October 11, 2024 3:22 PM

views 40

उद्योगपती रतन टाटा यांचे सावत्र बंधू नोएल टाटा यांची टाटा ट्रस्टच्या अध्यक्षपदी निवड

उद्योगपती रतन टाटा यांचे सावत्र बंधू नोएल टाटा यांची टाटा ट्रस्टच्या अध्यक्षपदी एकमतानं निवड झाली आहे. टाटा ट्रस्ट ही टाटा समूहाची सामाजिक क्षेत्रात कार्य करणारी शाखा आहे. ट्रस्टच्या संचालक मंडळाच्या बैठकीत आज हा निर्णय घेण्यात आला. नोएल टाटा सध्या टाटा स्टील आणि व्होल्टाससह इतरही कंपन्यांच्या संचाल...

October 11, 2024 2:24 PM

views 11

पुढल्या दोन दिवसांत राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता

पुढल्या दोन दिवसांत तामिळनाडू, पुडुचेरी, कराईकल, अरुणाचल प्रदेश आणि गुजरात राज्यांत मुसळधार पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागानं वर्तवली आहे. बंगालच्या उपसागराच्या दक्षिण भागात चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यताही हवामान विभागानं वर्तवली आहे.   यामुळे पुढील दोन दिवस देशाच्या पूर्वोत्तर,पश्चिम आ...

October 11, 2024 2:00 PM

views 38

महिला क्रिकेट स्पर्धेत आज ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान संघादरम्यान सामना खेळला जाणार

आयसीसी महिला टी २० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज दुबईत संध्याकाळी साडेसात वाजता ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान संघादरम्यान सामना खेळला जाणार आहे.   काल शारजा इथं झालेल्या सामन्यात वेस्ट इंडिजनं बांगलादेशाचा आठ गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करत बांगलादेशनं २० षटकांत ८ खेळाडूंच्या बदल्यात १०३ धाव...

October 11, 2024 1:57 PM

views 23

गाझा पट्टीतील एका शाळेवर झालेल्या हल्ल्यात किमान 28 जणांचा मृत्यू

  इस्रायलने गाझा पट्टी आणि लेबनॉनमध्ये केलेल्या हवाई हल्ल्यामध्ये अनेक जणांचा मृत्यू झाला आहे. यात गाझा पट्टीतल्या विस्थापितांनी आश्रय घेतलेल्या शाळेचा समावेश असून या हल्ल्यात २८ ठार तर ५४ जण जखमी आहेत. बैरुतमध्ये झालेल्या हल्ल्यात २२ जणांचा मृत्यू झाला तर ११७ जण खमी झाले. तसंच, या हवाई हल्ल्या...

October 11, 2024 1:53 PM

views 25

श्रीलंकेत येत्या १४ नोव्हेंबर रोजी सार्वत्रिक निवडणुका

श्रीलंकेत येत्या १४ नोव्हेंबर रोजी सार्वत्रिक निवडणुका होत असून त्यासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत आज दुपारपर्यंत संपेल. श्रीलंकेच्या निवडणूक आयोगानं दिलेल्या माहितीनुसार एकूण ३३ स्वतंत्र गट आणि राजकीय पक्षांनी या निवडणुकीसाठी अर्ज दाखल केले आहेत. १४ नोव्हेंबर रोजी श्रीलंकेचे मतदार जिल्हा पातळीवर ...

October 11, 2024 1:48 PM

views 32

दिल्लीत दोन हजार कोटी रुपये किमतीचं कोकेन जप्त

दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने दोन हजार कोटी रुपये किमतीचं २०० किलो कोकेन जप्त केलं आहे. पश्चिम दिल्लीतल्या रमेश नगर परिसरातून हे कोकेन जप्त करण्यात आल्याची माहिती दिल्ली पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. दिल्ली पोलिसांनी गेल्या आठवड्यात ५०० किलो कोकेन जप्त केलं होतं. पोलिसांनी या सर्व प्रकर...

October 11, 2024 1:42 PM

views 27

नागपूरातील दीक्षाभूमीवर पंचशिल ध्वजारोहण करण्यात आलं

नागपूरातील पवित्र दीक्षाभूमीवर आज दीक्षाभूमी स्मारक समितीचे सदस्य आणि समता सैनिक दल यांच्या उपस्थितीत भदंत आर्य नागार्जुन सुरई ससाई यांच्या नेतृत्वाखाली पंचशिल ध्वजारोहण करण्यात आलं. यावेळी समता सैनिक दलाचे जवान, बौद्ध अनुयायी उपस्थित होते.    उद्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा मुख्य सोहळा सायंकाळी...

October 11, 2024 1:38 PM

views 12

स्वातंत्र्यसैनिक जयप्रकाश नारायण यांची जयंती देशाच्या विविध भागात साजरी

स्वातंत्र्यसैनिक, लोकनायक जयप्रकाश नारायण यांची जयंती आज देशाच्या विविध भागात साजरी होत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाजमाध्यमावरल्या पोस्टद्वारे जयप्रकाश यांना अभिवादन केलं.   जयप्रकाश नारायण यांनी समाज आणि देशासाठी दिलेल्या योगदानाची आठवण प्रधानमंत्र्यांनी केली. जयप्रकाश यांचे विचार ...

October 11, 2024 2:21 PM

views 51

दुर्गापूजेनिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी जनतेला शुभेच्छा दिल्या

आज दुर्गा अष्टमी आहे. देशाच्या विविध भागांमध्ये, विशेषत: पूर्व भागात दुर्गापूजेचा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. आजच्या दिवशी दुर्गा देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते.   राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज दुर्गापूजेच्या निमित्ताने देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. दुर्गादेवी शक्तीचं प...

October 11, 2024 1:32 PM

views 9

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह गंगटोक इथं दोन दिवसांच्या दौऱ्यावर

आर्मी कमांटर कॉन्फरन्समध्ये सहभागी होण्यासाठी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह सिक्कीमची राजधानी गंगटोक इथं दोन दिवसांच्या दौऱ्यावर जात आहेत. या परिषदेत धोरणात्मक बाबी आणि संरक्षण सिद्धतेवर चर्चा केली जाणार आहे.   या दौऱ्यात संरक्षण मंत्री रस्ते प्रकल्प, प्रेरणा स्थळाचं उद्घाटन करतील. तसंच ऑक्टोबर २०...