October 21, 2024 3:21 PM

views 47

पुण्यात महात्मा फुले मंडई परिसरातील मेट्रोस्थानकात आग

पुण्यातल्या महात्मा फुले मंडई परिसरातल्या मेट्रोस्थानकात मध्यरात्रीच्या सुमारास आग लागली. मेट्रोस्थानकात तळमजल्यावर वेल्डिंगचे काम सुरु असताना तिथे ठेवलेल्या फोमच्या साहित्याने पेट घेतला असा प्राथमिक अंदाज आहे. या आगीत कोणीही जखमी झालं नाही. या घटनेचा मेट्रो सेवेवर कोणताही परिणाम होणार नसल्याचं पुणे...

October 21, 2024 3:15 PM

views 43

काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक आज दिल्लीत होणार

काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक आज दिल्लीत होणार आहे. यात महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकीतल्या उमेदवारांच्या नावाबाबत चर्चा होणार आहे. याआधी महाराष्ट्र काँग्रेसने विधानसभा निवडणुकीसाठी ६२ नावांची यादी काँग्रेस कार्यकारी समितीकडे सादर केली होती. तर झारखंडमध्ये जागावाटपाबाबत इंडिया ...

October 21, 2024 3:08 PM

views 60

भारताचे नौदल प्रमुख ॲडमिरल दिनेश त्रिपाठी ४ दिवसांच्या यूएई दौऱ्यावर

भारत आणि संयुक्त अरब अमिराती या दोन्ही देशात संरक्षण सहकार्य बळकट करण्याच्या उद्देशाने भारताचे नौदल प्रमुख ॲडमिरल दिनेश त्रिपाठी आजपासून चार दिवसांच्या यूएई दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यात ते यूएईचे नौदल प्रमुख रिअर ॲडमिरल पायलट सईद बिन हमदान अल नाह्यान आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करतील. या भे...

October 21, 2024 2:59 PM

views 15

आज जागतिक आयोडिन कमतरता दिवस

जगभरात आज जागतिक आयोडिन कमतरता दिवस साजरा केला जातो. चांगल्या आरोग्यासाठी आयोडिनच्या आवश्यकतेबाबत जागरुकता वाढवणं आणि आयोडिनच्या कमतरतेमुळे होणाऱ्या विकारांवर प्रकाश टाकण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. आयोडिन हा थायरॉईड संप्रेरकांसाठी महत्त्वाचा घटक आहे. आयोडिनच्या कमतरतेमुळे माणसाच्या सर्वांगीण वा...

October 21, 2024 2:56 PM

views 53

महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये विधानसभेसाठी जागावाटपाबाबत चर्चांना वेग

महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध राजकीय पक्षांच्या बैठका होत आहेत. राष्ट्रीय लोकशाही आघाडी आणि इंडिया आघाडीमधे घटक पक्षांच्या जागावाटपाबाबत चर्चा सुरु आहेत.

October 21, 2024 2:41 PM

views 46

तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत भारताच्या दीपिका कुमारीला महिलांच्या रिकर्व्ह प्रकारात रौप्य पदक

मेक्सिको इथे सुरू असलेल्या तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारताच्या दीपिका कुमारी हिला आज महिलांच्या रिकर्व्ह प्रकारात रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं. या स्पर्धेच्या अंतिम फेरीत चीनच्या ली जियामन हिने सुवर्णपदक जिंकलं. तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत उपविजेतेपद पटकावण्याची दीपिकाची ही पाचवी ...

October 21, 2024 3:28 PM

views 21

जग अनिश्चिततेच्या गर्तेत असताना भारत आशेचा किरण म्हणून उदयाला आला – प्रधानमंत्री

भारत सर्वच क्षेत्रात अभूतपूर्व प्रगती करत असून जगाचं भविष्य घडवण्यासाठी तो पुढाकार घेत आहे, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं. एका खासगी माध्यम समूहाने नवी दिल्लीत आयोजित केलेल्या जागतिक शिखर परिषदेला ते संबोधित करत होते. जग अनिश्चिततेच्या गर्तेत असताना भारत आशेचा किरण म्हणून उदय...

October 21, 2024 1:41 PM

views 91

पोलीस स्मृतीदिनानिमित्त देशाचं शहीद पोलिसांना अभिवादन

आज पोलीस स्मृतिदिन. २१ ऑक्टोबर १९५९ रोजी लडाख इथे चिनी सैन्याचा हल्ला परतवताना दहा पोलीस कॉन्स्टेबल शहीद झाले होते. त्यांच्यासह देशभरातल्या विविध मोहिमांमध्ये आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या पोलिसांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी आजचा दिवस पाळला जातो. या निमित्ताने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांन...

October 21, 2024 1:39 PM

views 36

अर्थमंत्री निर्मला सीतारामन मेक्सिकोचा दौरा संपवून अमेरिकेत दाखल

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज मेक्सिकोचा दौरा संपवून अमेरिकेत पोहचल्या. अमेरिकेतले भारताचे राजदूत विनय मोहन क्वात्रा आणि न्यूयॉर्कमधले भारताचे महावाणिज्यदूत बिनय श्रीकांत प्रधान यांनी त्यांचं काल संध्याकाळी नेवार्क आंतरराष्ट्रीय विमानतळावर स्वागत केलं.   अर्थमंत्री १७ ते २० ऑक्टोबर दर...

October 21, 2024 2:47 PM

views 38

उडे देश का आम नागरिक या प्रादेशिक विमान संपर्क योजनेला 8 वर्षं पूर्ण

उडे देश का आम नागरिक या प्रादेशिक विमान संपर्क योजनेला काल आठ वर्षं पूर्ण झाली. नागरी विमान वाहतूक मंत्रालयानं २१ ऑक्टोबर २०१६ ला ही योजना सुरू केली होती. UDAN योजनेत देशातील विमान सेवा नसलेल्या प्रदेशांमध्ये विमान मार्ग सुधारण्यावर आणि सामान्य नागरिकांच्या आकांक्षा पूर्ण करण्यावर लक्ष केंद्रित करण्...