October 19, 2024 7:52 PM

views 45

महायुती आणि मविआचं जागावाटप येत्या एक-दोन दिवसांत जाहीर होणार

राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडी च्या मोर्चेबांधणीला वेग आला आहे. महायुतीमध्ये केवळ ३०-३५ जागांवर सहमती व्हायची आहे. एक-दोन दिवसात हे जागा वाटप जाहीर होईल अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. नवी दिल्लीत ते आज वार्ताहरांशी बोलत होते. भाजपाच्या उमेदवारांची यादी लवकरच...

October 19, 2024 7:53 PM

views 87

राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी विजया रहाटकर यांची नियुक्ती

केंद्र सरकारनं राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी विजया रहाटकर यांची नियुक्ती केली आहे. यासंदर्भात अधिसूचना केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्रालयानं काल जारी केला. या आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झालेल्या त्या पहिल्याच मराठी व्यक्ती आहेत. यापूर्वी त्यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष म्हणूनही का...

October 19, 2024 3:30 PM

views 37

समाजमाध्यमांच्या नोडल अधिकाऱ्यांना सायबर शाखेच्या नोटीसा

येत्या विधानसभा निवडणुकीच्या संदर्भात फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर, यु ट्यूब इत्यादीं समाजमाध्यमांवर अनेक खोट्या आणि मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करणाऱ्या पोस्ट प्रसारित होत आहेत. त्या काढून टाकण्यासाठी संबंधित समाजमाध्यमांच्या नोडल अधिकाऱ्यांना राज्य पोलिसदलाच्या सायबर शाखेने नोटीसा पाठवल्या आहेत. आत...

October 19, 2024 3:26 PM

views 37

राज्यात परतीच्या पावसाचा जोर

रत्नागिरी जिल्ह्याला परतीच्या पावसानं झोडपून काढलं असून जिल्ह्यात या महिन्यात सरासरी दीडशे मिलिमीटर पाऊस झाला आहे. एक जूनपासून आतापर्यंत जिल्ह्याच्या वार्षिक सरासरीच्या १२९ टक्के पाऊस झालेला आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे भातपिकाचं नुकसान झालं असून, कृषी विभागाकडून पंचनामे सुरू आहेत. पावसाम...

October 19, 2024 3:21 PM

views 15

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या पाच पिकांच्या वाणाचा समावेश भारताच्या राजपत्रात

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या पाच पिकांच्या वाणाचा समावेश भारताच्या राजपत्रात करण्यात आला आहे. याबाबत केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयानं अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. यात परभणी चणा-१६, सोयाबीनच्या एमएयूएस ७३१, देशी कापसाच्या पीए ८३३, अमेरिकन कापसाच्या एनएच ६७७ आणि तिळाच्या टीएलटी ...

October 19, 2024 3:30 PM

views 46

विधानसभा निवडणुकीसाठी पात्र मतदारांना नाव नोंदणी करण्याचा आज शेवटचा दिवस

विधानसभा निवडणुकीसाठी ज्या पात्र मतदारांनी अद्याप नावनोंदणी केलेली नाही त्यांना आजचा दिवस, संधी आहे. आज  रात्री १२ वाजेपर्यंत मतदार नोंदणीचे अर्ज स्वीकारले जाणार आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगानं  जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार, नामनिर्देशन पत्र सादर करण्याची मुदत २९ ऑक्टोबरपर्यंत आहे. नामनिर्द...

October 19, 2024 3:02 PM

views 43

विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसची जाहीरनामा समिती स्थापन

विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसनं सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जाहीरनामा समिती स्थापन केली आहे. समितीचे निमंत्रक म्हणून पक्षाचे सरचिटणीस आमदार शिवाजीराव गर्जे यांची निवड करण्यात आली असून या समितीत राज्यातले विद्यमान मंत्री आणि पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे.

October 19, 2024 2:48 PM

views 41

‘हरियाणा, महाराष्ट्रात भाजपने क्रीमीलेअर आणि अनुसूचित जातींमधील वर्गीकरणाचा चुकीचा निर्णय लागू केला’

हरियाणा आणि महाराष्ट्रात भाजपने सर्वोच्च न्यायालयाचा क्रीमीलेअर आणि अनुसूचित जातींमधील वर्गीकरणाचा चुकीचा निर्णय लागू केल्याचं वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. आपल्या  ट्विटमध्ये त्यांनी म्हटलं आहे की, भाजप आणि काँग्रेस हे दोन्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. दोन्ही पक्ष...

October 19, 2024 2:23 PM

views 11

कर्मयोगी सप्ताहाचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज उद्घाटन

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज राष्ट्रीय शिक्षण कर्मयोगी सप्ताहाचं नवी दिल्ली इथं उद्घाटन झालं. राष्ट्रीय शिक्षण सप्ताहात प्रत्येक कर्मयोगी किमान चार तास आपल्या क्षमतेशी निगडित काही नवीन शिकण्याचा कार्यक्रम पूर्ण करेल. राष्ट्रीय शिक्षण सप्ताहात वैयक्तिक नागरिक, विविध मंत्रालयातील विभागात...

October 19, 2024 2:14 PM

views 27

हमासचा नेता याहा सिनवरच्या मृत्यूनंतरही हमास संघटनेचं अस्तित्व टिकून राहील-अयातुल्ला अली खमेनी

हमासचा नेता याहा सिनवरच्या मृत्यूनंतरही हमास संघटनेचं अस्तित्व टिकून राहील, असं इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खमेनी यांनी सांगितलं आहे. समाजमाध्यमांद्वारे जारी केलेल्या निवेदनात त्यांनी म्हटलं आहे की इस्रायलविरुद्धच्या युद्धात सिनवरच्या मृत्यूमुळे नुकसान झालं आहे, पण त्याच्या मृत्यूनंतरही ही लढ...