October 11, 2024 8:38 PM

views 49

प्राप्तीकर विभागाकडे आतापर्यंत १३ लाख ५७ हजार कोटी रुपये महसूल जमा

चालू आर्थिक वर्षात प्राप्तीकर विभागाने आतापर्यंत १३ लाख ५७ हजार कोटी रुपये महसूल मिळवला आहे. यात ७ लाख कोटी रुपये वैयक्तिक प्राप्तिकर आणि ६ लाख कोटी रुपये कॉर्पोरेट प्राप्तीकराचा समावेश आहे. कालपर्यंत प्राप्तीकरखात्यानं सुमारे दोन लाख ३१ हजार कोटी रुपयांचा परतावा दिला आहे. निव्वळ करमहसुलात १८ टक्के ...

October 11, 2024 7:20 PM

views 26

राज्यात विविध ठिकाणच्या रस्त्यांच्या विकासकामांचं भूमीपूजन

सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे राज्यात विविध ठिकाणच्या रस्त्यांच्या विकासकामांचं भूमीपूजन आज झालं. या कार्यक्रमाला मंत्री रविंद्र चव्हाण दूरस्थ माध्यमातून उपस्थित होते.  यावेळी २४ जिल्हे आणि ४४ विधानसभा मतदारसंघात १२ हजार ७६८ कोटी रुपये किंमतीच्या १ हजार ४८० किलो मीटर लांबीच्या दु-पदरी सिमेंट काँक्रि...

October 11, 2024 8:39 PM

views 56

जागतिक शांततेसाठीचा नोबेल पुरस्कार जपानमधल्या ‘निहोन हिदानक्यो’ संस्थेला जाहीर

जागतिक शांततेसाठीचा नोबेल पुरस्कार यंदा जपानमधल्या निहोन हिदानक्यो या संस्थेला जाहीर झाला. हिरोशिमा आणि नागासाकीवर झालेल्या अणुबॉम्ब पीडितांसाठी ही संस्था काम करते. जग अण्वस्त्रमुक्त करण्यासाठी आणि प्रत्यक्षदर्शींच्या कहाण्यांमधून अण्वस्त्रांचा वापर पुन्हा कधीही होऊ नये, यादृष्टीनं या संस्थेनं केलेल...

October 11, 2024 7:10 PM

views 40

सिडकोच्या आणि नवी मुंबई पालिकेच्या विविध नागरी सुविधा, प्रकल्पांचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

 सिडकोच्या आणि नवी मुंबई महानगरपालिकेच्या  विविध नागरी सुविधा, प्रकल्पांचं लोकार्पण अणि महाराष्ट्र भवनाचं भूमिपूजन ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज वाशी इथल्या सिडको प्रदर्शन केंद्रात झालं. राज्यभरात असलेल्या सिडकोच्या मालकीच्या जमीनी मोकळ्या करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची अंमलबज...

October 11, 2024 4:22 PM

views 20

महादेव बेटींग एपचा सूत्रधार सौरभ चंद्राकरला दुबईमधे अटक

  बेटींग घोटाळा आणि फसवणूक प्रकरणी महादेव बेटींग एपचा सूत्रधार सौरभ चंद्राकर याला दुबईमधे अटक झाली आहे. सक्तवसुली संचालनालयाने गेल्यावर्षी त्याच्यासाठी रेड कॉर्नर नोटीस जारी केली होती. त्याच्या हस्तांतरणाची प्रक्रीया सुरु झाली असून येत्या आठवडाभरात त्याला भारतात आणण्यात येईल असं सूत्रांनी सांगितलं. ...

October 11, 2024 3:32 PM

views 32

पुण्यातल्या खेड तालुक्यातल्या टेकवडी गावानं पटकावला राज्यातलं दुसरं सौरग्राम होण्याचा मान

राज्यातले दुसरे सौरग्राम होण्याचा मान पुणे जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातल्या टेकवडी गावानं पटकावला आहे. १ हजार २३९ लोकसंख्येच्या या गावातील सर्वच घरगुतीसह ७४ वीज जोडण्यांना सौर ऊर्जा प्रकल्पांतून वीजपुरवठा सुरु झाला आहे. महावितरणकडून राज्यातील १०० गावे १०० टक्के सौर ऊर्जेवर नेण्याची मोहीम सुरू असून त्...

October 11, 2024 7:36 PM

views 30

रत्नागिरीतल्या १९,५५० कोटी रुपयांच्या सेमीकंडक्टर प्रकल्पाचं भूमिपूजन

रत्नागिरी तालुक्यातल्या झाडगाव एमआयडीसी क्षेत्रात १९ हजार ५५० कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असलेल्या वेल्लोर सेमीकंडक्टर प्रकल्पाचं भूमिपूजन आज पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते झालं. कंपनीतर्फे रत्नागिरीतल्या दीड हजार युवकांना परदेशात प्रशिक्षण देऊन इथल्या प्रकल्पात नोकरी मिळणार आहे.    मुलांन...

October 11, 2024 3:09 PM

views 23

लाओस इथला दौरा आटोपून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी मायदेशी रवाना

लाओस इथला दोन दिवसीय दौरा आटोपून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी भारतात परत येण्यासाठी रवाना झाले आहेत. या दौऱ्यात त्यांनी एकोणिसाव्या पूर्व आशिया शिखर परिषदेला संबोधित केलं. हिंद-प्रशांत प्रदेशाच्या शांतता तसंच प्रगतीसाठी एक सर्वसमावेश, मुक्त, समृद्ध आणि शिस्तबद्ध वातावरण आवश्यक असल्याचं प्रतिपादन प्रधान...

October 11, 2024 3:04 PM

views 29

नवी मुंबई विमानतळावर ४ टर्मिनलची उभारणी होणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नवी मुंबई विमानतळावर ४ टर्मिनलची उभारणी होणार असून या विमानतळावरून वर्षाला ९ कोटी लोक प्रवास करतील, तसंच २६ लाख टन कार्गो वाहतूक होईल, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या हवाई पट्टीवर भारतीय हवाई दलाच्या C-295 विमानाचं यशस्वी चाचणी लँडिंग झाल्यानंतर प्र...

October 11, 2024 2:36 PM

views 13

जगभरात आज आंतरराष्ट्रीय बालिका दिन साजरा

जगभरात आज आंतरराष्ट्रीय बालिका दिन साजरा करण्यात येत आहे. लैंगिक समानता, लैंगिक शिक्षण आणि मुलींसाठी समान संधी यांचं महत्त्व अधोरेखित करणं हा या दिवसाचा उद्देश आहे. या वर्षी या दिवसाची मध्यवर्ती संकल्पना भविष्यासाठी बालिकांचा दृष्टिकोन हा आहे.