October 10, 2024 4:32 PM

views 31

६८व्या धम्मप्रवर्तन दिन कार्यक्रमाला आजपासून प्रारंभ

नागपूर इथं पवित्र दीक्षाभूमीवर दरवर्षीप्रमाणे यंदाही डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्यावतीने ६८व्या धम्मप्रवर्तन दिन कार्यक्रमाला आजपासून प्रारंभ होत आहे. स्मारक समितीचे अध्यक्ष भदन्त आर्य नागार्जुन सुरई ससाई यांच्या उपस्थितीत भिक्खू संघ, उपासक तसंच श्रामणेर यांना दीक्षा देण्या आली. उद्या ११ ऑक्...

October 10, 2024 4:21 PM

views 29

देशाचे सांस्कृतिक दूत बना – केंदीय सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्री गजेंद्र सिंग शेखावत

भारतीय संस्कृती वाचवण्यासाठी आता युवकांनी देशाचे संस्कृतिदूत बनण्याची गरज असल्याचं केंद्रीय संस्कृती आणि पर्यटन मंत्री गजेंद्रसिंग शेखावत यांनी म्हटलं आहे. ते आज नवी मुंबईत डी वाय पाटील विद्यापीठात आयोजित ‘विकसित भारतासाठी युवा शक्ती’ या कार्यक्रमात बोलत होते. युवा पिढी केवळ देशातल्या बदलाची साक्षीद...

October 10, 2024 3:26 PM

views 38

पश्चिम बंगालमधल्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेच्या संदर्भात राज्य सरकार गंभीर नाही, ज्यूनियर डॉक्टरांच्या संघटनेचा आरोप

पश्चिम बंगालमधल्या कोलकता डॉक्टर हत्या प्रकरणाचा तपास आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेच्या संदर्भात राज्य सरकार गंभीर नाही, कोणतंही लेखी आश्वासन द्यायला सरकार तयार नाही, असा आरोप ज्यूनियर डॉक्टरांच्या संघटनेने केला आहे. राज्य सरकार आणि ज्यूनियर डॉक्टर यांच्यात काल बैठक झाली, मात्र यात कोणताही तो...

October 10, 2024 2:43 PM

views 30

देशातल्या उद्योगांनी आकारमान आणि क्षमता वाढवावी केंद्रीय गृहमंत्र्यांचं आवाहन

देशातल्या उद्योगांनी आकारमान आणि क्षमता वाढवावी असं आवाहन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलं. नवी दिल्लीत PHD Chamber of Commerce and Industry च्या वार्षिक संमेलनाला ते संबोधित करत होते. येत्या २५ वर्षात सर्वच क्षेत्रात भारताला आघाडीवर नेण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं स्वप्न असल्याचं त्य...

October 10, 2024 3:05 PM

views 30

आर्क्टिक खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या किरण जॉर्जचा पुरुष एकेरीच्या उपउपांत्य पूर्व फेरीत प्रवेश

फिनलँड इथं सुरू असलेल्या आर्क्टिक खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत काल भारताच्या किरण जॉर्ज याने पुरुष एकेरीच्या उपउपांत्य पूर्व फेरीत प्रवेश केला. त्याने जागतिक क्रमवारीत २५व्या स्थानावर असलेल्या तैवानच्या वांग त्झू वेई याचा २३-२१, २१-१८ अशा सरळ गेममध्ये पराभव केला. आज किरण याचा सामना इंडोनेशियाच्या जोनाथन...

October 10, 2024 2:33 PM

views 28

भारतीय सिनेमाला जागतिक स्तरावर घेऊन जाण्याचं सरकारचं उद्दिष्ट – अश्विनी वैष्णव

भाषिक आणि सांस्कृतिक वैविध्यतेने परीपूर्ण असलेल्या भारतीय सिनेमाने देशाला एकत्र करण्यात महत्वाची भूमिका बजावली आहे, असं प्रतिपादन माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी एका लेखात केलं आहे. एक भारत, श्रेष्ठ भारत हा दृष्टीकोन अधिक बळकट करण्यात सिनेमा हे एक शक्तीशाली साधन आहे, असं वैष्णव म्हणाल...

October 10, 2024 5:45 PM

views 63

इफ्फी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २०२४ साठी चार मराठी चित्रपटांची निवड

इफ्फी अर्थात आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २०२४ च्या फिल्म बाजार विभागासाठी चार मराठी चित्रपटांची निवड करण्यात आल्याची घोषणा काल महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली. या चित्रपटांमध्ये आत्मपॅम्प्लेट, तेरवं, विषय हार्ड आणि छबिला यांचा समावेश आहे. या चित्रपटांची निवड करण्याकरता ...

October 10, 2024 2:20 PM

views 55

देशविदेशातल्या मान्यवरांकडून रतन टाटा यांना आदरांजली अर्पण

मुंबईत NCPA मध्ये विविध क्षेत्रातले मान्यवर, उद्योगपती, टाटा समूहाच्या विविध कंपन्यांचे कर्मचारी, राजकीय नेते, सामाजिक क्षेत्रातल्या व्यक्ती यांच्यासह मोठ्या प्रमाणात सामान्य नागरिक रतन टाटांच्या अंत्यदर्शनासाठी आले आहेत. टाटा यांचं पार्थिव शरीर अंत्यदर्शनासाठी संध्याकाळी साडेचार वाजेपर्यंत एनसीपीए ...

October 10, 2024 4:06 PM

views 36

शिंपी, गवळी, लाडशाखीय वाणी, लोहार, नाथपंथीय समाजासाठी महामंडळं स्थापन करण्याचा राज्य सरकारचा निर्णय

राज्य सरकारनं आज शिंपी, गवळी, लाडशाखीय वाणी-वाणी, लोहार, नाथपंथीय समाज, पत्रकार आणि वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी महामंडळं स्थापन करण्याचा निर्णय घेतला. मौलाना आझाद महामंडळाच्या भागभांडवलात वाढ करण्यासह मदरश्यांमधल्या शिक्षकांच्या मानधनात वाढ करायलाही राज्य मंत्रीमंडळानं आज मंजुरी दिली. मुख्यमंत्री एकना...

October 10, 2024 12:59 PM

views 39

एकात्मिक बाल विकास सेवा योजनेत हिंगोली जिल्हा राज्यात अव्वल

एकात्मिक बाल विकास सेवा योजनेत हिंगोली जिल्हा राज्यात अव्वल ठरला आहे. राज्य पातळीवर प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल हिंगोलीचे जिल्हाधिकारी अभिनव गोयल, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले तसंच महिला आणि बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी गणेश वाघ यांचा उद्या ११ ऑक्टोबरला मुंबई...