June 21, 2024 11:35 AM

views 52

दिल्लीमध्ये उष्णतेची लाट !

दिल्लीमध्ये गेल्या २४ तासात उष्माघातामुळे सफदरगंज रुग्णालयात ६ रुग्ण भरती झाले होते. त्यापैकी दोनरुग्णांचा मृत्यू झाला आहे तर तीन जणांची प्रकृती चिंताजनक आहे. उष्णतेच्या त्रासाशीसंबंधित ४७ रुग्ण सध्या रुग्णालयात दाखल असून त्यापैकी २९ जणांची प्रकृती चिंताजनकआहे. १६ जूनपासून उष्णतेशी संबंधित आजारांमुळ...

June 21, 2024 10:20 AM

views 63

लोकसभा निवडणूक : ईव्हीएम यंत्राची पडताळणी करण्यासाठी निवडणूक आयोगाकडे ८ अर्ज दाखल

२०२४च्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या निकाल जाहीर झाल्यानंतर, ईव्हीएम यंत्राची पडताळणी करण्यासाठी काही राजकीय पक्षांच्या उमेदवारांकडून निवडणूक आयोगाकडे आठ अर्ज दाखल झाले आहेत. महाराष्ट्रातून अहमदनगर लोकसभा मतदारसंघातले पराभूत उमेदवार डॉ.सुजय विखे पाटील यांच्या अर्जाचाही यात समावेश आहे. तसंच तामिळन...

June 21, 2024 10:09 AM

views 41

अरविंद केजरीवाल यांना मद्य घोटाळ्याशी संबंधित प्रकरणामध्ये जामीन मंजूर

दिल्लीचे मुख्यमंत्री तसंच आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांना मद्य घोटाळ्याशी संबंधित प्रकरणामध्ये दिल्लीच्या राऊस ॲव्हेन्यू कोर्टाने काल जामीन मंजूर केला. याआधी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी त्यांना अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला होता. मात्र, पुन्हा त्यांची रवानगी तुरुंगात करण्यात आली हो...

June 21, 2024 10:05 AM

views 63

नीट परिक्षेसंबंधीत चौकशी करण्याची उच्चस्तरीय समितीची स्थापना करण्याची घोषणा

वैद्यकीय प्रवेशासाठीची राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा-नीट २०२४ संबंधीत मुद्यांची चौकशी करण्यासाठी एक उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याची घोषणा केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केली आहे. ते काल नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत बोलत होते. राष्ट्रीय परीक्षा परिषद आणि तिच्या कार्यप्रणालीत आणखी स...

June 21, 2024 8:24 PM

views 68

‘लाइफ इन लूम’ या लघुपटाला सर्वोत्कृष्ट लघुपटाचा पुरस्कार प्रदान

१८व्या 'मिफ', अर्थात मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा समारोपाचा सोहळा आज मुंबईत सुरु आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित आहेत. इतर क्षेत्रासह भारत चित्रपटांच्या क्षेत्रातही आघाडीवर आहे. भारतीय कलावंत त्यांच्या कामाद्वारे जगभरात पोहोचत असल्य...

June 21, 2024 9:24 AM

views 86

टी ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारताचा अफगाणिस्तानवर ४७ धावांनी विजय

आयसीसी टी-ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत सुपर एटमधील सामन्यात काल भारतानं अफगाणिस्तानचा ४७ धावांनी पराभव केला. बार्बाडोसमधील ब्रिजटाऊनच्या केन्सिंग्टन ओव्हल इथं झालेल्या या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारतानं अफगाणिस्तानसमोर १८२ धावांचं आव्हान ठेवलं होतं, पण अफगाणिस्तानचा संघ निर्धारित २० षटकां...

June 21, 2024 2:35 PM

views 48

दहाव्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचा सर्वत्र उत्साह

दहावा आंतरराष्ट्रीय योग दिन आज संपूर्ण देशभरात तसंच जगभरातल्या अनेक देशांमध्ये उत्साहानं साजरा होत आहे. "स्वतःसाठी आणि समाजासाठी योग" ही या वर्षीच्या योग दिवसाची मध्यवर्ती संकल्पना आहे.आंतरराष्ट्रीय योग दिनाचा देशातला मुख्य कार्यक्रम जम्मू आणि काश्मीरमध्ये श्रीनगर इथं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ...

June 21, 2024 9:51 AM

views 60

लोकसभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून भर्तृहरी महताब यांची नियुक्ती

भाजपाचे खासदार भर्तृहरी महताब यांची लोकसभेच्या हंगामी अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ही नियुक्ती केली असल्याची माहिती, केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजीजू यांनी समाज माध्यमावरील संदेशाद्वारे दिली आहे. लोकसभेच्या अध्यक्षांची निवड होईपर्यन्त, महताब अध्यक्षप...

June 21, 2024 11:29 AM

views 77

बांगलादेशच्या प्रधानमंत्री शेख हसीना दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर

बांग्लादेशच्या प्रधानमंत्री शेख हसिना आजपासून दोन दिवसाच्या भारत दौऱ्यावर येत आहेत. राष्ट्रपति द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची त्या भेट घेणार असून, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासमवेत त्यांची द्विपक्षीय बैठक होईल. शेख हसीना परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांची देखील भेट घेणार आ...

June 20, 2024 8:27 PM

views 40

राहुल गांधी नीट प्रकरणाचं राजकारण करत आहेत – सुधांशु त्रिवेदी

काँग्रेस नेते राहुल गांधी यांना विद्यार्थ्यांच्या भविष्याशी काही देणंघेणं नसून ते नीट प्रकरणाचं राजकारण करत आहेत, अशी टीका भाजपाचे प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांनी आज केली. सरकार नीट प्रकरणाबाबत संवेदनशील असून विद्यार्थ्यांवर कुठलाही अन्याय होणार नाही. तसंच दोषींवर कारवाई केली जाईल अशी ग्वाही त्रिवेद...