October 15, 2024 12:15 PM

views 36

नांदेड इथं काल जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आला शेतकरी आसूड मोर्चा

नांदेड इथं काल जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकरी आसूड मोर्चा काढण्यात आला. छत्रपती संभाजी महाराज यांच्या नेतृत्वात निघालेल्या या मोर्चात सोयाबीनला प्रति क्विंटल साडे आठ हजार रुपये तर कापसाला ११ हजार रुपये दर द्यावा, अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई त्वरित द्यावी, नदीकाठच्या शेतकऱ्यांना दुहेरी अन...

October 15, 2024 11:51 AM

views 37

आपण निवडून आलो तरी आपला इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राला कायम विरोध राहिल – प्रकाश आंबेडकर

आपण निवडून आलो तरी आपला इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राला कायम विरोध राहिल, असं वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. काल छत्रपती संभाजीनगर इथं पत्रकार परिषदेत ते बोलत होते. काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांवर त्यांनी यावेळी टीका केली. अदिवासी आणि ओ बी सी समाजाची एकत्रित मोट आम्ही ...

October 15, 2024 11:21 AM

views 26

उदगीर ते देगलूर आणि आदमपूर फाटा ते सगरोळी फाटा मार्गाच्या ८०९ कोटी ७७ लाख रुपयांच्या कामांना केंद्र सरकारची मंजुरी

राष्ट्रीय महामार्ग-६३ वर उदगीर ते देगलूर आणि आदमपूर फाटा ते सगरोळी फाटा मार्गाच्या, ८०९ कोटी ७७ लाख रुपयांच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे. केंद्रीय रस्ते महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशातून ही माहिती दिली. या मार्गामुळे उदगीर, मुक्रमाबाद आणि देगलूर शहरातल्या औद्योगिक कृ...

October 15, 2024 11:16 AM

views 47

मराठवाड्यातला दुष्काळ दूर करण्यासाठी ८० हजार कोटीचा प्रकल्प राबवणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा

मराठवाड्यातला दुष्काळ दूर करण्यासाठी ८० हजार कोटीचा प्रकल्प राबवणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. जालना जिल्ह्यात घनसावंगी तालुक्यातल्या कुंभारपिंपळगाव इथं आयोजित शेतकरी मेळाव्यात ते काल बोलत होते. मराठवाड्यामध्ये जे आवश्यक आहे, त्या बाबी करून नदीजोड प्रकल्पच्या माध्यमातून ...

October 15, 2024 10:32 AM

views 39

राज्यात येत्या 24 तासात बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता

येत्या 24 तासात राज्यात बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. सांगली जिल्ह्यात तसंच रत्नागिरीमध्येही काल मेघगर्जनेसह जोरदार पाऊस झाला. पुणे शहराच्या काही भागातही काल रात्री पावसाच्या जोरदार सरी आल्या. बुलडाणा जिल्ह...

October 15, 2024 10:08 AM

views 52

महिलांच्या टी-ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारताचं आव्हान संपुष्टात

महिलांच्या टी - ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारताचं आव्हान संपुष्टात आलं आहे. अ गटात काल झालेल्या सामन्यात न्यूझीलंडच्या संघाने पाकिस्तानचा पराभव करत उपान्त्य फेरीत प्रवेश केल्यानंतर भारतीय संघ चार गुणांसह तिसऱ्या स्थानावर राहीला. ऑस्ट्रेलिया पहिल्या तर पाकिस्तान चौथ्या स्थानावर आहे.

October 15, 2024 10:04 AM

views 64

केंद्रीय गृहमंत्री आज नवी दिल्लीत भारतीय पोलीस सेवेतील प्रशिक्षणार्थीं अधिकाऱ्यांशी साधणार संवाद

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज नवी दिल्लीत भारतीय पोलीस सेवेतील प्रशिक्षणार्थीं अधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत. हे प्रशिक्षणार्थी अधिकारी त्यांचे प्रशिक्षण काळातील अनुभव गृहमंत्र्यांना सांगणार आहेत. तर देशाच्या अंतर्गत सुरक्षेपुढील आव्हानांना कशाप्रकारे तोंड देता येईल याचं अमित शहा त्यांना मार्गदर्श...

October 15, 2024 10:00 AM

views 16

देशातील 95 टक्के खेडी 4G तंत्रज्ञानाद्वारे जोडली गेली आहेत, उर्वरित गावं 2027 पर्यंत जोडली जातील- डॉ. पेम्मासानी चंद्रशेखर

भारताची वसुधैव कुटुंबकमची समृद्ध परंपरा जागतिक मानकांचा अंगिकार करण्यास वचनबद्ध असल्याचं केंद्रीय दूरसंचार राज्यमंत्री डॉक्टर पेम्मासानी चंद्रशेखर यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघटनेच्या जागतिक मानक चर्चासत्राच्या समारोप सत्रात ते काल बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र...

October 15, 2024 9:53 AM

views 57

भारत आणि कोलंबिया यांच्यात आज नवी दिल्लीत दृक-श्राव्य कार्यक्रमांच्या सहनिर्मितीबाबत करार करण्यात येणार

भारत आणि कोलंबिया यांच्यात आज नवी दिल्लीत दृक-श्राव्य कार्यक्रमांच्या सहनिर्मितीबाबत करार करण्यात येणार आहे. माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन आणि कोलंबियाच्या परराष्ट्र खात्याचे उपमंत्री जॉर्ज एन्रिके-रोखास रॉड्रिगेझ यांच्यासह दोन्ही देशांचे अन्य प्रतिनिधी या करारावर स्वाक्षरी करतील

October 15, 2024 9:49 AM

views 32

वक्फ दुरुस्ती विधेयकावर चर्चा करण्यासाठी, संयुक्त संसदीय समितीची काल नवी दिल्लीत झाली बैठक

वक्फ दुरुस्ती विधेयकावर चर्चा करण्यासाठी या विषयावरील संयुक्त संसदीय समितीची काल नवी दिल्लीत बैठक झाली. तथापि या समितीचं नियमानुसार काम होत नसल्याचा आरोप करत विरोधी पक्षांच्या काही खासदारांनी या बैठकीवर बहिष्कार टाकला. काँग्रेसचे गौरव गोगोई, इम्रान मसूद, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अरविंद ...