June 20, 2024 8:21 PM

views 46

देशाचा विकास दिव्यांगांविषयी बाळगलेल्या संवेदनशीलतेच्या आधारेच गणला जाऊ शकतो – राष्ट्रपती

एखाद्या देशाचा किंवा समाजाचा विकास त्या देशाच्या नागरिकांनी दिव्यांग जनांविषयी बाळगलेल्या संवेदनशीलतेच्या आधारेच गणला जाऊ शकतो, असं मत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज नवी दिल्ली इथं मांडलं. त्या पंडित दिनदयाळ उपाध्याय राष्ट्रीय दिव्यांग संस्थेच्या विद्यार्थ्यांच्या मेळाव्यात बोलत होत्या. समावेशी ...

June 20, 2024 8:14 PM

views 37

कोळसा खाणींच्या व्यवस्थापनाचा आढावा घेण्यासाठी बैठक

कोळसा खाणींच्या व्यवस्थापनाचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय कोळसा आणि खाण मंत्री जी. किशन रेड्डी यांनी आज कोळसा मंत्रालयाच्या उच्च अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. कोळशाची आयात कमी करण्यासाठी कोळसा उत्पादन वाढवण्याची गरज यावेळी मंत्री रेड्डी यांनी व्यक्त केली. तसंच कोळसा खाणी लवकरात लवकर कार्यान्वित करण्यासाठ...

June 20, 2024 8:10 PM

views 51

चांगल्या कामगिरीच्या आधारेच जनतेनं सलग तिसऱ्यांदा निवडून दिलं – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

आपलं सरकार चांगली कामगिरी करून दाखवतं या कामगिरीच्या आधारेच आपल्याला देशातल्या जनतेनं सलग तिसऱ्यांदा निवडून दिलं आहे, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज जम्मू-काश्मीरमधे सांगितलं. लोकसभा निवडणुकीनंतरची त्यांची ही पहिली जाहीरसभा होती.   आगामी काळात जम्मू कश्मीर एक राज्य म्हणून आपलं भविष्य घड...

June 20, 2024 7:52 PM

views 66

नैर्ऋत्य मोसमी पाऊस विदर्भात दाखल, पालघर जिल्ह्याला रेड अलर्ट

नैर्ऋत्य मोसमी पाऊस आज विदर्भात दाखल झाला असून पुढच्या दोन दिवसात उर्वरित राज्य व्यापण्याच्या दृष्टीनं स्थिती अनुकूल आहे. कोकण, मध्यमहाराष्ट्र आणि मराठवाड्यातही काल पाऊस पडला. येत्या दोन दिवसात कोकण आणि विदर्भात बहुतेक ठिकाणी पाऊस पडेल असा अंदाज आहे. किनारपट्टीच्या भागात सोसाट्याचे वारे वाहण्याची शक...

June 20, 2024 7:39 PM

views 55

शेतकऱ्यांनी पर्यायी खतांचा वापर करण्याचं कृषी विभागाचं आवाहन

खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांनी डीएपी खतावरच अवलंबून न राहता पर्यायी खतांचा वापर करण्याचं आवाहन कृषी विभागाने राज्यातल्या शेतकऱ्यांना केलं आहे. डीएपी खतानंतर एसएसपी या खताला सर्वाधिक मागणी असून यात १६ टक्के स्फुरदसह इतर अन्नद्रव्ये आढळून येतात. तसंच डीएपी खताच्या एका गोणी ऐवजी अर्धी गोणी युरिया आणि तीन ...

June 20, 2024 7:34 PM

views 55

कोल्हापूर : तिलारी घाटात अवजड वाहनांची वाहतूक ३१ ऑक्टोबरपर्यंत बंद

कोल्हापूर जिल्ह्यातल्या तिलारी घाटातली अवजड वाहनांची वाहतूक ३१ ऑक्टोबरपर्यंत बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. पावसामुळे घाटातल्या रस्त्यांचे संरक्षण कठडे जीर्ण झाल्यामुळे अपघाताचा धोका असल्याने सावधानता म्हणून ही वाहतूक बंद करण्यात आली आहे. अवजड वाहनांना आंबोली घाट आणि कर्नाटकातला चोर्...

June 20, 2024 7:30 PM

views 45

कोकण रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणासाठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव

कोकण रेल्वे मार्गाच्या टप्प्याटप्प्यानं दुहेरीकरणासाठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवल्याची माहिती कोकण रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार झा यांनी आज वार्ताहरांना सांगितलं. गेल्या ३ वर्षात ५० किलोमीटरचे दुहेरीकरण पूर्ण झाले आहे. मडगांव ते ठोकर आणि कणकवली ते सावंतवाडी या दरम्यान दुहेरीकणासाठी प...

June 20, 2024 8:40 PM

views 57

आर्थिक क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाची गरज – आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास

आर्थिक क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता यांत्रिक आकलन आणि विदा विश्लेषणासारख्या आधुनिक तंत्रज्ञानाची गरज रिझर्व बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी अधोरेखित केली आहे. वित्तीय धोरणाच्या लवचिकतेबद्दल चर्चा करण्यासाठी मुंबईत आयोजित परिषदेत ते आज बोलत होते. या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने अचूक विश्लेषण शक्य अ...

June 20, 2024 7:02 PM

views 39

‘पदवीधर मतदारसंघासाठी नोंदणी करण्यासाठी पाठवलेले अर्ज बाद करण्यात आले’

मुंबई पदवीधर मतदारसंघासाठी मतदारांची नोंदणी करण्यासाठी आपण पाठवलेले अर्ज बाद करण्यात आले असून भाजपाने पाठवलेले अर्ज स्वीकारले गेल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने केला आहे. या संदर्भात खासदार अनिल देसाई यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना विचारणा केली. तसंच अर्ज बाद करण्य...

June 20, 2024 8:34 PM

views 46

देशात गव्हाचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचं केंद्र सरकारचं निवेदन

देशात गव्हाचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याची ग्वाही आज सरकारनं दिली. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली जीवनावश्यक वस्तूंच्या दराचा आढावा घेण्यासाठी मंत्र्यांची बैठक झाली. त्यावेळी ही माहिती देण्यात आली. रब्बी हंगामात १८ जून २०२४ पर्यंत २६६ लाख मेट्रिक टन तर २०२३मध्ये २६२ लाख ...