June 29, 2024 8:15 PM

views 38

प्रधानमंत्री उद्या ‘मन की बात’ कार्यक्रमातून देशवासीयांशी साधणार संवाद

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या रविवारी आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या मालिकेच्या तिसऱ्या आवृत्तीचा हा पहिला भाग असेल. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरून सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम प्रसारित होईल. समाजमाध्यमांवरही हा कार्यक्रम ऐकता येईल.

June 29, 2024 8:13 PM

views 70

अमरनाथ यात्रेला आजपासून सुरुवात

अमरनाथ यात्रेला आज सुरुवात झाली. अमरनाथ यात्रेसाठी जम्मूतल्या भगवती नगर बेस कॅम्प इथून आज पहाटे चार हजार २९ यात्रेकरूंची दुसरी तुकडी रवाना झाली. कडेकोट सुरक्षेसह यात्रेकरूंच्या २०० वाहनांचा ताफा काश्मीर खोऱ्याकडे रवाना झाला. तत्पूर्वी बेस कॅम्पचा परिसर बम बम भोले, हर हर महादेवच्या जयघोषाने दुमदुमून ...

June 29, 2024 8:10 PM

views 34

आयएनएस शिवालिक युद्धनौका आंतरराष्ट्रीय सागरी सरावांमध्ये सहभागी होणार

भारतीय नौदलाची स्वदेशी बनावटीची आयएनएस शिवालिक ही युद्धनौका २९ व्या द्विवार्षिक रिम ऑफ द पॅसिफिक या आंतरराष्ट्रीय सागरी सरावांमध्ये सहभागी होणार आहे. हा सराव हवाई  बेटांवर होणार असून १ ऑगस्टपर्यंत चालणार आहे. अमेरिकन नौदलानुसार २९ देश, ४० युद्धनौका, ३ पाणबुड्या, १५० हून अधिक विमान आणि २५ हजारांहून अ...

June 29, 2024 7:43 PM

views 42

जागतिक टेबल टेनिस स्पर्धेत दिया चितळे आणि यशस्विनी घोरपडे या जोडीचा अंतिम फेरीत प्रवेश

ट्युनिशिया इथं सुरू असलेल्या जागतिक टेबल टेनिस स्पर्धेत भारताच्या दिया चितळे आणि यशस्विनी घोरपडे या जोडीनं अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. उपांत्य फेरीत या जोडीनं दक्षिण कोरियाच्या यू सिवू आणि किम सीओंगजीन या जोडीचा ११-४, ११-२, ११-२ असा पराभव केला.

June 29, 2024 7:41 PM

views 75

भारत ठरला महिला कसोटी क्रिकेटमध्ये ६०० धावांचा टप्पा गाठणारा पहिला संघ

  भारत आणि दक्षिण आफ्रिकेच्या महिला क्रिकेट संघांमध्ये सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवसअखेर दक्षिण आफ्रिकेनं पहिल्या डावात ४ बाद २३६ धावा केल्या आहेत. दक्षिण आफ्रिका अजूनही ३६७ धावांनी पिछाडीवर आहे. त्याआधी आज सकाळच्या पहिल्या सत्रातच भारतानं आपला पहिला डाव कालच्या ४ बाद ५२५ धावा...

June 29, 2024 7:31 PM

views 47

सीबीआयनं ३२ पारपत्र अधिकारी आणि मध्यस्थ आरोपींविरोधात भ्रष्टाचाराचे १२ गुन्हे नोंदवले

सीबीआयनं ३२ पारपत्र अधिकारी आणि मध्यस्थ आरोपींविरोधात भ्रष्टाचाराचे १२ गुन्हे नोंदवले आहेत. ज्या अर्जदारांची माहिती अपुरी आहे किंवा पूर्ण दस्तऐवज नाहीत, त्यांना पारपत्र जारी करण्यासाठी भ्रष्टाचार आणि  गैरप्रकार करण्याचे आरोप त्यांच्यावर आहेत. यात  मुंबईतल्या लोअर परळ आणि मालाड इथल्या पारपत्र सेवा के...

June 29, 2024 7:24 PM

views 39

विधानपरिषदेच्या सभापतीपदाची निवडणूक लवकरात लवकर जाहीर करण्याची विरोधकांची मागणी

विधानपरिषदेच्या सभापतीपदाची निवडणूक लवकरात लवकर जाहीर करावी अशी मागणी आज विरोधकांनी विधानपरिषदेत केली. गेले अनेक दिवस विधानपरिषदेचं सभापतीपद रिक्त आहे हे संविधानाला धरून नाही असं सांगत शेकापचे जयंत पाटील यांनी आज कामकाज सुरू होताच हा मुद्दा उपस्थित केला. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी देखील जयं...

June 29, 2024 7:18 PM

views 72

सर्वधर्मीयांच्या तीर्थक्षेत्रांसाठी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना लागू करण्याचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन

सर्वधर्मीयांच्या तीर्थक्षेत्रांसाठी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना लागू करण्याचं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत दिलं. तातडीनं अंमलबजावणी करण्यासाठी, लवकरच नियमावली तयार करून इच्छुकांकडून ऑनलाईन अर्ज मागवू, असं ते म्हणाले. आमदार प्रताप सरनाईक यांनी यासंदर्भातली लक्षवेधी सूचना मांडल...

June 29, 2024 7:20 PM

views 53

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना दर महिन्याच्या ५ तारखेला आर्थिक मदतीचे पैसे खात्यात जमा करण्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ग्वाही

श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना, संजय गांधी निराधार अनुदान योजना, यासह विशेष सहाय्याच्या योजनांचे पैसे प्रत्येक महिन्याच्या ५ तारखेला लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्याचे निर्देश देण्यात येतील, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत दिली. तसंच राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरल्...

June 29, 2024 7:01 PM

views 78

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा शासन निर्णय विधीमंडळाचा हक्कभंग असल्याचा विजय वडेट्टीवार यांचा दावा

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा शासन निर्णय हा विधीमंडळाचा हक्कभंग असल्याचा दावा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत केला. याप्रकरणी हक्कभंग दाखल करणार असल्याचं ते म्हणाले. माजी अर्थमंत्री जयंत पाटील यांनीही त्याला दुजोरा दिला.  अर्थसंकल्पाच्या मंजुरीची प्रक्रिया डावलून हा शासन निर्ण...