल्या चकमकीत एक नक्षली ठार

बिहारमध्ये बेगुसराय जिल्ह्यात पोलिसांच्या विशेष कृती दला बरोबर काल झालेल्या चकमकीत एक नक्षली ठार झाला. ‘दयानंद मालाकर, उर्फ छोटू’ अशी त्याचं नाव असून, त्याच्यावर ५० हजार रुपयांचं बक्षीस होतं. १४ पेक्षा जास्त गुन्हेगारी प्रकरणांमध्ये, तसंच उत्तर बिहारमध्ये अनेक नक्षली कारवायांमध्ये त्याचा सहभाग असल्य...