June 25, 2024 2:47 PM

views 50

झारखंडमध्ये ७ माओवादी ताब्यात

झारखंडमधल्या लातेहार जिल्ह्यातल्या इचाबार इथून, बंदी असलेल्या कम्युनिस्ट पक्षापासून फारकत घेतलेल्या, तृतीय सम्मेलन प्रस्तुती समिती या प्रतिबंधीत गटाच्या सात सदस्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. या माओवाद्यांकडून दोन बंदुका आणि काही कागदपत्रे जप्त केल्याची माहिती स्थानिक पोलीस अधीक्षकांनी दिली आहे.

June 25, 2024 2:05 PM

views 43

९६ हजार कोटींहून अधिक रकमेच्या दूरसंचार स्पेक्ट्रमचा लिलाव सुरु

अस्तित्वात असलेल्या दूरसंचार सेवा विकसित करण्यासाठी आणि सेवेत सातत्य राखण्याच्या उद्देशानं केंद्र सरकारनं आज ९६ हजार कोटींहून अधिक रकमेच्या दूरसंचार स्पेक्ट्रमचा लिलाव सुरु केला आहे.

June 25, 2024 1:59 PM

views 65

७वी अर्थसंकल्प पूर्व बैठक आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली झाली

आगामी अर्थसंकल्पावर चर्चा करण्यासाठी ७वी अर्थसंकल्प पूर्व बैठक आज नवी दिल्ली इथं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली झाली. विविध व्यापार आणि सेवा पुरवठादार प्रतिनिधींसोबत सीतारामन यांनी सविस्तर चर्चा केली. या बैठकीला केंद्रीय अर्थराज्य मंत्री पंकज चौधरी, मुख्य आर्थिक सल्लागार ...

June 25, 2024 1:55 PM

views 37

नवनिर्वाचित संभासदांचा शपथविधी आजही सुरू

  १८ व्या लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीही नवनिर्वाचित खासदारांचे शपथविधी सुरू आहेत. काँग्रेस खासदार गोवाल पाडवी, श्यामकुमार बर्वे, बळवंत वानखेडे, भाजपाचे खासदार अनुप धोत्रे, शिवसेनेचे श्रीकांत शिंदे, नरेश म्हस्के आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरच्चंद्र पवार पक्षाचे अमर काळे यांनी आज ...

June 25, 2024 1:47 PM

views 72

राजकीय आणीबाणीचा विरोध करणाऱ्या सर्वांना प्रधानमंत्र्यांकडून आदरांजली

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी १९७५ मध्ये देशात लागू करण्यात आलेल्या राजकीय आणीबाणीचा विरोध करणाऱ्या सर्व स्त्री - पुरुषांना आदरांजली वाहिली आहे. सर्व भारतीयांना सन्मानिय असणाऱ्या संविधानाला अपमानित करत काँग्रेसनं जनतेच्या मुलभूत स्वातंत्र्याचं हनन केलं होतं, याची आठवण करून देणारा हा दिवस असल्याचं,...

June 25, 2024 1:39 PM

views 60

नीट संदर्भात विद्यार्थी आणि पालकांच्या समस्या जाणून घेण्यावर केंद्र सरकारनं स्थापन केलेली समिती भर देणार

राष्ट्रीय चाचणी संस्थेद्वारे घेतल्या जाणाऱ्या सर्व परीक्षा पारदर्शक, निष्पक्ष आणि सुरळीतपणे पार पडाव्यात, यासाठी शिक्षण मंत्रालयाने गठीत केलेल्या उच्चस्तरीय समितीची पहिली बैठक काल झाली. विद्यार्थी आणि पालकांच्या समस्या जाणून घेणं, हे समितीचं पहिलं प्राधान्य असून, त्यासाठी त्यांच्याशी संवाद साधला जाई...

June 25, 2024 11:26 AM

views 68

रेमल चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानाची पाहाणी कऱण्यासाठी केंद्रीय पथक राज्याच्या दौऱ्यावर

रेमल चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानाची पाहाणी कऱण्यासाठी केंद्रीय पथकाच्या भेटीनंतर राज्याने केंद्राकडे 237 कोटी रुपयांची मदत मागितली आहे. बाधित लोकांच्या पुनर्वसनासाठी तसेच वादळाने झालेल्या भूस्खलन तसेच मालमत्तेच्या नुकसानाच्या भरपाईसाठी राज्याने मागणी केली आहे. मे महिन्याच्या अखेरीस मिझोरामला रेमल...

June 25, 2024 11:13 AM

views 36

अरविंद केजरीवाल यांच्या जामिनाविरोधातल्या याचिकेवर आज सुनावणी होणार

उत्पादन शुल्क प्रकरणात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या जामिनाविरोधातल्या सक्तवसुली संचालनालयाच्या याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालय आज सुनावणी होणार आहे. 21 जूनला झालेल्या सुनावणीत न्यायालयाने आपला आदेश राखून ठेवला होता.   आज दुपारी न्यायमुर्ती सुधीर जैन यावर निकाल देतील. न्यायालयानं 2...

June 25, 2024 10:43 AM

views 47

केरळ राज्याचं नाव केरळम् असं करण्याचा प्रस्तावाला संमती

केरळ राज्याचं नाव केरळम् असं करण्याचा प्रस्ताव केरळच्या विधानसभेत काल एकमताने संमत झाला. मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी मांडलेला हा प्रस्ताव आता केंद्रसरकारकडे पाठवण्यात येईल.   यापूर्वी गेल्या ऑगस्टमध्ये असा प्रस्ताव केरळ विधानसभेने संमत केला होता, मात्र काही त्रुटी राहिल्यामुळे तो बारगळला होत...

June 25, 2024 2:42 PM

views 62

NEET-UG परीक्षांमधील गैरप्रकारांचे, बिहार गुजरात आणि राजस्थानमध्येही धागेदोरे

नीट-युजी प्रवेश परीक्षेतल्या गैरप्रकाराची चौकशी करण्यासाठी सीबीआयनं बिहार, गुजरात आणि राजस्थानमधली ५ प्रकरणं हाती घेतली आहेत. सीबीआयनं गुजरात आणि बिहारमध्ये प्रत्येकी एक, तर राजस्थानमध्ये ३ प्रकरणं हाती घेतली असून, महाराष्ट्रातल्या लातूरमधल्या प्रकरणाची चौकशी सीबीआय हाती घेण्याची शक्यता आहे. बिहार प...