October 13, 2024 1:09 PM

views 24

आशियाई टेबल टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत महिला दुहेरी प्रकारात ऐहिका मुखर्जी आणि सुतीर्था मुखर्जी या जोडीने पटकावलं कास्यपदक

कझाकस्तानमध्ये अस्ताना इथं सुरु असलेल्या आशियाई टेबल टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत महिला दुहेरी प्रकारात भारताच्या ऐहिका मुखर्जी आणि सुतीर्था मुखर्जी या जोडीनं इतिहास रचत कास्यपदक पटकावलं आहे. आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत महिला दुहेरीमध्ये पदक मिळवणारी ऐहिका आणि सुतीर्था ही पहिलीच भारतीय जोडी आहे. उपांत्य फ...

October 13, 2024 11:30 AM

views 11

म्हैसूरमध्ये १० दिवस सुरू असलेल्या दसरा महोत्सवाची हत्तीच्या मिरवणुकीने सांगता

म्हैसूरमध्ये 10 दिवस सुरू असलेल्या म्हैसूर दसरा महोत्सवाची सांगता काल विजयादशमीच्या दिवशी भव्य जांबू सावरी म्हणजेच हत्तीच्या मिरवणुकीने झाली. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी, कुंभ लग्नात दसरा हत्ती अभिमन्यूने वाहून नेलेल्या 750 किलो सोन्याच्या हौद्यात विराजमान देवी चामुंडेश्वरीला पुष्पहार अ...

October 13, 2024 11:16 AM

views 24

मलबार 2024 अंतर्गत भारत, ऑस्ट्रेलिया, जपान आणि अमेरिकेच्या नौदलांचा संयुक्त सागरी सराव विशाखापट्टणम इथं सुरू

मलबार 2024 अंतर्गत भारत, ऑस्ट्रेलिया, जपान आणि अमेरिकेच्या नौदलांचा संयुक्त सागरी सराव विशाखापट्टणम इथं गेल्या 9 ऑक्टोबरपासून सुरू झाला आहे. सागरी सहकार्याला प्रोत्साहन देणे हा या सरावाचा उद्देश आहे. इंडो-पॅसिफिक प्रदेशात परस्पर कार्यक्षमता वाढविणे आणि भविष्यातील सराव या विषयांवर वरिष्ठ नौदल अधिकाऱ्...

October 13, 2024 10:49 AM

views 14

प्रधानमंत्री आंतरवासिता योजनेसाठी ऑनलाइन पोर्टलवर नोंदणी सुरू.

प्रधानमंत्री इंटर्नशिप अर्थात आंतरवासिता योजनेसाठी ऑनलाइन पोर्टलवर कालपासून नोंदणी सुरू झाली आहे. या महिन्याच्या 25 तारखेपर्यंत ही नोंदणी सुरू राहणार आहे. या योजनेसाठी पोर्टलवर आतापर्यंत 193 कंपन्यांनी 91 हजार आंतरवासिता संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. 2024-25 या आर्थिक वर्षात 1 लाख 25 हजार आंतरवासिता...

October 13, 2024 1:48 PM

views 38

लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला जिनेव्हा येथे होणाऱ्या IPU च्या 149 व्या बैठकीत भारतीय संसदीय शिष्टमंडळाचे नेतृत्व करणार

जिनिव्हा इथं आजपासून सुरु होणाऱ्या आंतर संसदीय संघाच्या एकशे एकोणपन्नासाव्या बैठकीला लोकसभेचे सभापती ओम बिर्ला भारतीय प्रतिनिधीमंडळाचं नेतृत्व करणार आहेत. ही बैठक येत्या १७ तारखेपर्यंत असून शांततापूर्ण आणि शाश्वत भविष्यासाठी विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवोन्मेषाचा वापर ही या बैठकीची संकल्पना आहे. ओम बिर...

October 13, 2024 1:50 PM

views 32

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून दक्षिण आफ्रिकेतील देशांच्या दौऱ्यावर रवाना

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज सकाळी अल्जीरिया, मॉरिटानिया आणि मलावी या ३ राष्ट्रांच्या भेटीवर रवाना झाल्या. या आफ्रिकी देशांना भेट देणाऱ्या त्या पहिल्या भारतीय राष्ट्रपती आहेत. त्या आज रात्री अल्जीरियात दाखल होतील. अल्जीरिया भेटीत त्या अनेक द्विपक्षीय बैठका घेतील आणि सोबतच भारतीय वंशाच्या लोकांची भेट...

October 13, 2024 9:33 AM

views 33

टी-ट्वेंटी मालिकेत भारताचा बांग्लादेशवर संपूर्ण विजय

पुरुषांच्या टी-ट्वेंटी क्रिकेटमध्ये, भारतानं काल हैदराबाद इथं तिसऱ्या सामन्यात बांगलादेशचा 133 धावांनी पराभव केला आणि संपूर्ण मालिका जिंकली. 298 धावांचा पाठलाग करताना पाहुण्यांचा संघ 20 षटकांत सात गडी 164 धावा करु शकला. संजू सॅमसननं 47 चेंडूत 111 तर कर्णधार सूर्यकुमार यादवनं 35 चेंडूत 75 धावा केल्या...

October 13, 2024 9:27 AM

views 63

सांस्कृतिक मूल्यांचा ऱ्हास कायदेशीर व्यवस्थेद्वारे नियंत्रित करण्याचं सरसंघचालक मोहन भागवत यांचं प्रतिपादन

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नागपूरमधील रेशीमबाग मैदानावरील विजयादशमी सोहोळयासाठी मुख्य अतिथि म्हणून इस्रोचे माजी अध्यक्ष डॉक्टर के. राधाकृष्णन तसंच सरसंघचालक मोहन भागवत उपस्थित होते. सर्व सण आणि उत्सवामध्ये सर्वांचा सहभाग असला पाहिजे असं भागवत यावेळी म्हणाले. बांग्लादेशातील हिंदूंवर होत असलेल्या अत...

October 13, 2024 12:29 PM

views 64

दसरा म्हणजेच विजयादशमीचा सण तसंच 68 वा धम्मचक्र प्रवर्तन दिन राज्यभरात उत्साहात साजरा

देशभरात काल दसरा म्हणजेच विजयादशमीचा सण पारंपरिक हर्षोल्हासात साजरा करण्यात आला.राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील लाल किला मैदानावर दसरा सोहोळ्यात भाग घेतला. वाईटावर चांगल्याचा विजय याचं प्रतीक म्हणून रावण, कुंभकर्ण आणि मेघनाद यांच्या पुतळ्यांचं यावेळी दहन करण्यात ...

October 12, 2024 8:45 PM

views 57

महिला क्रिकेट टी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेत न्यूझिलंडचा श्रीलंकेवर आठ गडी राखून विजय

महिला क्रिकेट टी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेत न्यूझिलंडने श्रीलंकेवर आठ गडी राखून विजय मिळवला. जॉर्जिया प्लिमरचं अर्धशतक आणि ऍमेलिया केर हिच्या नाबाद ३४ धावांच्या बळावर न्यूझिलंडने अठराव्या शतकात श्रीलंकेचं ११६ धावांचं आव्हान पार केलं.    त्याआधी श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करत ५ गड्यांच्या मोबदल्यात...