October 17, 2024 9:16 AM

views 17

तुळजाभवानी देवीच्या मंदिर जीर्णोध्दार कामाचा शुभारंभ

तुळजापूर इथल्या तुळजाभवानी मंदिराच्या जीर्णोद्धार कामाचा शुभारंभ सातारा गादीच्या महाराणी दमयंतीराजे भोसले यांच्या हस्ते काल करण्यात आला.देवीच्या दर्शनासाठी येणार्‍या भाविकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही, याची काळजी घेवून मंदिराच्या जीर्णोध्दार कामाचं नियोजन करण्यात आलं आहे. समितीच्या निधीमध...

October 17, 2024 8:36 AM

views 69

2025-26च्या हंगामासाठी रबी पिकांच्या किमान आधारभूत दरात वाढ

रबी पिकांच्या किमान आधारभूत किंमतीत वाढ करण्यास केंद्रीय मंत्रीमंडळानं काल मान्यता दिली. ही वाढ 2025 - 26 या पणन हंगामासाठी आहे. केंद्रीय मंत्रीमंडळाची बैठक काल नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या बैठकीत घेतलेल्या निर्णयांच...

October 17, 2024 8:48 AM

views 28

पक्ष किंवा उमेदवारांकडून दिल्या जाणाऱ्या भेटवस्तूंवर लक्ष ठेवणार असल्याचा निवडणूक आयोगाचा इशारा

विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर दिवाळीच्या काळात राजकीय पक्ष किंवा उमेदवारांकडून दिल्या जाणाऱ्या भेटवस्तूंवर निवडणूक आयोगाचं बारीक लक्ष असणार आहे. सर्वसामान्य नागरिक आपल्या तक्रारी C-VIGIL ऍपवर नोंदवू शकतात, अशी माहिती अतिरीक्त मुख्य निवडणूक अधिकारी किरण कुलकर्णी यांनी काल मुंबईत वार्ताहर परिषदे...

October 16, 2024 8:50 PM

views 33

विमानात स्फोट घडवून आणण्याची धमकी दिल्याप्रकरणी अल्पवयीन आरोपी अटक

विमानात स्फोट घडवून आणण्याची धमकी दिल्या प्रकरणी एका अल्पवयीन आरोपीला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. १४ ऑक्टोबर रोजी आरोपीने एका बनावट एक्स खात्यावरून चार विमानांमध्ये स्फोट होणार असल्याचं सांगितलं होतं. यात तीन आंतरराष्ट्रीय विमानं होती. धमकीमुळे दोन विमानांना उशीर झाला तर एक विमान रद्द करावं लागलं ...

October 16, 2024 8:46 PM

views 56

लेबननच्या नाबतिह शहरावर इस्रायलने केलेल्या हवाई हल्ल्यात ६ जणांचा मृत्यू

लेबननच्या नाबतिह शहरावर इस्रायलने आज केलेल्या हवाई हल्ल्यात महापौरासह सहा नागरिकांचा मृत्यू झाला. इस्रायली लष्कराने झेबडीन आणि कफार तेबनीत या भागांवरही हल्ले केले. तर हिजबोल्लाहने उत्तर इस्रायलमधल्या कार्मिएलच्या दिशेने क्षेपणास्त्रं डागली. 

October 16, 2024 8:43 PM

views 26

नायजेरियात इंधनाच्या टँकरचा स्फोटात ९४ जणांचा मृत्यू, ५० ठार

नायजेरियात एक इंधनाच्या टँकरचा स्फोट होऊन ९४ जण मारले गेले तर ५० जण जखमी झाले. टँकरचालकाचं वाहनावरचं नियंत्रण गेल्यामुळे हा टँकर कलंडला होता. त्यातलं इंधन जमा करायला जमलेल्या जमावातल्या बहुसंख्यांचा मृतांमध्ये समावेश आहे. नायजेरियातले इंधनाचे भाव सामान्यांच्या आवाक्याबाहेचे आहेत त्यामुळे असे अपघात अ...

October 16, 2024 8:41 PM

views 19

शांघाय सहकार्य संघटनेच्या शिखर परिषदेत ८ मुद्द्यांवर सर्व देशांमध्ये सहमती

इस्लामाबादमध्ये झालेल्या शांघाय सहकार्य संघटनेच्या शिखर परिषदेत ८ मुद्द्यांवर सर्व देशांमध्ये सहमती झाली. ही बैठक अतिशय फलदायी ठरल्याचं परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी म्हटलं आहे. एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य, डिजिटल सर्वसमावेशन, मिशन लाइफ आणि संयुक्त राष्ट्रांची शाश्वत विकासाठी उद्दिष्ट साध्य ...

October 16, 2024 8:37 PM

views 32

राष्ट्रपती दौप्रदी मुर्मू मॉरिटानिया इथं पोहचल्या

राष्ट्रपती दौप्रदी मुर्मू तीन देशांच्या दौऱ्यावर असून आज त्या मॉरिटानिया मध्ये दाखल झाल्या आहेत. मॉरिटानियाचे राष्ट्रपती मोहम्मद औलद गजौनी यांनी त्यांचं विमानतळावर स्वागत केलं. मॉरिटानिया दौऱ्यात राष्ट्रपती तिथल्या भारतीय वंशाच्या नागरिकांची भेट घेणार आहे. तसंच द्विपक्षीय बैठका देखील घेणार आहेत.

October 16, 2024 8:30 PM

views 21

संगीत आणि नृत्याला भाषेची गरज नसल्यानं या कलाप्रकारांना सीमेचं बंधन नाही – प्रधानमंत्री

संगीत आणि नृत्याला भाषेची गरज नसल्यानं या कलाप्रकारांना सीमेचं बंधन नाही. त्यामुळेच हे कलाप्रकार सर्वांना समजू शकतात, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज सांगितलं. नवी दिल्लीत भारतीय नृत्यावर आधारीत पहिल्या आंतरराष्ट्रीय महोत्सवात ते बोलत होते. सहा दिवस चालणाऱ्या महोत्सवाचं आयोजन संगीत नाटक अकादम...

October 16, 2024 8:21 PM

views 22

सर्वोच्च न्यायालयाच्या आवारातल्या न्यायदेवतेच्या पुतळ्यात बदल करण्याच्या सूचना

सरन्यायाधीश न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या आवारातल्या न्यायदेवतेच्या पुतळ्यात बदल करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या नव्या न्यायदेवतेच्या हातात तलवारीच्या ऐवजी राज्यघटना आहे. बळाचा वापर करून नाही, तर न्याय्य पद्धतीनं कायद्याचं राज्य आणणं याचं हे प्रतीक आहे. न्याय पारदर्शक असतो...