October 11, 2024 3:05 PM

views 58

प्रत्येक समस्येचं निराकरण हे युद्धातून शक्य नाही-प्रधानमंत्री

हे युग युद्धाचं युग नसून प्रत्येक समस्येचं निराकरण हे युद्धातून शक्य नाही. युरेशिया आणि पश्चिम आशिया प्रदेशात शांतता प्रस्थापित व्हावी, अशी प्रत्येकाची इच्छा असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं. लाओसच्या व्हिएन्तिआन इथं झालेल्या एकोणिसाव्या पूर्व आशिया शिखर परिषदेत आज ते बोलत होत...

October 11, 2024 1:26 PM

views 14

मगील ५ वर्षात ग्रामीण कुटुंबांच्या मासिक उत्पन्नात 57 टक्क्यांनी वाढ

  वर्ष २०१६-१७ ते २०२१-२२ या आर्थिक वर्षात ग्रामीण कुटुंबांचं सरासरी मासिक उत्पन्न ५७ टक्क्यांनी वाढल्याचं नाबार्डच्या सर्वेक्षणात नमूद करण्यात आलं आहे. २०१६-१७ मध्ये ग्रामीण कुटुंबांचं सरासरी मासिक उत्पन्न ८ हजार ५९ रुपये होतं; ते २०२१-२२ मध्ये १२ हजार ६९८ रुपयांपर्यंत वाढलं आहे. ग्रामीण भागातल्या ...

October 11, 2024 7:05 PM

views 12

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या दक्षिण धावपट्टीची चाचणी यशस्वी

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या दक्षिण धावपट्टीची आज यशस्वी चाचणी झाली. या धावपट्टीवर भारतीय हवाई दलाचं सी २९५ विमान यशस्वीरित्या उतरलं. त्यावेळी सिडको अग्निशमन दलाकडून विमानावर पाण्याचा फवारा उडवत सलामी देण्यात आली. त्यानंतर सुखोई ३० या फायटर विमानानंही धावपट्टीला समांतर उड्डाण केलं.    व...

October 11, 2024 1:22 PM

views 24

व्हॅलेन्शिया खुल्या टेनिस स्पर्धेत भारताचा पोलंडशी सामना

स्पेनमध्ये सुरू असलेल्या व्हॅलेन्शिया खुल्या टेनिस स्पर्धेच्या पुरुष दुहेरीच्या उपांत्य फेरीत आज भारताच्या जीवन नेडुचांझियान आणि विजय सुंदर प्रशांत या जोडीचा सामना पोलंडच्या जोडीशी होणार आहे. उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात काल या जोडीनं प्रतिस्पर्धी जोडीवर ६-०, ६-२ अशी सहज मात केली होती.

October 11, 2024 10:55 AM

views 37

महिला क्रिकेट स्पर्धेत वेस्ट इंडिजने बांगलादेशचा 8 खेळाडू राखून केला पराभव

महिलांच्या ICC T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत काल रात्री शारजा इथं झालेल्या सामन्यात वेस्ट इंडिजने बांगलादेशचा 8 खेळाडू राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करत बांगलादेशने 20 षटकांत 8 खेळाडू बाद 103 धावा केल्या.   बांगलादेशकडून कर्णधार निगार सुलतानाने 44 चेंडूत 39 धावा केल्या. वेस्ट इंडिजच्या करिश्म...

October 11, 2024 10:11 AM

views 9

सागरी सुरक्षा राखण्यासाठी शांती आणि स्थिरतेला प्रोत्साहन देण्यावर भारत आणि आसियान राष्ट्रांची भर

आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार, विवादांचं शांततापूर्ण निराकरण करण्यासाठी आणि सागरी सुरक्षा राखण्यासाठी शांती आणि स्थिरतेला प्रोत्साहन देण्यावर भारत आणि आसियान राष्ट्रांनी भर दिला आहे. भारत आणि असियान देशांच्या संयुक्त निवेदनात याबाबत सहमति दर्शवण्यात आली आहे.   सागरी सुरक्षा, दहशतवादाला विरोध, सायब...

October 11, 2024 10:03 AM

views 9

देशाच्या विविध भागात येत्या 2 दिवसात मुसळधार पावसाचा इशारा

येत्या 2 दिवसांत तामिळनाडू, पुडुचेरी, कराईकल, अरुणाचल प्रदेश आणि गुजरातमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. पुढील 2 दिवसांत गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि बिहारच्या काही भागांतून नैऋत्य मौसमी पाऊस माघारी जाण्यासाठी अनुकूल परिस्थिती आहे.

October 11, 2024 10:00 AM

views 73

ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

ज्येष्ठ उद्योगपती, टाटा सन्सचे मानद अध्यक्ष आणि टाटा ट्रस्टचे अध्यक्ष रतन टाटा यांना काल भावपूर्ण वातावरणात अखेरचा निरोप देण्यात आला. मुंबईत वरळी स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिव देहावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय मंत्री पियूष ...

October 11, 2024 9:41 AM

views 31

नॉन क्रिमिलेयर मर्यादा ८ लाखांवरुन १५ लाख करण्याची शिफारस केंद्र सरकारला करायचा राज्य सरकारचा निर्णय

नॉन क्रिमिलेयरची मर्यादा 8 लाखांवरुन 15 लाख करण्याची शिफारस केंद्र सरकारला करायचा निर्णय काल महाराष्ट्र राज्य मंत्री मंडळानं घेतला. तसंच शिंपी, गवळी, लाडशाखीय वाणी, लोहार, नाथपंथीय समाज, आणि पत्रकार तसंच वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी महामंडळं स्थापन करण्याचा निर्णयही मंत्रीमंडळाच्या बैठकीत काल घेण्यात आ...

October 10, 2024 8:15 PM

views 19

आर्क्टिक खुल्या ३०० बॅडमिंटन स्पर्धेत लक्ष्य सेनचा चिनी तैपेई चा खेळाडू चौ तीन चेन कडून २१-१९, १८-२१, १५-२१ असा पराभव

आर्क्टिक खुल्या ३०० बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या लक्ष्य सेनचा चिनी तैपेई चा खेळाडू चौ तीन चेन ने २१-१९, १८-२१, १५-२१ असा पराभव केला आहे. जागतिक क्रमवारीत १९व्या स्थानावर असलेल्या लक्ष्य च्या पराभवामुळे या स्पर्धेतील भारताचं आव्हान संपुष्टात आलं आहे.   महिला एकेरी सामन्यात भारताच्या उन्नती हुडा ल...