October 14, 2024 9:36 AM

views 25

पुढील चार दिवसांत देशाच्या दक्षिणेकडील राज्यात मुसळधार पावसाचा इशारा

पुढील चार दिवसांत तामिळनाडू, पुद्दुचेरी, कराईकल, केरळ आणि किनारी आंध्र प्रदेशात मुसळधार पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. तसेच येत्या आठवडाभरात गुजरात, कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, मध्य प्रदेश, विदर्भ, छत्तीसगड येथे हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.   द...

October 14, 2024 9:27 AM

views 30

महिला टी -20 विश्वचषक स्पर्धेत ऑस्ट्रेलिया संघाची भारतीय संघावर मात

महिला T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत, शारजाह इथं काल रात्री झालेल्या अ गटाच्या सामन्यात ऑस्ट्रेलियानं भारताचा नऊ धावांनी पराभव केला. 152 धावांचा पाठलाग करताना भारतानं वीस षटकांत नऊ बाद 142 धावा केल्या. कर्णधार हरमनप्रीत कौरनं नाबाद 54 तर दीप्ती शर्मानं 29 धावा केल्या. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलिया...

October 14, 2024 9:15 AM

views 19

पीएम गतीशक्ती बृहद् आराखड्यामुळे विकसित भारत उपक्रमाला नवीन गती मिळेल- प्रधानमंत्री

पीएम गतीशक्ती बृहद् आराखडा सर्व क्षेत्रात वापरला जात आहे यामुळे विकसित भारत उपक्रमाला नवीन गती मिळेल असा विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल व्यक्त केला. नवी दिल्लीत भारत मंडपम इथं असलेल्या पीएम गतीशक्ति अनुभूती केंद्राला मोदी यांनी काल भेट दिली. पीएम गतीशक्तीची मुख्य वैशिष्ट्ये, यश आणि मुख्...

October 13, 2024 8:34 PM

views 13

नैर्ऋत्य मोसमी पावसाचा परतीचा प्रवास येत्या दोन दिवसात पूर्ण होईल

नैर्ऋत्य मोसमी पाऊस बिहार, पश्चिम बंगाल, झारखंड आणि सिक्कीममधून पूर्णपणे परतला असून छत्तीसगढ, मध्यप्रदेश, मेघालय, आसाम आणि ओदिशातल्या आणखी काही भागातून मागे सरला आहे. येत्या दोन दिवसात मान्सून देशातून पूर्णपणे परतेल असा हवामानविभागाचा अंदाज आहे. येत्या दोन दिवसात तमिळनाडू, पुद्दुचेरी, कराईकल, केरळ आ...

October 13, 2024 8:30 PM

views 32

लेबनॉनमध्ये युद्ध तात्काळ थांबलं पाहिजे – फ्रान्स राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन

लेबनॉनमध्ये युद्ध तात्काळ थांबलं पाहिजे असं फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांनी म्हटलं आहे. लेबनानी संसद अध्यक्षांबरोबर फोनवरुन संवाद साधताना त्यांनी इस्रायलच्या वाढत्या हल्ल्यांबद्द्ल चिंता व्यक्त केली. पॅरिसमधे येत्या  २४ तारखेला होणार असलेल्या  आंतरराष्ट्रीय परिषदेत लेबनीज नागरिक आणि...

October 13, 2024 8:28 PM

views 52

परतावा मिळवण्यासाठी ग्राहकांना त्यांच्या पसंतीचे पर्याय उपलब्ध करून द्यावेत – केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरण

परतावा मिळवण्यासाठी ग्राहकांना त्यांच्या पसंतीचे पर्याय उपलब्ध करून द्यावेत असे निर्देश केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणानं ओला या परिवहन कंपनीला दिले आहेत. परताव्याचे पैसे थेट बँक खात्यात पैसे जमा करण्याची  किंवा कुपनद्वारे परतावा मिळवण्याची सुविधा ग्राहकांना उपलब्ध करून द्यावी, असं प्राधिकरणानं त...

October 13, 2024 8:19 PM

views 39

विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा अग्निवीर योजनेवर पुन्हा प्रश्नचिन्ह

लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी अग्निवीर योजनेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केलं असून ही योजना म्हणजे आपल्या वीर जवानांच्या बलिदानाचा अपमान असल्याचं म्हटलं आहे. नाशिक मध्ये प्रशिक्षणादरम्यान दोन अग्निवीरांचा मृत्यू झाल्याच्या घटनेच्या संदर्भात ते बोलत होते. लष्करी सेवेतल्या इतर जवान...

October 13, 2024 8:17 PM

views 13

केंद्र सरकारच्या योजना माध्यमांद्वारे नागरिकांपर्यंत पोहोचवल्या जात आहेत – सचिव संजय जाजू

केंद्र सरकारच्या योजना माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अखत्यारितील माध्यमांद्वारे नागरिकांपर्यंत योग्यरित्या पोहोचवल्या जात आहेत, असं माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजू यांनी आज सांगितलं.    नागपूर इथं माहिती आणि प्रसारण मंत्रालया अंतर्गत विविध प्रसार माध्यमांच्या अधिका-यांच्या आढाव...

October 13, 2024 8:09 PM

views 36

विदेशी गुंतवणूकदारांनी ऑक्टोबर महिन्यात भांडवली बाजारातून गुंतवणूक काढली

इस्रायल आणि इराण यांच्यातला संघर्ष, कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली भरमसाठ वाढ यामुळे विदेशी गुंतवणूकदार संस्थांनी ऑक्टोबर महिन्यात भांडवली बाजारातून मोठ्या प्रमाणात गुंतवणूक काढून घेतली आहे. विदेशी गुंतवणूकदारांनी या महिन्यात ५८ हजार ७११ कोटी रुपयांच्या  समभागातून गुंतवणूक काढून घेतली. चीनमधल्या भां...

October 13, 2024 7:56 PM

views 20

जगभरात आज ‘आंतरराष्ट्रीय आपदा जोखीम शमन’ दिवस साजरा

जगभरात आज आंतरराष्ट्रीय आपदा जोखीम शमन दिवस साजरा झाला. संपूर्ण जगात आपदा जोखीमीबाबत जागरुकता निर्माण करणं तसंच आपदा जोखीम कमी करण्याची संस्कृती रुजवणं हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे. ‘सशक्त भारतासाठी पुढच्या पिढीचं सक्षमीकरण’ ही या वर्षीच्या दिवसांची मुख्य संकल्पना आहे. आपदा मुक्त भविष्यासाठी युवका...