October 21, 2024 8:54 PM

views 53

पूर्व लडाखमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर गस्त घालण्याबाबत भारत आणि चीन यांच्यात करार

लडाखमधल्या पूर्व भागातल्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर गस्त घालण्याबाबत भारत आणि चीन यांच्यात करार झाला आहे. या करारामुळे २०२०मध्ये सुरू झालेला दोन्ही देशांमधला तणाव निवळू शकतो, असं परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री नवी दिल्लीत प्रसार माध्यमांशी बोलताना म्हणाले. दोन्ही देशांमध्ये याबाबत सविस्तर चर्चा झाल्य...

October 21, 2024 4:53 PM

views 35

रशियातल्या कझान इथला भारतीय समुदाय प्रधानमंत्र्यांच्या स्वागतासाठी उत्सुक

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ब्रिक्स शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी रशियातल्या कझानच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर जात आहेत. या दौऱ्यात प्रधानमंत्री मोदी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन आणि इतर नेत्यांशी द्विपक्षीय चर्चा करणार आहेत.    दरम्यान, रशियातल्या कझान इथला भारतीय समुदाय, विशेषतः विद्यार्थी, ...

October 21, 2024 4:21 PM

views 36

हिंगोली : दुचाकीला धडक दिल्याने अपघातात दोन ठार, एक गंभीर जखमी

हिंगोली जिल्ह्यातल्या पुसेगाव इथे भरधाव गाडीने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोन जण ठार तर एक जण गंभीर जखमी झाला. गौतम धाबे आणि शेख सत्तार अशी मृतांची नावं आहेत. तर गंभीर जखमी झालेल्या बबन धाबे यांना नांदेडच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.   दरम्यान, हिंगोलीत झालेल्या दुसऱ्या एका अ...

October 21, 2024 4:15 PM

views 73

नाशिकमध्ये मुसळधार पावसामुळे शेतपीकांचं नुकसान

नाशिकमध्ये विविध भागात झालेल्या मुसळधार पावसामुळे ३८ हजार हेक्टरवरची शेतातली पिकं जमीनदोस्त झाली आहेत. या पावसामुळे ७६ हजार ५८८ शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. चांदवड, देवळा, कळवण, त्रंबक आणि बागलाणमध्ये सर्वाधिक नुकसान झाले आहे. मका, कांदा भातपिकांचं तसंच द्राक्ष पिकांचं नुकसान झालं आहे.

October 21, 2024 4:08 PM

views 28

झारखंड विधानसभा निवडणुकीसाठी ११ हजार सैनिक तैनात

झारखंड विधानसभा निवडणुकीसाठी निमलष्करी दलाच्या ११९ कंपन्या म्हणजे एकूण ११ हजार सैनिक तैनात करण्यात येणार आहेत. एका जिल्ह्यात तीन ते पाच कंपन्या तैनात करण्यात येणार आहेत. झारखंडमध्ये दोन टप्प्यात निवडणुका होणार असून पहिला टप्पा १३ नोव्हेंबरला तर दुसरा टप्पा २० नोव्हेंबरला होणार आहे. निवडणुकीचा निकाल ...

October 21, 2024 3:57 PM

views 51

बविआ पालघर जिल्ह्यातल्या ६ विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढणार

बहुजन विकास आघाडी पालघर जिल्ह्यातल्या सर्व सहा विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढणार असल्याची घोषणा पक्षाचे अध्यक्ष हितेंद्र ठाकुर यांनी केली आहे. विरार पश्चिम इथं बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या मेळावा काल आयोजित केला होता, यात ठाकुर यांनी विधानसभा निवडणुकीत पक्षाला विजय मिळेल असा विश्वास व्यक्...

October 21, 2024 3:45 PM

views 54

जम्मू-काश्मीरमध्ये एक काश्मिरी डॉक्टर आणि ६ बांधकाम कामगारांची हत्या

जम्मू-काश्मीरच्या गांदरबल जिल्ह्यात गगनगीर इथं दहशतवाद्यांनी एक काश्मिरी डॉक्टर आणि ६ बांधकाम कामगारांची हत्या केली. सोनमर्गच्या झेड-मोड बोगदा परिसरात बांधकामाच्या ठिकाणी ही घटना घडली. दोन दहशतवाद्यांनी एका खासगी कंपनीच्या खानावळीमध्ये घुसून गोळीबार केला. यावेळी मारले गेलेले डॉ.शहनवाज हे बडगाम जिल्ह...

October 21, 2024 3:43 PM

views 18

देशाची वस्त्रोद्योग उलाढाल २०३० पर्यंत साडेतीनशे अब्ज डॉलर्सची होईल – मंत्री पवित्र मार्गरिटा

देशाची वस्त्रोद्योग उलाढाल २०३० पर्यंत साडेतीनशे अब्ज डॉलर्सची होईल असा विश्वास केंद्रीय वस्त्रोद्योग राज्यमंत्री पवित्र मार्गरिटा यांनी व्यक्त केला आहे. भारत टेक्स २०२५ संदर्भात आज नवी दिल्लीत आयोजित एका संवाद कार्यक्रमात आज ते बोलत होते. भारत टेक्स २०२५ हे वस्त्रोद्योगाशी संबंधित आंतरराष्ट्रीय प्र...

October 21, 2024 3:30 PM

views 37

बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात दहाव्या आरोपीला अटक

माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात पोलिसांच्या गुन्हे शाखेनं दहाव्या आरोपीला अटक केली आहे. हा आरोपी नवी मुंबईतील एक भंगार व्यापारी असून मुख्य आरोपींना शस्त्र पुरवल्याच्या आरोपाखाली त्याला अटक करण्यात आली आहे. त्याला २६ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

October 21, 2024 4:23 PM

views 43

देशातल्या ६ लाख २६ हजार गावांमधल्या जमिनींच्या नोंदी संगणकीकृत केल्याची केंद्रीय कृषीमंत्र्यांची माहिती

केंद्र सरकारने देशभरातल्या ६ लाख २६ हजार गावांमधल्या जमिनींच्या नोंदी संगणकीकृत केल्या असल्याची माहिती केंद्रीय कृषी आणि ग्रामविकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दिली. नागरी क्षेत्रातल्या जमिनींचं सर्वेक्षण पुनर्सर्वेक्षण करताना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर या विषयावर नवी दिल्ली इथं आयोजित आंतरराष्ट्र...