October 18, 2024 8:43 AM

views 72

नाशिक ते दिल्ली दरम्यानची ‘कांदा एक्स्प्रेस’ रेल्वे गाडी रवाना

दिवाळीपूर्वी बाजारातली कांद्याची मागणी पूर्ण करण्यासाठी नाशिक ते दिल्ली दरम्यानची कांदा एक्स्प्रेस रेल्वेगाडी काल रवाना झाली. ही विशेष गाडी 1600 मेट्रिक टन कांदा घेऊन येत्या 20 ऑक्टोबरला नवी दिल्ली इथं पोहोचणार असून त्यानंतर हा कांदा राजधानी दिल्लीतल्या घाऊक बाजारपेठांमध्ये वितरित केला जाईल, असं ग्र...

October 17, 2024 8:34 PM

views 36

सॅफ महिला फुटबॉल स्पर्धेत भारताची पाकिस्तानवर मात

नेपाळमधे काठमांडू इथं सुरु झालेल्या सॅफ महिला फुटबॉल स्पर्धेत भारतानं आज पाकिस्तानवर ५-२ नं मात करत, विजयी सलामी दिली. ‘अ’ गटात भारताचा दुसरा सामना येत्या २३ तारखेला बांगलादेशाबरोबर होईल. स्पर्धेतला अंतिम सामना येत्या ३० तारखेला होणार आहे.

October 17, 2024 8:21 PM

views 18

झारखंड विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याची अधिसूचना उद्या जारी होणार

झारखंड विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याची अधिसूचना उद्या जारी होणार आहे. या टप्प्यात ४३ मतदारसंघांचा समावेश असून उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत येत्या २५ ऑक्टोबरपर्यंत आहे. २८ ऑक्टोबरला अर्जांची छाननी होईल, आणि ३० ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी मागे घेता येईल. पहिल्या टप्प्यात १३ नोव्हेंबरला तर दुसऱ्या टप...

October 17, 2024 7:49 PM

views 83

मुंबईत १७ आणि १८ ऑक्टोबर रोजी पाणीकपात

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या वैतरणा धरणातून पाणी वाहून नेणाऱ्या  जलवाहिनीच्या यंत्रणेत  बिघाड झाल्यामुळे आज १७ आणि उद्या १८ ऑक्टोबर रोजी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात सर्व ठिकाणी  ५ ते १० टक्के पाणीकपात लागू करण्यात आली आहे.  जलवाहिनीच्या यंत्रणेचं  दुरुस्तीचं काम युद्ध पातळीवर सुरु असून, या काळात नाग...

October 17, 2024 7:26 PM

views 44

राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुण्यातल्या ६०० पदाधिकाऱ्यांचा सामूहिक राजीनामा

राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुण्यातल्या ६०० पदाधिकाऱ्यांनी नुकताच सामूहिक राजीनामा दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुण्याचे शहराध्यक्ष दीपक मानकर यांना विधानपरिषदेच्या राज्यपाल नियुक्त आमदारांमध्ये संधी न दिल्यामुळे कार्यकर्ते नाराज झाले असून त्यामुळे पुणे शहर पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामा दिल...

October 17, 2024 7:23 PM

views 37

‘लाडकी बहीण’ योजनेच्या जाहिरातीवर महायुतीने २०० कोटींची उधळपट्टी केल्याचा काँग्रेसचा आरोप

‘लाडकी बहीण’ योजनेच्या जाहिरातीवर महायुती सरकारने २०० कोटी रुपयांची उधळपट्टी केल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. जनतेच्या कष्टाचा पैसा हे सरकार जाहिरातींवर खर्च करत असल्याचं प्रदेश काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी आज मुंबईत प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलं आहे.

October 17, 2024 7:13 PM

views 46

हिंगोली जिल्ह्यातल्या कळमनुरी तालुक्यात भूकंपाचे दोन सौम्य धक्के

हिंगोली जिल्ह्यातल्या कळमनुरी तालुक्यात दांडेगाव आणि परिसरामध्ये आज दुपारी भूकंपाचे दोन सौम्य धक्के जाणवले, मात्र त्याची नोंद अद्याप झाली नाही, अशी माहिती जिल्हा अपत्ती व्यवस्थापन कार्यालयातून देण्यात आली. या परिसरात  गेल्या चार वर्षांपासून असे धक्के बसतात. आज दुपारी २ वाजून १० मिनिटांनी आणि नंतर दो...

October 17, 2024 7:44 PM

views 38

न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारतीय संघ पहिल्या डावात ४६ धावात गारद

न्यूझीलंड विरुद्ध भारत कसोटी क्रिकेट मालिकेतल्या पहिल्या सामन्यात आजच्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा न्यूझीलंडच्या ३ बाद १८० धावा झाल्या. आता न्यूझीलंडकडे १३४ धावांची आघाडी आहे. भारताच्या कुलदीप यादव, आर. अश्विन आणि रविंद्र जडेजा यांनी प्रत्येकी एक गडी टिपला. बेंगळुरूच्या चिन्नास्वामी मैदानावर आज झालेल...

October 17, 2024 7:54 PM

views 90

दहावी, बारावीच्या परीक्षांबाबत महत्वाची अपडेट

राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतल्या जाणाऱ्या दहावी आणि बारावी परीक्षांचं अधिकृत वेळापत्रक मंडळाच्या संकेतस्थळावर अद्याप प्रसिद्ध करण्यात आलेलं नाही असं मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी प्रसिद्धीपत्रकात स्पष्ट केलं आहे. या परीक्षांच्या वेळापत्रकांबद्दल समाजमाध्यमांवर प्रसिद्ध झा...

October 17, 2024 6:51 PM

views 56

विधानसभा निवडणूक लढवणाऱ्या उमेदवार आणि राजकीय पक्षांना गुन्हेगारी पार्श्वभूमी प्रसिद्धी करावी लागणार

महाराष्ट्र विधानसभेसाठी निवडणूक लढवणारे उमेदवार आणि त्यांच्या राजकीय पक्षांना सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार गुन्हेगारी पार्श्वभूमी प्रसिद्धी करावी लागणार आहे. भारत निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार याबाबत सविस्तर निर्देश आणि प्रलंबित गुन्हेगारी खटल्यांची माहिती प्रसिद्ध...