October 12, 2024 8:55 PM

views 61

प्रधानमंत्री आंतरवासिता योजनेच्या पोर्टलवर ९१ हजार आंतरवासिता संधी उपलब्ध

प्रधानमंत्री आंतरवासिता योजनेच्या पोर्टलवर आतापर्यंत १९३ कंपन्यांनी ९१ हजार इंटर्नशिप म्हणजेच आंतरवासिता संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. हे पोर्टल आजपासून अर्जदारांसाठी खुलं झालं असून अर्जदार २५ ऑक्टोबरपर्यंत आपले अर्ज सादर करू शकतात.   कंपन्या त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या आंतरवासिता संधीबाबत या ...

October 12, 2024 4:35 PM

views 31

क्रिकेटपटू मोहम्मद सिराज यानं पोलीस उप अधीक्षकाचा पदभार स्वीकारला

क्रिकेटपटू मोहम्मद सिराज याने तेलंगणा इथं पोलीस उप अधीक्षकाचा पदभार स्वीकारला. सिराज आणि मुष्टियोद्धा निखत जरीन यांनी आपापल्या खेळात सर्वोत्तम कामगिरी केल्यानंतर त्यांना सरकारी नोकरी दिली जाईल अशी घोषणा तेलंगणा सरकारने दिली होती. त्यानुसार आज सिराज याने उप अधीक्षक पदाचा पदभार स्वीकारला. या नोकरीसह स...

October 12, 2024 7:05 PM

views 55

मतदानाचं शस्त्र योग्य पद्धतीनं वापरून क्रांती करण्याचं राज ठाकरे यांचं मतदारांना आवाहन

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दसऱ्यानिमित्त मतदारांशी पॉडकास्टच्या माध्यमातून संवाद साधला. आगामी विधानसभा निवडणुकीत राज्यातल्या मतदारांनी बेसावध राहू नये, मतदानाचं शस्त्र योग्य पद्धतीनं वापरून क्रांती करावी, असं आवाहन त्यांनी केलं. आपल्या स्वप्नातला महाराष्ट्र साकारण्याची संधी ...

October 12, 2024 2:04 PM

views 40

हरियाणातल्या नव्या सरकारचा शपथविधी १७ ऑक्टोबरला

हरियाणातल्या नव्या सरकारचा शपथविधी गुरुवारी १७ ऑक्टोबरला होणार आहे. मुख्यमंत्री नायब सिंग सैनी यांच्यासह काही मंत्री पंचकुलामध्ये पद आणि गोपनीयतेची शपथ घेतील. यावेळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह इतर राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहण्याची शक्यता आहे.   नॅशनल कॉन्फरन्सच्या नेतृत्त्वाखालच्...

October 12, 2024 7:11 PM

views 51

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दीला प्रारंभ

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दीला आज प्रारंभ झाला. नागपूर इथं रेशीमबाग मैदानावर आयोजित विजयादशमीच्या मुख्य कार्यक्रमात सरसंघचालक मोहन भागवत यांनी महिलांवरच्या अत्याचारांबद्दल चिंता  व्यक्त केली.  भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रोचे माजी अध्यक्ष के. राधाकृष्णन प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. ‘...

October 12, 2024 12:12 PM

views 61

दोन दिवसांच्या लाओ दौऱ्यानंतर प्रधानमंत्री मायदेशी परतले

हिंद-प्रशांत महासागर क्षेत्राचा विकास आणि शांतता यासाठी इथल्या सर्व देशांनी मुक्त, सर्वसमावेशक, विकासानुकूल असणं आणि नियमांचं पालन करणं गरजेचं आहे असं ठाम प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 19 व्या पूर्व आशियाई देशांच्या शिखर परिषदेत केलं. संपूर्ण हिंद प्रशांत क्षेत्रासाठी दक्षिण चीन समुद्रात...

October 12, 2024 9:48 AM

views 62

महाराष्ट्र सायबर सुरक्षा प्रकल्पाचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

सर्वोत्तम तंत्रज्ञानानं सज्ज असलेल्या महाराष्ट्र सायबर सुरक्षा प्रकल्पामुळे डिजिटल माध्यमातून होणाऱ्या फसवणुकीचं प्रमाण कमी होईल तसंच जनतेमधली सायबर हल्ल्याची भीती कमी होईल असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. महा सायबर-महाराष्ट्र सायबर सुरक्षा प्रकल्पाचं उद्घाटन काल मुंबईत, ...

October 12, 2024 9:41 AM

views 65

साडे तीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या दसऱ्यानिमित्त राज्यभरात उत्साह

साडे तीन मुहूर्तांपैकी एक असलेला दसरा म्हणजेच विजयादशमीच्या सणाचा आज राज्यभरात उत्साह आहे. गेले नऊ दिवस सुरू असलेल्या शारदीय नवरात्र उत्सवाच्या सांगतेचा आजचा दिवस. यानिमित्त राज्यभरातल्या देवीच्या मंदिरांमधून सीमोल्लंघनाच्या मिरवणूका काढल्या जाणार आहेत. देवीचं शक्तीपीठ असलेल्या कोल्हापुरातला शाही दस...

October 11, 2024 8:35 PM

views 38

ठाणे आणि पालघर जिल्ह्यात बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट टोळ्यांचं जाळं उघडकीस

केंद्रीय वस्तू आणि सेवा कर, मुंबई विभागानं ठाणे आणि पालघर जिल्ह्यात दोन मोठ्या बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट टोळ्यांचं जाळं उघडकीला आणलं. या कारवाईत ७६० कोटी रुपयांच्या खोट्या इन्व्हॉइसद्वारे १४० कोटी रुपयांचे बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट दावे केल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.

October 11, 2024 8:28 PM

views 58

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या दुर्गापूजानिमित्त देशवासियांना शुभेच्छा

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दुर्गापूजेच्या निमित्तानं देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. दुर्गादेवी शक्तीचं प्रतीक आहे, वाईट शक्तींवर चांगल्या शक्तींचा विजय म्हणून दुर्गापूजा साजरी केली जाते, असं राष्ट्रपती मुर्मू यांनी  समाजमाध्यमावरल्या आपल्या संदेशात म्हटलं आहे.   महाराष्ट्राचे राज्यपाल ...