October 10, 2024 11:28 AM

views 21

शारदीय नवरात्र महोत्सवात आज श्री तुळजाभवानी देवीची भवानी तलवार अलंकार महापूजा मांडण्यात येणार

शारदीय नवरात्र महोत्सवात आज आठव्या माळेला श्री तुळजाभवानी देवीची भवानी तलवार अलंकार महापूजा मांडण्यात येणार आहे. काल देवीची शेषशायी अलंकार महापूजा मांडण्यात आली होती.

October 10, 2024 10:58 AM

views 94

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कायमस्वरुपी सुरु राहणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना कायमस्वरुपी सुरु राहणार आहे. या योजनेसाठी 46 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तसंच सध्या दिली जात असलेली दरमहा 1 हजार 500 रुपयांची रक्कम वाढवत जाऊन टप्प्याटप्प्याने ही रक्कम तीन हजार रुपयांपर्यंत करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल...

October 10, 2024 10:52 AM

views 40

डिसेंबर २०२८ पर्यंत तांदळाचा मोफत पुरवठा सुरू ठेवण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत कृत्रिमरीत्या पोषणमूल्यांनी युक्त अर्थात फोर्टिफाईड तांदळाचा मोफत पुरवठा डिसेंबर २०२८ पर्यंत सुरू ठेवण्यास केंद्रीय मंत्रिमंडळानं काल मंजुरी दिली. रक्ताल्पता आणि सूक्ष्म पोषक घटकांच्या कमतरतेची समस्या कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं माहिती आणि प्रसारण...

October 10, 2024 10:34 AM

views 45

अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडन आणि इस्राईलचे प्रधानमंत्री बेंजामिन नेत्यान्याहू यांच्यात दूरध्वनीवरून चर्चा

अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडन यांनी इस्राईलचे प्रधानमंत्री बेंजामिन नेत्यान्याहू यांच्याशी काल रात्री दूरध्वनीवरून चर्चा केली. सुमारे अर्ध्या तासाची ही चर्चा थेट आणि महत्त्वपूर्ण होती असं व्हाईट हाऊसच्या प्रवक्त्यानं म्हटलं आहे. लेबनानमधील विशेषतः बैरुतमधील सर्वसामान्य नागरिकांना कमीत कमी हानी पोचेल ...

October 10, 2024 10:23 AM

views 57

अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्याकडून प्रधानमंत्र्यांचं कौतुक

अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं कौतुक केलं आहे. मोदी उत्तम माणूस आहेत आणि आपले मित्र आहेत असं ट्रम्प यांनी फ्लॅग्रंट पॉडकास्ट या कार्यक्रमात म्हटलं आहे. मोदी यांनी 2019 मध्ये ह्युस्टनला दिलेल्या भेटीतील हाऊडी मोदी या कार्यक्रमाला आपण उपस्थित होतो अशी आठवणही...

October 10, 2024 10:19 AM

views 30

लष्करातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या दुसऱ्या परिषदेचा पहिला टप्पा आजपासून होतोय सुरू

लष्करातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या दुसऱ्या परिषदेचा पहिला टप्पा आजपासून सिक्कीममधील गंगटोक इथं सुरू होत आहे. संरक्षणमंत्री राजनाथसिंह या परिषदेला संबोधित करणार आहेत. प्रत्यक्ष तयारीचा आढावा, विविध धोरणांबाबत चर्चा आणि भविष्यातील कार्यवाही ठरवणं यांच्यासाठी ही परिषद आयोजित केली जाते.  

October 10, 2024 10:16 AM

views 16

मलाबार २०२४ या नौदलाच्या सरावाचा उद्घाटन समारंभ संपन्न

मलाबार २०२४ या नौदलाच्या सरावाचा उद्घाटन समारंभ काल विशाखापट्टणम इथल्या सातपुरा या जहाजावर पार पडला. नौदलाच्या पूर्व विभागानं हा समारंभ आयोजित केला होता. अनेक देशांचा सहभाग असलेल्या या सरावाची सांगता 18 ऑक्टोबरला होणार आहे. ऑस्ट्रेलिया, जपान आणि अमेरिकेच्या नौदलांनी उद्घाटन समारंभात भारताच्या नौदलाल...

October 10, 2024 9:56 AM

views 36

राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स विभागानं उमंग ऍप आणि डिजिलॉकर सुविधा यांच्या एकत्रीकरणाची केली घोषणा

उमंग ऍप आणि डिजिलॉकर सुविधा यांच्या एकत्रीकरणाची घोषणा राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स विभागानं केली आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांना एकाच प्रणालीमधून विविध सरकारी सेवा सहजपणे मिळू शकणार आहेत. उमंग ऍप सर्व अँड्रॉइड मोबाईल दूरध्वनीधारकांसाठी उपलब्ध आहे आणि त्याच्या सेवांचा वापर डिजिलॉकर ऍपच्या माध्यमातून कर...

October 10, 2024 9:52 AM

views 59

अडतिसाव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा उत्तराखंडमध्ये पुढच्या वर्षी 28 जानेवारी ते 14 फेब्रुवारी या काळात होणार

अडतिसाव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा उत्तराखंडमध्ये पुढच्या वर्षी 28 जानेवारी ते 14 फेब्रुवारी या काळात आयोजित करण्यात आल्या आहेत. भारतीय ऑलिंपिक संघटनेची बैठक येत्या पंचवीस तारखेला होणार आहे. त्यात या स्पर्धेचं संपूर्ण वेळापत्रक जाहीर केलं जाणार आहे. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी नुक...

October 10, 2024 9:00 AM

views 55

पुरुषांच्या टी-ट्वेंटी क्रिकेटमध्ये बांग्लादेशविरुद्धचा सामना भारतानं 86 धावांनी जिंकला

पुरुषांच्या टी-ट्वेंटी क्रिकेटमध्ये बांग्लादेशविरुद्ध दिल्ली इथं दुसरा सामना भारतानं 86 धावांनी जिंकून तीन सामन्यांच्या मालिकेत विजयी आघाडी घेतली. भारतानं दिलेलं 222 धावांचं उद्दिष्ट गाठताना पाहुणा संघ वीस षटकांत 9 बाद 135 धावा करु शकला. उभय संघांचा तिसरा सामना शनिवारी हैदराबाद इथं होणार आहे.