June 25, 2024 10:00 AM

views 53

पुण्यामध्ये अंमली पदार्थ प्रकरणी बेकायदेशीर पबवर कारवाई करण्याचे मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण

  महाराष्ट्रात पुण्यामध्ये अंमली पदार्थ प्रकरणी बेकायदेशीर पबवर कठोर कारवाई करण्याचे आणि अमली पदार्थांशी संबंधित अवैध बांधकामांवर बुलडोझर फिरवण्याचे स्पष्ट निर्देश राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. पुण्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांना दूरध्वनी करुन मुख्यमंत्र्यांनी हे आदेश द...

June 25, 2024 9:45 AM

views 41

गव्हाचे दर स्थिर राखण्यासाठी केंद्र सरकारकडून गव्हाच्या साठवणुकीवर मर्यादा

गव्हाची साठेबाजी रोखण्यासाठी तसंच किमतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकारनं गव्हाच्या साठवणुकीवर मर्यादा घातल्या आहेत. सर्व राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशातले घाऊक, किरकोळ व्यापारी, साखळी पुरवठादार आणि प्रक्रिया उद्योग यांना ही साठवणूक मर्यादा लागू असेल.   अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाचे ...

June 25, 2024 9:41 AM

views 62

सर्वसामान्य जनतेच्या आशा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी सरकार प्रयत्नशील राहील-प्रधानमंत्र्यांची ग्वाही

18 वी लोकसभा विकसित भारताच्या उभारणीसाठी काम करेल, असं सांगून सरकार सर्वांना सोबत घेऊन लोकांच्या आशा-आकांक्षा पूर्ण करण्यासाठी सातत्यानं प्रयत्न करेल, अशी ग्वाही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल दिली. संसदेचं अधिवेशन सुरू होण्यापूर्वी ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. सरकार चालवण्यासाठी बहुमताची गरज...

June 25, 2024 9:32 AM

views 42

राष्ट्रीय अतिसार निर्मूलन मोहिमेला आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांच्या हस्ते प्रारंभ

केंद्रीय आरोग्य मंत्री जे.पी. नड्डा यांच्या हस्ते काल राष्ट्रीय अतिसार निर्मूलन मोहिमेची सुरुवात करण्यात आली. अतिसारामुळे होणारे बालमृत्यू थांबवणं हा या मोहिमेचा हेतू आहे. दोन महिने चालणाऱ्या या मोहिमेत पाच वर्षांखालच्या बालकांना ओआरएस आणि झिंकची पाकिटं देण्यात येणार आहेत.   जलजीवन मिशन, स्वच्छ...

June 24, 2024 8:20 PM

views 41

११३ देशांपैकी २६ देशांमध्ये महिला राष्ट्राचं प्रतिनिधित्व करत आहेत – संयुक्त राष्ट्र

जगभरातल्या देशांमध्ये महिलांची राजकीय क्षेत्रातली संख्या समाधानकारक नसल्याचं संयुक्त राष्ट्रानं आपल्या अहवालात म्हटलं आहे. जगातल्या ११३ देशांपैकी फक्त २६ देशांमध्ये महिला राष्ट्राचं प्रतिनिधित्व करत आहेत. २३ टक्के महिला या देशांमध्ये महत्त्वाच्या राजकीय पदांवर आहेत. तर १४१ देशांमध्ये फक्त तीन पदांवर...

June 24, 2024 8:08 PM

views 74

दक्षिण कोरियात बॅटरी कंपनीला लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू, २३ जण बेपत्ता

दक्षिण कोरियाची राजधानी सेओलमधल्या एका लिथियम बॅटरी उत्पादक कंपनीला आज लागलेल्या आगीत वीस जणांचा मृत्यू झाला आहे. तर २३ जण अजूनही बेपत्ता आहेत. बॅटरीची तपासणी आणि पॅकिंग केली जात असलेल्या मजल्यावर लागलेली आग गोदामात पसरल्यानंतर मोठ्या प्रमाणात स्फोट झाल्याचं इथल्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. आग लागली त्...

June 24, 2024 8:03 PM

views 72

अरविंद केजरीवाल यांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात येत्या बुधवारी सुनावणी

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात येत्या बुधवारी सुनावणी होणार आहे. कथित मद्य धोरण प्रकरणात जामीन प्रकरणी उच्च न्यायालयानं निकाल राखून ठेवला होता. तसंच विशेष न्यायालयाच्या आदेशाच्या अंमलबजावणीला स्थगिती दिली होती. त्याला केजरीवाल यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्ह...

June 24, 2024 8:00 PM

views 59

केरळ राज्याचं नाव ‘केरळम्’ करण्याच्या प्रस्तावाला संमती

केरळ राज्याचं नाव केरळम् असं करण्याचा प्रस्ताव केरळच्या विधानसभेत आज एकमताने संमत झाला. मुख्यमंत्री पिनराई विजयन यांना मांडलेला हा प्रस्ताव आता केंद्रसरकारकडे पाठवण्यात येईल. यापूर्वी गेल्या ऑगस्टमधे असा प्रस्ताव केरळ विधानसभेने संमत केला होता मात्र काही त्रुटी राहिल्यामुळे तो बारगळला होता. त्यामुळं...

June 24, 2024 7:49 PM

views 50

नीट परीक्षा घोटाळ्यात लातूरमध्ये अटकेत आरोपीला २ जुलैपर्यंत पोलीस कोठडी

    नीट परीक्षा घोटाळ्यात लातूरमध्ये अटकेत असलेल्या एका आरोपीला न्यायालयानं २ जुलैपर्यंत पोलीस कोठडी ठोठावली आहे. याप्रकरणी ४ जणांविरोधात दहशतवाद विरोधी पथकानं चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. यातल्या एकाला पोलिसांनी काल अटक केली होती. इतर दोघांची चौकशी सुरू आहे आणि दिल्लीतल्या चौथ्या आरोपीच्...

June 24, 2024 7:40 PM

views 46

नवी दिल्लीत उद्या आंतरराष्ट्रीय साखर संघटनेची बैठक

आयएसओ अर्थात आंतरराष्ट्रीय साखर संघटनेची बैठक उद्या नवी दिल्ली इथं होणार आहे. यात ३० पेक्षा जास्त देशांचे आणि अनेक आंतरराष्ट्रीय संघटनांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. या बैठकीत साखर आणि जैवइंधन आदी महत्वाच्या मुद्यांवर चर्चा होणार आहे.