October 16, 2024 7:31 PM

views 73

महाविकास आघाडीत २८८ पैकी २२४ जागांवर सहमती

महाविकास आघाडीत २८८ पैकी २२४ जागांवर सहमती झाली आहे. उद्या उर्वरित जागांवर सहमती होईल, अशी माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली. नवी दिल्लीत पक्षाच्या बैठकीनंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. आज ८४ जागांच्या उमेदवारांंबाबत चर्चा झाल्याची माहिती त्यांनी दिली. 

October 16, 2024 7:26 PM

views 43

मतदान केंद्रांची माहिती मिळण्यासाठी मुंबईतल्या मतदारांना घरपोच पत्र

मतदान केंद्रांची माहिती घरबसल्या मिळावी यासाठी मुंबईतल्या मतदारांना घरपोच पत्र दिली जात आहेत. त्यात दिलेला QR कोड स्कॅन केला की मतदारांना मतदान केंद्रांपर्यंत पोहोचण्याचा नकाशा मिळेल, अशी माहिती मुंबईचे जिल्हा निवडणूक अधिकारी भूषण गगराणी यांनी दिली. लोकसभा निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेदरम्यान मुंबईतल...

October 16, 2024 7:19 PM

views 39

भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची नवी दिल्लीत बैठक

भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक आज नवी दिल्लीत होत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांच्यासह अनेक वरिष्ठ नेते यात सहभागी होणार आहेत. यावेळी उमेदवार यादीवर चर्चा होण्याची शक्यता आहे.

October 16, 2024 6:56 PM

views 40

अनुसूचित जातींसाठीच्या आरक्षणाच्या उपवर्गीकरणासाठी स्थापन केलेल्या समितीला वंचित बहुजन आघाडीचा विरोध

राज्यातल्या महायुती सरकारनं अनुसूचित जातींसाठीच्या आरक्षणाच्या उपवर्गीकरणासाठी स्थापन केलेल्या समितीला वंचित बहुजन आघाडीनं विरोध केला आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी आज मुंबईत वार्ताहर परिषदेत ही भूमिका मांडली. राज्य सरकारनं काल अध्यादेश काढून यासाठी निवृत्त न्यायाधिशांच्या अध...

October 16, 2024 6:30 PM

views 41

सरकारने केलेले सर्व दावे खोटे असल्याचा पटोले यांचा आरोप

मागच्या दोन वर्षांत महाराष्ट्राची इतर राज्यांच्या तुलनेत पिछेहाट झाली असून सरकारने वार्ताहर परिषदेत केलेले सर्व दावे खोटे असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केला आहे. राज्यात होऊ घातलेले प्रकल्प गुजरात आणि इतर राज्यात गेले, राज्यात बेरोजगारी वाढली, मुंबईतल्...

October 16, 2024 3:43 PM

views 32

एनएसजीच्या स्थापना दिनानिमित्त प्रधानमंत्र्यांकडून शुभेच्छा

एनएसजी अर्थात राष्ट्रीय सुरक्षा रक्षक दलाच्या स्थापना दिनानिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. देशाच्या संरक्षणाप्रति एनएसजी जवानांचं समर्पण, धैर्य आणि निर्धार यामुळे देश त्यांना सलाम करत आहे, असं प्रधानमंत्र्यांनी समाजमाध्यमावरच्या आपल्या संदेशात म्हटलं आहे. एनएसजी ज्या निष...

October 16, 2024 3:43 PM

views 20

सक्रिय सदस्यता अभियानाला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडून आरंभ

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज सक्रिय सदस्यता अभियानाला आरंभ केला. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जगतप्रसाद नड्डा यावेळी उपस्थित होते. भाजपाला तळागाळापर्यत नेत मजबूत करण्यासाठी आणि देशाहितासाठी पक्षाच्या कार्यकर्त्यांचं सक्रिय योगदान मिळवणं हा या योजनेमागचा उद्देश असल्याचं त्यांनी सांगितलं. सक्रिय सद...

October 16, 2024 3:38 PM

views 28

‘भारत’ खेळणी निर्यात करणारा देश बनल्याचं मंत्री पियूष गोयल यांचं प्रतिपादन

खेळणी तयार करण्यासाठी सर्व प्रकारचे घटक उपलब्ध करून देणारी परिसंस्था भारताने तयार केली असून भारत हा आता खेळणी निर्यात करणारा देश बनल्याचं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियूष गोयल यांनी सांगितलं. नवी दिल्ली इथं पहिल्या इंडियन फाऊंडेशन क्वालिटी मॅनेजमेंट परिषदेच्या समारोपाच्या कार्यक्रमात ‘विकसित...

October 16, 2024 3:31 PM

views 43

मुंबई विमानतळावर प्रवाशाकडून ३ कोटी ४६ लाख रुपयांचा गांजा जप्त

मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी बँकॉकहून आलेल्या एका प्रवाशाकडून गांजा पकडला. हा गांजा साधारण ३ कोटी ४६ लाख रुपये किमतीचा आहे. हा गांजा खाद्यपदार्थांच्या पाकिटात भरुन प्रवाशाने ती पाकीटं आपल्या जवळच्या ट्रॉलीत ठेवली होती. दुबईहून आलेल्या एका प्रवाशाने ...

October 16, 2024 3:20 PM

views 57

आदित्य ठाकरे यांची सरकारवर टीका

लोकसभा निवडणुका झाल्यानंतर मंत्रिमंडळाच्या प्रत्येक बैठकीत या सरकारने आपण काहीतरी जनतेसाठी देत आहोत, असे दाखवण्याचा प्रयत्न केला, मात्र खरा फायदा अदानी समूहाला करन दिला असा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी केला आहे. धारावीमध्ये ५४० एकरचा कुर्ला येथे २१ एकर, मुलुंड, ...