October 16, 2024 9:38 AM

views 79

आयएसएसएफ नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत भारताच्या सोनम मसकरला रौप्य पदक

नवी दिल्ली इथं काल झालेल्या आयएसएसएफ नेमबाजी विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारताच्या सोनम मसकर हिने 10 मीटर एअर रायफल प्रकारात रौप्य पदक जिंकलं. तिने 252 पूर्णांक 9 गुण मिळवले. या स्पर्धेत चीनच्या युतिंग हुआंगनं सुवर्ण, तर फ्रान्सच्या ओसियन मुलरनं कास्य पदक पटकावलं.

October 16, 2024 8:56 AM

views 68

विधान परिषदेवरच्या राज्यपाल नियुक्त ७ सदस्यांचा शपथविधी

विधानपरिषदेच्या 7 राज्यपाल नियुक्त आमदारांचा शपथविधी काल झाला. विधान परिषदेच्या सभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे यांनी या आमदारांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. त्यात चित्रा वाघ, विक्रांत पाटील, धर्मगुरु बाबुसिंग राठोड, पंकज भुजबळ, इद्रिस नाईकवाडी, हेमंत पाटील आणि मनीषा कायंदे यांचा समावेश आहे.   दरम्य...

October 16, 2024 3:50 PM

views 30

नैऋत्य मान्सूनची देशभरातून माघार

नैर्ऋत्य मोसमी पावसाचा भारतीय उपखंडावरुन परतीचा प्रवास काल पूर्ण झाला, त्याचवेळी ईशान्य मोसमी पाऊस सक्रीय झाला आहे. बंगालच्या उपसागरात चेन्नईपासून सुमारे ४९० किलोमीटर अंतरावर तयार झालेला कमी दाबाचा पट्टा आज पुद्दुचेरी आणि नेल्लोर दरम्यान उत्तर तामिळनाडू आणि दक्षिण आंध्र प्रदेश किनारपट्टी ओलांडण्याची...

October 16, 2024 3:52 PM

views 54

भारत-न्यूझीलंड यांच्यातला आजच्या दिवसाचा सामना पावसामुळे रद्द

भारत आणि न्यूझीलंडमध्ये सुरू झालेल्या कसोटी क्रिकेट मालिकेच्या पहिल्या सामन्यातला पहिल्या दिवसाचा खेळ पावसामुळे रद्द झाला आहे. सकाळी बेंगळुरूच्या चिन्नास्वामी मैदान परिसरात पाऊस असल्याने सामना सुरू व्हायला उशिर झाला होता. दुपारी चहाच्या विश्रांतीपर्यंत पाऊस कायम राहिल्याने आजच्या दिवसाचा खेळ रद्द झा...

October 15, 2024 8:38 PM

views 9

कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणासाठी iGOT लॅब सुरू

माहिती प्रसारण मंत्रालयानं कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणासाठी iGOT लॅब सुरू केली आहे, अशी माहिती विभागाचे राज्यमंत्री एल. मुरुगन यांनी दिली. मंत्रालयाच्या सर्व कर्मचाऱ्यांना १९ ऑक्टोबरपर्यंत यावर नोंदणी करण्याचे आदेश मंत्रालयानं दिले आहेत. विविध प्रकारे १६ प्रशिक्षण कार्यक्रम पूर्ण करण्याच्या सूचना मंत्...

October 15, 2024 8:33 PM

views 45

ज्येष्ठ शिक्षण तज्ज्ञ अशोक प्रधान यांचं निधन

नानाविध संकल्पनांनी शिक्षण क्षेत्राला नवे आयाम प्राप्त करून देणारे ज्येष्ठ शिक्षण तज्ज्ञ अशोक प्रधान यांचं आज कल्याणमध्ये वार्धक्यानं निधन झाले. ते ८५ वर्षांचे हाेते.  मुंबईतल्या रुपारेल महाविद्यालयात प्राध्यापक, आणि नंतर प्राचार्य म्हणून त्यांनी काम केलं. त्यानंतर मुंबई विद्यापीठाचं उप कुलगुरूपद आण...

October 15, 2024 8:30 PM

views 24

अमेरिका-भारत धोरणात्मक भागीदारी मंचाची भूमिका महत्वपूर्ण – अर्थमंत्री निर्मला सीतारामन

भारतातले उद्योग आणि गुंतवणूक वाढीला चालना देण्यात अमेरिका - भारत धोरणात्मक भागीदारी मंचाची भूमिका महत्वपूर्ण असल्याचं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. या मंचाच्या सदस्यांनी अध्यक्ष जॉन टी चेंबर यांच्या नेतृत्वाखाली आज नवी दिल्लीत अर्थमंत्र्यांची भेट घेतली, त्यावेळी त्या बोलत हो...

October 15, 2024 8:28 PM

views 10

लोथल इथं राष्ट्रीय सागरी वारसा संकुलाच्या निर्मितीमुळे संस्कृती आणि पर्यटनाला चालना मिळेल – प्रधानमंत्री

गुजरातमधल्या लोथल इथे राष्ट्रीय सागरी वारसा संकुलाची निर्मिती झाल्यामुळे संस्कृती आणि पर्यटनाला चालना मिळेल असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. आपल्या समाजमाध्यमावरच्या संदेशात प्रधानमंत्र्यांनी पर्यटन क्षेत्रातल्या व्यावसायिकांना नवीन संधी शोधण्याचं तसंच कल्पना सुचवण्याचं आवाहनही केलं.

October 15, 2024 8:24 PM

views 51

२७ आकांक्षित जिल्ह्यांसाठी प्रधानमंत्री गतीशक्ती राष्ट्रीय बृहत् आराखड्याच्या जिल्हा आवृत्तीचा प्रारंभ

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पियुष गोयल यांनी आज नवी दिल्लीत २७ आकांक्षित जिल्ह्यांसाठी प्रधानमंत्री गतीशक्ती राष्ट्रीय बृहत् आराखड्याच्या जिल्हा आवृत्तीचा प्रारंभ केला. प्रधानमंत्री गतीशक्ती योजनेला तीन वर्ष पूर्ण झाली असून, पायाभूत सुविधांच्या नियोजनासाठी हे अतिशय उपयुक्त साधन ठरलं आहे, असं त...

October 15, 2024 8:12 PM

views 19

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना राज्यशास्त्र या विषयात मानद डॉक्टरेट बहाल

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना आज अल्जेरियाच्या अल्जीरियर्स मधल्या सीदी अब्देलाह विज्ञान आणि तंत्रज्ञान पोले विद्यापीठानं राज्यशास्त्र या विषयात मानद डॉक्टरेट बहाल केली. अल्जेरियाचे उच्च शिक्षण आणि वैज्ञानिक संशोधन मंत्र्यांनी राष्ट्रपतींना ही पदवी प्रदान केली.  हा पुरस्कार म्हणजे भारताचा सन्मान अस...