October 19, 2024 2:11 PM

views 71

सुल्तान जोहोर चषक स्पर्धेत भारतीय ज्युनिअर पुरुष हॉकी संघाचा पहिला सामना आज जपानशी होणार

मलेशिया इथं होणाऱ्या सुल्तान जोहोर चषक स्पर्धेत भारतीय ज्युनिअर पुरुष हॉकी संघाचा पहिला सामना आज जपानशी होणार आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी १ वाजून ३५ मिनिटांपासून हा सामना सुरू होत आहे. भारताची लढत २० ऑक्टोबरला ग्रेट ब्रिटनशी, २२ ऑक्टोबरला मलेशियाशी आणि २३ ऑक्टोबरला ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. सांघिक ल...

October 19, 2024 2:09 PM

views 21

भारतात येत्या २ ते ३ दिवसात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता

तामिळनाडू , पुदुच्चेरी, आणि कर्नाटक सह दक्षिण भारतात येत्या २ ते ३ दिवसात आणि अंदमान आणि निकोबार बेटांवर उद्या आणि परवा मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. पश्चिम बंगाल आणि ओडिशा मध्ये २३ आणि २४ तारखेला मुसळधार पावसाचा अंदाज आहे. वायव्य, पश्चिम, मध्य आणि ईशान्य भारतात तुरळक प्रमाणात ...

October 19, 2024 2:17 PM

views 31

बिहार मधले IAS सेवेतले वरिष्ठ अधिकारी संजीव हंस आणि गुलाब यादव यांना आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी अटक

बिहार मधले IAS अर्थात भारतीय प्रशासकीय सेवेतले वरिष्ठ अधिकारी संजीव हंस आणि राष्ट्रीय जनता दलाचे माजी आमदार गुलाब यादव यांना आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी सक्तवसुली संचलनालयानं अटक केली आहे. IAS सेवेतल्या अधिकाऱ्याला त्याच्या पाटणा इथल्या सरकारी निवासस्थानातून अटक केली तर गुलाब यादवला काल संध्याकाळी दिल...

October 19, 2024 2:20 PM

views 29

भारत आणि मेक्सिको या दोन्ही देशात परस्पर संबंध बहुआयामी आणि दृढ होतील, असा केंद्रीय अर्थमंत्र्यांना विश्वास

भारत आणि मेक्सिको या दोन्ही देशात परस्पर संबध बहुआयामी आणि दृढ होतील, असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. मेक्सिको इथं होत असलेल्या भारत-मेक्सिको व्यापार आणि गुंतवणूक सहकार्य वाढवण्यासाठी आयोजित ‘भारत-मेक्सिको व्यापार आणि गुंतवणूक शिखर परिषदेत’ त्या बोलत होत्या. मेक्सिको सिटीच...

October 19, 2024 3:45 PM

views 63

बंगलोर क्रिकेट कसोटी सामन्यात भारताच्या दुसऱ्या डावात फलंदाजांना सूर गवसला

भारत आणि न्यूझीलंड दरम्यान बेंगळुरूच्या चिन्नास्वामी मैदानावर सुरु असलेल्या पहिल्या क्रिकेट कसोटीत अखेर भारतीय फलंदाजांना सूर गवसला.  काल तिसऱ्या दिवशी रोहित शर्मा, विराट कोहली आणि सर्फराझ खान यांनी अर्धशतकं झळकावली आणि दिवसअखेर ३ बाद २३१ धावांचा पल्ला गाठला. आज सकाळी खेळ सुरु झाल्यावर सर्फराज खाननं...

October 19, 2024 1:21 PM

views 35

बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत ९ जणांना अटक

बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत ९ जणांना अटक केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी बाबा सिद्दीकी यांच्या सुरक्षारक्षकाला निलंबित केलं आहे. सुरक्षेसाठी तैनात असतांनाही त्याने हल्लेखोरांवर गोळीबार न करुन कर्तव्यात कसुर केल्याबद्दल कॉन्टेबल शाम सोनवणे याला निलंबित करण्यात आलं आहे. हल्लेखोरांनी...

October 19, 2024 12:57 PM

views 27

युगांडा देशामध्ये मंकीपॉक्स च्या ४९ नव्या रुग्णांची नोंद

युगांडा देशामध्ये मंकीपॉक्स या आजारानं बाधित ४९ नव्या रुग्णांची नोंद झाली असून त्यामुळे या संसर्गानं बाधित रुग्णांची एकूण संख्या आता १४५ वर पोहोचली असल्याचं, युगांडाच्या आरोग्य मंत्रालयानं सांगितलं आहे. राजधानी कंपाला मध्ये  सर्वाधिक अर्थात २७ रुग्ण असून आत्तापर्यंत या आजारानं एकाही मृत्यूची  नोंद झ...

October 19, 2024 11:13 AM

views 34

राहुरीच्या महात्मा फुले कृषि विद्यापीठाला या वर्षाचा फिक्कीचा सर्वोकृष्ट विद्यापीठ हा पुरस्कार

भारतीय वाणिज्य आणि उद्योग महासंघाचा अर्थात फिक्कीचा या वर्षाचा सर्वोकृष्ट विद्यापीठ हा पुरस्कार राहुरीच्या महात्मा फुले कृषि विद्यापीठाला मिळाला आहे. केंद्र सरकारच्या ब्रिटीश उच्चायुक्त लिंडी कॅमेरॉन यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांनी पुरस्कार स्वीकारल...

October 19, 2024 11:03 AM

views 13

सवाई गंधर्व भीमसेन संगीत महोत्सवाच्या तारखा जाहीर

जगभरातल्या शास्त्रीय संगीत रसिकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू असलेल्या सवाई गंधर्व भीमसेन संगीत महोत्सवाच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. यंदा 70व्या वर्षात पदार्पण करणारा 5 दिवसांचा हा संगीत महोत्सव पुण्यात मुकुंद नगर मधल्या महाराष्ट्रीय मंडळाच्या क्रीडा संकुलात येत्या 18 ते 22 डिसेंबर दरम्यान होण...

October 19, 2024 10:54 AM

views 32

ज्येष्ठ संस्कृत अभ्यासक पंडित वसंतराव गाडगीळ यांचं वृद्धापकाळानं निधन

पुण्यातल्या शारदा ज्ञानपीठमचे संस्थापक आणि ज्येष्ठ संस्कृत अभ्यासक पंडित वसंतराव गाडगीळ यांचं काल पुण्यात वृद्धापकाळानं निधन झालं. ते 95 वर्षांचे होते. काल सकाळी वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिव देहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पंडित वसंतराव गाडगीळ यांचं व्यक्तिमत्व संस्कृत भाषेच्या प्रचार प्रसा...