October 11, 2024 8:25 PM

views 29

लेबननमधल्या परिस्थितीवर भारताची चिंता

लेबननमधल्या परिस्थितीवर भारताने चिंता व्यक्त केली आहे. लेबनन आणि इस्रायलमधल्या बिघडत चाललेल्या परिस्थितीवर भारत लक्ष ठेवून असल्याचं परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. या परिसरात असलेल्या संयुक्त राष्ट्रांच्या शांतता प्रतिनिधीचं संरक्षण करण्यासाठी विशेष उपाययोजना करण्याची गरज अस...

October 11, 2024 8:26 PM

views 23

‘स्वावलंबन’ परिषद येत्या २८-२९ ऑक्टोबरला भारत मंडपममध्ये भरणार

भारतीय नौदलाची नवकल्पनांवर तसंच स्वदेशीकरणावर आधारित असलेली तिसरी ‘स्वावलंबन’ परिषद येत्या २८-२९ ऑक्टोबरला दिल्ली इथल्या भारत मंडपम मध्ये भरणार आहे. त्याबरोबरच नौदलाशी संबंधित  अत्याधुनिक संरक्षण सामग्रीचं प्रदर्शन भरेल. या परिषदेला संरक्षण तज्ञ,  नवप्रवर्तक, लघु उद्योजक, वित्तीय संस्थांचे प्रतिनिधी...

October 11, 2024 8:10 PM

views 21

लाओस दौऱ्यानंतर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी मायदेशी परतले

दोन दिवसांच्या लाओस दौऱ्यानंतर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज संध्याकाळी मायदेशी परतले. लाओसची राजधानी व्हिएन्तिआन इथं झालेल्या १९ वी पूर्व आशिया शिखर परिषद आणि २१ व्या आसियान शिखर परिषेदत प्रधानमंत्री मोदी सहभागी झाले होते. हिंद-प्रशांत प्रदेशाच्या शांतता तसंच प्रगतीसाठी एक सर्वसमावेशक, मुक्त, समृद्ध...

October 11, 2024 7:50 PM

views 39

म्हाडाच्या कोकण मंडळातर्फे १२,६२६ सदनिकांच्या विक्रीचा शुभारंभ

म्हाडाच्या कोकण गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास मंडळानं आज  ठाणे शहर आणि जिल्हा, कल्याण, टिटवाळा, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, आणि मालवण मधल्या १२ हजार ६२६ सदनिकांच्या विक्रीचा शुभारंभ केला. यापैकी  १० हजार ४२८ घरं  अत्यल्प उत्पन्न गटासाठी,  १ हजार ९८१ घरं  अल्प उत्पन्न गटासाठी,  ८५  घरं मध्यम उ...

October 11, 2024 7:46 PM

views 25

महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या उपाध्यक्षपदी अमोल जाधव यांची नियुक्ती

महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या उपाध्यक्ष पदी अमोल जाधव यांची शासनाने नियुक्ती केली असून त्यांनी आज पदभार स्वीकारला. मनोरंजन क्षेत्रात होणारे बदल समजून घेत महामंडळाने वेगवेगळे उपक्रम राबवण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहिले पाहिजे, असं नवनिर्वाचित उपाध्यक्ष अमोल जाधव या...

October 11, 2024 7:44 PM

views 33

राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचा यवतमाळ इथं जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संवाद

राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी यवतमाळ इथं जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संवाद साधला. कृषी, उद्योग, व्यापार, आरोग्य, पायाभूत सुविधा, राजकारण या क्षेत्रातील मान्यवरांशीही राज्यपालांनी चर्चा करत त्या क्षेत्रातील समस्याही जाणून घेतल्या. यावेळी विभागीय आयुक्त डॉ.निधी पाण्डेय, जिल्हाधिकारी डॉ....

October 11, 2024 7:35 PM

views 43

अभिनेते सयाजी शिंदे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

अभिनेते सयाजी शिंदे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश केला. अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि इतर यावेळी उपस्थित होते.

October 11, 2024 7:31 PM

views 55

निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राज्य सरकार घाईत निर्णय घेत असल्याची आदित्य ठाकरे यांची टीका

निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राज्य सरकार घाईघाईत निर्णय घेत असल्याची टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी केली आहे. ते मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ अद्याप पूर्ण तयार झालेलं नसताना त्यावर विमान उतरवण्याचा स्टंट मुख्यमंत्र्यांनी केला, अश...

October 11, 2024 7:28 PM

views 49

विधानसभा निवडणुकांसाठी महायुतीत रिपब्लिकन पक्षाची ८ ते १० जागांची मागणी

आगामी विधानसभा निवडणुकांसाठी महायुतीमध्ये जागा वाटपाच्या चर्चा अजून सुरू असून रिपब्लिकन पक्षाला ८ ते १० जागांची मागणी करणार आहोत, अशी माहिती केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज नागपूर इथे वार्ताहर परिषदेत दिली. या सर्व जागा रिपब्लिकन पक्षाच्या चिन्हावरच लढू असंही त्यांनी स्पष्ट ...

October 11, 2024 8:37 PM

views 47

कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात प्रशिक्षणासाठी राज्य सरकार आणि N I E L I T यांच्यात सामंजस्य करार

राज्य सरकार आणि N I E L I T अर्थात राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान विभाग यांच्यात आज नवी दिल्ली इथं सामंजस्य करार झाला. या करारामध्ये कृत्रिम बुद्धीमत्ता क्षेत्रासाठी सेंटर ऑफ एक्सलन्सची स्थापना, रोबोटिक्स, इंडस्ट्री 4.0, राज्यातल्या शासकीय तंत्रनिकेतन आणि अभियांत्रिकी महाविद्यालयातल्...