October 17, 2024 6:57 PM

views 43

विधानसभा निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज

राज्यातल्या विधानसभा निवडणुकीसाठीचा कार्यक्रम केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केल्यानंतर राज्यातल्या सर्व जिल्ह्यात निवडणूकपूर्व तयारीला सुरुवात झाली आहे.    रत्नागिरी जिल्ह्यात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तपास नाके उभारण्यात आले असून सर्व वाहनांची कसून तपासणी करण्यात येत असल्याची माहिती पोलीस अध...

October 17, 2024 3:57 PM

views 69

वंचित बहुजन आघाडीची तिसरी यादी जाहीर

वंचित बहुजन आघाडीनं विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली. त्यात ३० उमेदवारांची नावं आहेत. उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, मुंबई आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या काही जागांवर हे उमेदवार निवडणूक लढवणार आहेत.        

October 17, 2024 3:51 PM

views 33

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आफ्रिका दौऱ्याच्या अंतिम टप्प्यात मलावी देशात पोहचल्या

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू नुकत्याच आफ्रिका दौऱ्याच्या तिसऱ्या आणि अंतिम टप्प्यात मलावी या देशात पोहचल्या आहेत. भारताच्या राष्ट्रपतींनी मलावी ला भेट देण्याची ही पहिलीच वेळ आहे. राष्ट्रपती आज एका वाणिज्यविषयक कार्यक्रमात आणि त्यानंतर भारतीय समुदायाच्या कार्यक्रमात सहभागी होतील. मलावी प्रजासत्ताकाचे रा...

October 17, 2024 8:22 PM

views 32

बिहारमध्ये विषारी दारूच्या सेवनाने २५ जणांचा मृत्यू

बिहारमध्ये भेसळयुक्त दारू पिऊन मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या २५ वर पोहोचली आहे. गेल्या २४ तासांत सिवानमध्ये २० जणांचा, तर  सारण जिल्ह्यात ५ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती दारूबंदी आणि उत्पादन शुल्क मंत्री रत्नेश सदा यांनी दिली. दारू पिणाऱ्यांपैकी  २२ जणांची प्रकृती गंभीर असून, ३ जणांची दृष्टी गेली आह...

October 17, 2024 3:19 PM

views 45

काझीरंगा राष्ट्रीय उद्यान फुलपाखरांच्या सर्वाधिक प्रजाती असलेलं देशातलं दुसरं उद्यान

काझीरंगा राष्ट्रीय उद्यान फुलपाखरांच्या सर्वाधिक प्रजाती असलेलं देशातलं दुसरं सर्वात मोठं उद्यान ठरलं आहे. या उद्यानात फुलपाखरांच्या ४४६ पेक्षा जास्त प्रजाती आढळून आल्या आहेत. अरुणाचल प्रदेशातलं नमदाफा राष्ट्रीय उद्यान फुलपाखरांच्या सर्वाधिक प्रजातींसह देशात पहिल्या स्थानावर आहे.काझीरंगा इथले युवा श...

October 17, 2024 3:15 PM

views 62

SAFF महिला फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेत भारताचा सामना आज पाकिस्तान बरोबर

नेपाळमध्ये सुरू असलेल्या SAFF महिलांच्या फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धांमध्ये भारताचा सलामीचा सामना आज पाकिस्तान बरोबर होत आहे. संध्याकाळी सव्वा पाच वाजता सामना सुरू होईल. स्पर्धांच्या अ गटात भारत, पाकिस्तान आणि बांगलादेश असून ब गटात नेपाळ, भूतान, मालदिव आणि श्रीलंकेचा समावेश आहे. अंतिम सामना ३० तारखेला ख...

October 17, 2024 3:07 PM

views 54

खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जर याच्या हत्येमागे भारताचा हात असल्याचे ठोस पुरावे नसल्याची कॅनडाच्या प्रधानमंत्र्यांची कबुली

खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जर याच्या हत्येमागे भारताचा हात होता हे आरोप करताना कॅनडाकडे कुठलेही ठोस पुरावे नव्हते. गुप्तचरांनी दिलेल्या माहितीच्या आधारे हे आरोप केल्याची कबुली कॅनडाचे प्रधानमंत्री जस्टीन ट्रुडू यांनी त्यांच्या देशातल्या चौकशी समितीसमोर दिल्याचं वृत्त आहे.   यामुळं भारताची...

October 17, 2024 3:02 PM

views 49

यूजीसी नेट २०२४ परीक्षेचा निकाल उद्या जाहीर होणार

यंदा जून महिन्यात एनटीए अर्थात राष्ट्रीय चाचणी संस्थेने घेतलेल्या यूजीसी नेट २०२४ परीक्षेचा निकाल उद्या १८ ऑक्टोबर रोजी जाहीर केला जाईल. राष्ट्रीय चाचणी संस्थेने समाजमाध्यमावरच्या संदेशात ही माहिती दिली आहे.

October 17, 2024 2:58 PM

views 27

नागरिकत्व कायद्याच्या कलम ‘6 अ’ ची घटनात्मक वैधता सर्वोच्च न्यायालयाकडून कायम

सर्वोच्च न्यायालयानं आज नागरिकत्व कायदा, 1955 च्या कलम 6A ची घटनात्मक वैधता कायम ठेवली. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालच्या घटनापीठासमोर कलम 6A मधल्या तरतुदींना आव्हान देणाऱ्या याचिकांवर सुनावणी सुरु होती.   कायद्याचं 6A हे कलम आसाम करार लागू करण्यासाठी समाविष्ट करण्यात आलं होतं...

October 17, 2024 8:18 PM

views 30

पर्यायी इंधनांमुळे भारताचं पेट्रोलियमवरचं अवलंबित्व कमी होऊन आयातीत घट होऊ शकते -नितिन गडकरी

मिथेनॉल, इथेनॉल आणि बायो सीएनजी सारख्या पर्यायी इंधनांमुळे भारताच पेट्रोलियमवरचं अवलंबित्व कमी होऊन आयातीत घट होऊ शकते असं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्लीत नीती आयोगाने आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय मिथेनॉल कार्यशाळेत बोलत होते. सध्या पेट्रोलि...