October 13, 2024 7:19 PM

views 37

मुंबई विमानतळावर ५९ लाख ६० हजार रुपये किमतीचा ५९६ ग्रॅम गांजा जप्त

मुंबईच्या विमानतळ आयुक्तालयाच्या अधिकाऱ्यांनी मुंबई विमानतळावर एका प्रवाशाकडून अंदाजे ५९ लाख ६० हजार रुपये किमतीचा ५९६ ग्रॅम गांजा जप्त केला आहे. विमानतळावरच्या हवाई गुप्तचर विभागाने संशयाच्या आधारावर एका प्रवाशाला अडवून त्याची झडती घेतली. त्यावेळी त्याच्याकडे असलेल्या ट्रॉलीत खाद्यपदार्थांच्या पाकि...

October 13, 2024 7:13 PM

views 51

लाडकी बहीण योजनेसह कोणत्याही कल्याणकारी योजना बंद होणार नाहीत, मुख्यमंत्र्यांची ग्वाही

माझी लाडकी बहीण योजनेसह कोणत्याही कल्याणकारी योजना बंद होणार नाहीत अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिली. नांदेडमध्ये आयोजित महिला सशक्तीकरण अभियान मेळाव्यात ते बोलत होते. लाडकी बहीण योजनेसाठी सरकारने ३३ हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे, त्यातले १७ हजार कोटी रुपये लाडक्या बहिणींच्या खात्...

October 13, 2024 7:07 PM

views 61

चौथी हाॅकी इंडिया वरिष्ठ महिला आंतरविभागीय राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा उद्यापासून सुरू

चौथी हाॅकी इंडिया वरिष्ठ महिला आंतर विभागीय राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा उद्यापासून नवी दिल्लीतल्या मेजर ध्यानचंद क्रीडांगणावर सुरु होणार असून ती २१ तारखेपर्यंत चालणार आहे. या स्पर्धेत चार गटांमध्ये एकूण१२ संघ सहभागी होणार आहेत. साखळी सामन्यांमध्ये प्रत्येक संघ आपल्या गटातल्या सर्व संघांबरोबर खेळेल.

October 13, 2024 7:19 PM

views 43

प्रत्येक गावात संविधान गौरव अभियान राबवण्यात येणार – मंत्री किरेन रिजीजू

भारतीय संविधानाला  येत्या २६ नोव्हेंबर रोजी ७५ वर्ष पूर्ण होत आहेत, या निमित्ताने केंद्र सरकारच्या वतीनं प्रत्येक गावात संविधान गौरव अभियान राबवण्यात येणार आहे, अशी माहिती केंद्रीय अल्पसंख्याक आणि संसदीय कार्यमंत्री किरेन रिजीजू यांनी दिली. ते आज छत्रपती संभाजीनगर इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. संवि...

October 13, 2024 6:44 PM

views 15

संयुक्त राष्ट्र दिनानिमित्त २४ ऑक्टोबरला सर्व प्रमुख कार्यालयांमध्ये संयुक्त राष्ट्रांचा ध्वज आणि तिरंगा फडकवावा – गृह मंत्रालय

संयुक्त राष्ट्र दिनानिमित्त येत्या २४ ऑक्टोबरला, केंद्र सरकारचे सर्व विभाग, राज्य सरकारं तसंच केंद्रशासित प्रदेशांनी आपल्या सर्व प्रमुख कार्यालयीन इमारतींवर संयुक्त राष्ट्रांचा ध्वज आणि राष्ट्रीय ध्वज तिरंगा फडकवावा, असे निर्देश केंद्रीय गृहमंत्रालयानं दिले आहेत. मात्र राष्ट्रपती भवन, उपराष्ट्रपती भ...

October 13, 2024 7:20 PM

views 12

आंतर संसदीय संघाच्या १४९व्या बैठकीत लोकसभा सभापती ओम बिर्ला यांच्या नेतृत्वात भारतीय प्रतिनिधीमंडळ सहभागी

जिनिव्हा इथं आयोजित आंतर संसदीय संघाच्या एकशे एकोणपन्नासाव्या बैठकीमध्ये लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांच्या नेतृत्वाखाली भारतीय प्रतिनिधीमंडळ सहभागी होत आहे. ही बैठक येत्या १७ तारखेपर्यंत चालणार असून शांततापूर्ण आणि शाश्वत भविष्यासाठी विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवोन्मेषाचा वापर ही या बैठकीची संकल्पना आह...

October 13, 2024 7:24 PM

views 39

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दिकी यांच्या हत्येप्रकरणी दोन जणांना अटक

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दिकी यांच्या हत्येप्रकरणी मुंबई  पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे. तिसरा आरोपी फरार असून त्याचा शोध सुरू आहे. गुरमैल सिंग आणि धर्मराज कश्यप या दोन आरोपींना आज किल्ला न्यायालयासमोर हजर करण्यात आलं. त्यापैकी गुरमैल सिंग याला येत्या २१ ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी दे...

October 13, 2024 7:24 PM

views 35

राज्यात कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडाल्याचा विरोधकांचा आरोप

राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला असल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी केला आहे. राज्यातल्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते बोलत होते. महिलांवर अत्याचार होत आ...

October 13, 2024 3:56 PM

views 29

पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत

पश्चिम रेल्वेवरील मुंबई सेंट्रल स्थानकात आज दुपारी बारा वाजताच्या सुमाराला एका रिकाम्या लोकल ट्रेनचे दोन डबे रुळावरून घसरले. लोकलमध्ये प्रवासी नसल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. या घटनेमुळे चर्चगेट वरून मुंबई सेंट्रलच्या दिशेने जाणारा धीमा रेल्वेमार्ग सध्या वाहतुकीसाठी बंद केला होता या मार्गावरच्...

October 13, 2024 3:45 PM

views 50

गोंदियातल्या तिरोडा-गोरेगाव मतदार संघातली ७५ हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार – उपमुख्यमंत्री फडणवीस

गोंदिया जिल्ह्यातल्या तिरोडा-गोरेगाव मतदार संघातली ७५ हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार असल्यानं हा मतदारसंघ सुजलाम्-सुफलाम् होणार आहे, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली. तिरोडा-गोरेगाव विधानसभा क्षेत्रातल्या धापेवाडा उपसा सिंचन योजना टप्पा क्रमांक दोन अंतर्गत ५ हजार २१७ कोटी रु...