October 15, 2024 5:01 PM

views 38

देवळाली-दानापूर शेतकरी समृद्धी विशेष गाडीला रेल्वेमंत्र्यांनी दाखवला हिरवा झेंडा

देवळाली ते दानापूर या शेतकरी समृद्धी विशेष गाडीला आज रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून हिरवा झेंडा दाखवला. या गाडीमुळे शेतकऱ्यांना केवळ प्रतिकिलो चार रुपये या माफक दरात मालवाहतूक करता येईल असं वैष्णव यांनी यावेळी सांगितलं. महाराष्ट्रातल्या दहा स्थानंकांचा अमृत स्थानक ...

October 15, 2024 2:35 PM

views 56

अतिवृष्टीने बाधित झालेल्या श्रीलंकेत पावसाचा जोर ओसरेल, श्रीलंकेच्या हवामान विभागाचा अंदाज

अतिवृष्टीने बाधित झालेल्या श्रीलंकेत पावसाचा जोर ओसरेल असा अंदाज आहे. श्रीलंकेच्या हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार बंगालच्या उपसागरात आग्नेय भागात निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा पश्चिम वायव्य दिशेला सरकण्याची शक्यता असल्यामुळे हवामान काहीसे निवळेल. दरम्यान श्रीलंकेत पूरग्रस्तांसाठी राष्ट्राध्य...

October 15, 2024 2:30 PM

views 59

भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान सचिव स्तरावरची नवी दिल्लीत चर्चा 

भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान सचिव स्तरावरची चर्चा नवी दिल्लीत झाली. संरक्षण सचिव गिरीधर अरमाने आणि परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यात सहभागी झाले होते. यावेळी राजकीय, संरक्षण, सुरक्षा, प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर चर्चा झाली. भारत प्रशांत क्षेत्रात शांतता, स्थैर्य राखणं तसंच भारत - ऑस्ट्रेलिया सर्...

October 15, 2024 2:26 PM

views 59

भारताच्या सोनम उत्तम मस्करनं महिलांच्या १० मीटर एअर रायफलमध्ये पटकावलं रौप्य पदक

नवी दिल्ली इथं झालेल्या I S S F नेमबाजी विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारताच्या सोनम म्हसकर हिने १० मीटर एअर रायफल प्रकारात आज रौप्य पदक जिंकलं. बावीस वर्षांच्या सोनमने २५२ पूर्णांक ९ गुण मिळवत आपलं पदक निश्चित केलं. या स्पर्धेत चीनच्या युतिंग हुआंग हिने सुवर्ण तर फ्रान्सच्या ओसियन मुलर हिने कांस...

October 15, 2024 2:23 PM

views 47

डेन्मार्क खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पी. व्ही. सिंधूचा सामना आज चिनी तैपेईच्या पै यू पो हिच्याशी होणार

डेन्मार्क खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताची पी. व्ही. सिंधू आज संध्याकाळी महिला एकेरी प्रकाराच्या पहिल्या फेरीत चिनी तैपेईच्या पै यू पो हिच्याशी लढत देईल. तर पुरुष दुहेरी प्रकारात भारताचा लक्ष्य सेन याची लढत चीनच्या लू गुआंग झू विरुद्ध होईल. महिला दुहेरी प्रकारात रुतपर्णा आणि श्वेतपर्णा पांडा या दोघी...

October 15, 2024 2:13 PM

views 17

परमेश शिवमणी यांनी आज भारतीय तटरक्षक दलाचे २६ वे महासंचालक म्हणून स्वीकारला कार्यभार

परमेश शिवमणी यांनी आज भारतीय तटरक्षक दलाचे २६ वे महासंचालक म्हणून कार्यभार स्वीकारला. शिवमणी हे नेव्हिगेशन आणि दिशादर्शन क्षेत्राचे तज्ञ असून त्यांनी तटरक्षक दलाच्या महत्त्वाच्या सर्व जहाजांवर सेवा बजावली आहे. ते नवी दिल्लीतील राष्ट्रीय सुरक्षा महाविद्यालय तसंच विलिंग्डन इथल्या सुरक्षा सेवा स्टाफ मह...

October 15, 2024 2:09 PM

views 38

माजी राष्ट्रपती डॉ.ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त प्रधानमंत्र्यांनी कलाम यांना वाहिली आदरांजली

माजी राष्ट्रपती डॉ. ए पी जे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी कलाम यांना आदरांजली वाहिली आहे. माजी राष्ट्रपतींचे विचार आणि दृष्टीकोन देशाला विकसित भारताचेे लक्ष्य साध्य करायला सहाय्य करेल, असं प्रधानमंत्र्यांनी समाजमाध्यमांवरच्या संदेशात म्हटलं आहे.

October 15, 2024 2:06 PM

views 38

भारत आणि अल्जेरियामध्ये अधिकाधिक आर्थिक भागिदारी वाढवण्यावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दिला भर

भारत आणि अल्जेरियामध्ये अधिकाधिक आर्थिक भागिदारी वाढवण्यावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी भर दिला आहे. द्विपक्षीय संबंध आणखी बळकट करणं आणि सहकार्यासाठी नवनवीन मार्गांचा अवलंब करण्याचं आवाहन त्यांनी केलं. अल्जेरियाची राजधानी अल्जियर्समध्ये काल त्या अल्जेरिया-भारत आर्थिक फोरमला संबोधित करत होत्या.

October 15, 2024 3:58 PM

views 45

केंद्रीय निवडणूक आयोग आज महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकींच्या कार्यक्रमाची करणार घोषणा

महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकींची घोषणा केंद्रीय निवडणूक आयोग आज करणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोग दुपारी साडेतीन वाजता नवी दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत या दोन्ही राज्यांचं निवडणूक वेळापत्रक जाहीर करेल. त्यानंतर लगेचच आचारसंहिता लागू होईल. महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ पुढील महिन्याच्या २...

October 15, 2024 1:48 PM

views 38

जम्मू-काश्मिरमधल्या नव्या सरकारचा उद्या शपथविधी

जम्मू-काश्मिरमधल्या नव्या सरकारचा शपथविधी उद्या सकाळी श्रीनगरमध्ये होणार आहे. नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी काल नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांना नवीन सरकार स्थापन करण्यासाठी आमंत्रित केलं. इथली राष्ट्रपती राजवट केंद्र सरकारनं परवाच उठवली होती.