June 25, 2024 7:02 PM

views 50

शेतकऱ्यांना नुकसान भरपाई या महिनाअखेरपर्यंत पूर्ण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सह्याद्री अतिथीगृहात आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यातल्या खरीप पिकांचा आढावा घेतला. शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्ती, शेती नुकसान भरपाईसाठीच्या मदतीचं वाटप ३० जूनपर्यंत पूर्ण करावं, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिले आहेत. सरकारने शेतकऱ्यांसाठी घ...

June 25, 2024 6:55 PM

views 49

शेतकऱ्यांना पीक कर्ज देताना बँकानी हात आखडता घेऊ नये – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

अल्प, अत्यल्पभूधारक शेतकऱ्यांना पीक कर्ज देताना बँकानी हात आखडता घेऊ नये, असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. ते आज मुंबईत राज्यस्तरीय बँकर्स समितीच्या १६३ व्या बैठकीत बोलत होते. शेती हे महाराष्ट्राचं बलस्थान आहे. म्हणून शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं आहे. बँकानीही शेतकऱ्यांना ...

June 25, 2024 3:58 PM

views 57

यवतमाळमध्ये दिव्यांग्यांच्या पंढरपूर वारीचं आयोजन

राज्यातली पहिलीच पूर्णत: दिव्यांगांची पंढरपूर वारी यवतमाळच्या दिव्यांग संघ आणि सेवा समर्पण प्रतिष्ठानच्यावतीनं आयोजित करण्यात आली आहे. मोठ्या संख्येने दृष्टिहीन वारकरी आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाण्यासाठी आज निघाले. संत सूरदास यांची प्रतिमा आणि पादूका घेऊन आर्णी, दिग्रस, पुसद, कळमनुरी, परभणी, पर...

June 25, 2024 3:50 PM

views 58

भाजपा नेत्या सुर्यकांता पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश

माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपा नेत्या सुर्यकांता पाटील यांनी आज मुंबईत, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. यावेळी पक्ष नेते शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील उपस्थित होते. भविष्यातल्या लढाईसाठी शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश केला असून पक्ष देईल ती जबाबदारी पार पाडू,असं पाटील याव...

June 25, 2024 3:17 PM

views 64

स्वच्छ इंधन निर्मितीच्या क्षमतेमुळे ऊसाचा भाव नव्या उंचीवर पोहोचला – मंत्री प्रल्हाद जोशी

स्वच्छ इंधन निर्मितीच्या क्षमतेमुळे ऊसाचा भाव नव्या उंचीवर पोहोचला आहे, असं केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री प्रल्हाद जोशी यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्लीत भारताच्या अध्यक्षतेखाली सुरु असलेल्या ६४ व्या आंतरराष्ट्रीय साखर संघटनेच्या बैठकीत बोलत होते.  ऊसापासून साखर तर त्याच...

June 25, 2024 3:11 PM

views 49

कोणताही प्रस्ताव स्वीकारण्यापूर्वी पॉलिसीधारकांनी महामंडळाच्या अधिकाऱ्यांचा सल्ला घ्यावा- एलआयसी

विमा पॉलिसी महामंडळाला समर्पित करण्यासाठी काही संस्थांकडून दिल्या जात असलेल्या प्रस्तावांबाबत भारतीय आयुर्विमा महामंडळानं स्पष्टीकरण दिलं आहे. अशा संस्थांकडून दिल्या जाणाऱ्या सेवा आणि उत्पादनांशी आपला कसलाही संबंध नसल्याचं महामंडळानं सांगितलं आहे. असा कोणताही प्रस्ताव स्वीकारण्यापूर्वी पॉलिसीधारकांन...

June 25, 2024 3:10 PM

views 60

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या जामीनाला स्तगिती

दिल्ली उच्च न्यायालयानं दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या जामीनाला स्थगिती दिली आहे. ईडीनं सादर केलेली कागदपत्र विशेष न्यायालयानं नीट पाहिली नाही, असं कारण उच्च न्यायालयानं जामीनाला स्थगिती देताना दिलं आहे.

June 25, 2024 3:08 PM

views 72

विधान परिषदेच्या रिक्त होणाऱ्या ११ जागांसाठी आजपासून अर्ज भरायला सुरुवात

विधान परिषदेच्या रिक्त होणाऱ्या ११ जागांसाठी आजपासून अर्ज भरायला सुरुवात झाली. या निवडणुकीसाठी २ जुलै रोजी दुपारी ४ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज सादर करता येतील ३ जुलै रोजी अर्जांची छाननी होईल. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत ५ जुलै पर्यंत आहे.   १२ जुलै रोजी सकाळी ९ ते दुपारी ४ या वेळात मतदान होई...

June 25, 2024 2:58 PM

views 80

बिगर-नाटो सहयोगी म्हणून अमेरिकेने केनियाची नियुक्ती केली

अमेरिकेने आपला एमएनएनए, म्हणजेच प्रमुख बिगर-नाटो सहयोगी म्हणून केनियाची नियुक्ती केली आहे. अमेरिकेच्या कायद्यानुसार एमएनएनए हा दर्जा, परदेशी भागीदार देशांना संरक्षण, व्यापार आणि सुरक्षा विषयक सहकार्याच्या क्षेत्रात काही लाभ मिळवून देतो.   केनियाचे राष्ट्राध्यक्ष विल्यम रुटो यांच्या गेल्या महिन्...

June 25, 2024 2:51 PM

views 38

६४व्या आंतरराष्ट्रीय साखर संघटनेच्या बैठकीचं अध्यक्षपद भारत भुषवणार

नवी दिल्लीत आजपासून सुरू होणाऱ्या ६४ व्या आंतरराष्ट्रीय साखर संघटनेच्या बैठकीचं अध्यक्षपद भारत भुषवणार आहे. या तीन दिवसीय बैठकीत साखर आणि जैव इंधन क्षेत्रातल्या महत्वपूर्ण मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. या बैठकीत ३० हून अधिक देशांचे आणि आंतरराष्ट्रीय संघटनांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. ८० हून अधिक ...