June 20, 2024 6:53 PM

views 44

बिहारमधलं वाढीव आरक्षण उच्च न्यायालयाकडून रद्दबातल

बिहार सरकारनं मागास, अति मागास, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींसाठी सरकारी नोकऱ्या आणि शिक्षण संस्थांमधे लागू केलेलं वाढीव आरक्षण पाटणा उच्च न्यायालयानं आज रद्दबातल ठरवलं. सर्वोच्च न्यायालयानं निर्धारित केलेल्या ५० टक्के आरक्षणाच्या मर्यादेत बदल करून बिहार सरकारनं हे आरक्षण ६५ टक्क्यापर्यंत वाढवलं...

June 20, 2024 4:21 PM

views 51

‘मराठा, ओबीसी समाजाच्या मागण्यांसाठी केंद्र सरकारनं पुढाकार घ्यावा’

मराठा आणि ओबीसी समाजाच्या मागण्यांबाबत विचार करण्यासाठी केंद्र सरकारनं पुढाकार घेण्याची गरज असल्याचं प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आज बारामती इथं केलं. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. या समाजांच्या आंदोलनांमुळं सामाजिक तणाव निर्माण होऊ नये म्हणून केंद...

June 20, 2024 3:50 PM

views 49

नीट परीक्षा : राष्ट्रीय चाचणी संस्थेच्या याचिकेसंदर्भात संबंधितांना नोटीस

यंदाच्या नीट अर्थात राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षेशी निगडित उच्च न्यायालयांमध्ये प्रलंबित सर्व खटले सर्वोच्च न्यायालयाकडे हस्तांतरित करण्याची मागणी करणाऱ्या राष्ट्रीय चाचणी संस्थेच्या याचिकेसंदर्भात सर्वोच्च न्यायालयानं आज संबंधितांना नोटीस बजावली. तसंच सर्वोच्च न्यायालयानं विविध उच्च न्यायालयांमध...

June 20, 2024 8:36 PM

views 35

‘वाढवण बंदर प्रकल्पामुळे राज्याच्या जीडीपीमध्ये १ टक्का वाढ होईल’

वाढवण बंदर प्रकल्प हा भारताच्या भविष्यासाठी अतिशय महत्वाचा प्रकल्प असून यामुळे राज्याच्या जीडीपीमध्ये एक टक्के वाढ होईल, असा विश्वास जेएनपीए अर्थात जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरणचे प्रमुख उन्मेष वाघ यांनी व्यक्त केला. ते मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते. कंटेनर वाहतुकीसाठी मुंद्रा आणि जेएनपी या बंदर...

June 20, 2024 2:46 PM

views 64

पालघर जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट

दिल्ली आणि आसपासच्या परिसरात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची आणि धुळीचं वादळ येण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. लोनीच्या ग्रामीण भागात, वायुदलाचा हिंडन तळ, बहादुरगड, गाजियाबाद, इंदिरापुरम या भागात पावसाची शक्यता असून हरियाणाच्या वल्लभगढ, सोनीपत, खरखोडा, मत्तलहेल तर उत्तर प्रदेशातल्या बागपत...

June 20, 2024 1:38 PM

views 47

राष्ट्रपतींच्या वाढदिवसानिमित्त उपराष्ट्रपती आणि प्रधानमंत्र्यांनी दिल्या शुभेच्छा

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या वाढदिवसानिमित्त उपराष्ट्रपती आणि प्रधानमंत्र्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी राष्ट्रपतींच्या निवासस्थानी भेट देत त्यांना निरोगी आणि आनंदी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. तर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती मुर्मू यांना समाजमा...

June 20, 2024 1:24 PM

views 74

विश्वचषक तिरंदाजी स्पर्धेच्या तिसऱ्या सत्रात भारतीय महिलांच्या संयुक्त संघाचा अंतिम फेरीत प्रवेश

विश्वचषक तिरंदाजी स्पर्धेच्या तिसऱ्या सत्रात भारतीय महिलांच्या संयुक्त संघानं अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. ज्योती सुरेखा वेण्णम, परनित कौर आणि अदिती गोपीचंद स्वामी यांच्या संघानं उपांत्यपूर्व सामन्यात टर्की संघाचा २३४ - २२७ अशा गुणफरकानं  पराभव केला. भारतीय संघाचा अंतिम सामना इस्टोनिया बरोबर या शनिव...

June 20, 2024 1:33 PM

views 47

प्रधानमंत्री दोन दिवसांच्या जम्मू-काश्मीर दौऱ्यावर

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आजपासून दोन दिवसांच्या जम्मू-काश्मीर दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यात ते ८४ विविध विकास प्रकल्पांचं उद्घाटन करणार असून श्रीनगरमध्ये उद्या होणाऱ्या `युवकांचं सक्षमीकरण, जम्मू-काश्मीरमध्ये बदल` या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. सरकारी सेवेत प्रवेश करणाऱ्या दोन हजार उमेदवारांना...

June 20, 2024 12:38 PM

views 81

IRGC कॅनडामध्ये दहशतवादी संघटना म्हणून घोषित

कॅनडानं इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कोर म्हणजेच IRGC या इराणी सशस्त्र दलाच्या शाखेला दहशतवादी संघटना म्हणून घोषित केलं आहे. कॅनडाचे सार्वजनिक सुरक्षा मंत्री डॉमिनिक लेब्लँक यांनी काल ही घोषणा करताना सांगितलं की कॅनडा IRGC च्या दहशतवादी कारवायांचा सामना करण्यासाठी सर्व उपाय लागू करेल. IRGC...

June 20, 2024 12:26 PM

views 42

सायबरसज्जता वाढवण्यासाठी सीईआरटी आणि मास्टरकार्ड इंडिया यांच्यात सहकार्य करार

देशात आर्थिक क्षेत्रात सायबरसज्जता वाढवण्यासाठी भारतीय संगणक आपत्कालीन प्रतिसाद पथक म्हणजे सीईआरटी आणि मास्टरकार्ड इंडिया यांच्यात सहकार्य करार करण्यात आला आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती-तंत्रज्ञान मंत्रालयानं याबाबत माहिती दिली. या दोन्ही संस्था सायबरसुरक्षिततेबाबत प्रतिसाद देण्यासाठीची यंत्रणा सक्...